'ह्या "बिग्गेस्ट लूजर" तरूणाने जे करून दाखवलं त्याला तोड नाही

ह्या “बिग्गेस्ट लूजर” तरूणाने जे करून दाखवलं त्याला तोड नाही

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

माणूस हा एक असा प्राणी आहे जो महत्त्वाकांक्षेच्या जोरावर अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य करून दाखवतो. त्यासाठी त्याला गरज असते ती केवळ आपल्या ध्येयाला ओळखण्याची. जर त्याने ध्येय निश्चित केले तर त्यापर्यंत पोहोचण्यापासून त्याला कोणीही थांबवू शकत नाही. तो त्याच्या मेहेनतीने त्याला हवी असलेली प्रत्येक गोष्ट मिळवतो, आपल्या स्वप्नांना पूर्ण करतो. पण अशी फार कमी लोकं असतात जी त्यांच्या ध्येयाला गाठतात. कारण त्यासाठी खुप मेहेनत आणि तेवढीच सहनशीलता हवी असते. जी प्रत्येकात नसते आणि ज्यांच्यात या दोन गोष्टी असतील ते जगासाठी एक प्रेरणास्थान ठरतात.

खूप कमी लोकं असतात जे आपल्या ध्येयाला पूर्ण करण्याकरिता झटत असतात. यांपैकीच एक म्हणजे सॅम रॉएन, ज्याने आपल्या मेहेनत आणि डेडीकेशनच्या जोरावर आपल्या स्वप्नांन पूर्ण करून दाखवलं आहे.

 

sam-rouen-inmarathi10

 

सॅम रॉएन याने २००८ साली एका टीव्ही रियालिटी शो ‘द बिगेस्ट लूजर’मध्ये भाग घेतला होता. या शोमध्ये केवळ १२ आठवड्यांच्या काळात लठ्ठ लोकांना आपले वजन कमी करायचे असते. जी व्यक्ती सर्वात जास्त वजन कमी करू शकेल त्याला या शोचा विजेता म्हणून घोषित करण्यात येते.

 

sam-rouen-inmarathi01

 

जेव्हा सॅमने या शोमध्ये भाग घेतला होता तेव्हा तो केवळ १९ वर्षांचा होता आणि त्याच वजन १५४ किलो होते. पण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की सॅमने १२ आठवड्यांत ७१ किलो वजन केमी केले.

 

sam-rouen-inmarathi04

 

हे एवढे सोपे नव्हते, त्यासाठी त्याला खूप मेहेनत घावी लागली होती. याचच फळ म्हणून तो २००८ साली या शोच्या तिसऱ्या सिझनचा विजेता ठरला. त्याने १२ आठवड्यांच्या कालावधीत आश्चर्यकारक पद्धतीने ७१ किलो वजन कमी केले. जेव्हा त्याने या शोमध्ये भाग घेतला तेव्हा त्याचे वजन १५४ किलो होते, १२ आठवड्यानंतर त्याचं वजन ८१ किलो झाले होते.

 

sam-rouen-inmarathi12

 

आज दहावर्षानंतर २९ वर्षीय सॅम हा एक फायरमन बनला आहे. त्याला बघून कोणीही हे सांगू शकत नाही की, हा तोच लठ्ठ मुलगा आहे ज्याच वजन १५४ किलो होतं. या शोनंतर देखील सॅमने बॉडीबिल्डिंग सुरूच ठेवली. त्याने त्याची हेल्थी लाइफस्टाइल सोडली नाही.

 

sam-rouen-inmarathi

 

त्याने त्याची Before-After फोटो पोस्ट केली आणि त्यासोबतच एक प्रेरणादायी संदेश देखील लिहिला आहे. एक लठ्ठ मुलगा ते एक उत्कृष्ट शरीरयष्टी पर्यंतचा त्याचा हा प्रवास त्याच्यासाठी नक्कीच अविस्मरणीय राहिला असेल.

 

sam-rouen-inmarathi00

 

सॅम रॉएन याचं स्वप्न होतं की, त्याने फायरमन बनावं त्याच्या बॉडी ट्रान्स्फॉरमेशन सोबतच त्याचं हे स्वप्न देखील पूर्ण झालं आहे. सॅम आता एक फायरमन असून त्याच्या बॉडीमुळे तो फायरफायटर कॅलेंडरवर एक मॉडेल म्हणून देखील झळकला आहे.

सॅम रॉएन सांगतो की,

“मला आता एक्सरसाइजचं वेड लागलंय, मला माझ्या भावासोबत रनिंग आणि वर्कआऊट करायला खूप आवडत.”

त्याची फिजीक एखाद्या हिरोलाही लाजवेल अशी आहे, पण असे असूनही आजही सॅमला समुद्रकिनारी किंवा सार्वजनिक ठिकाणांवर शर्टलेस होण्यास संकोच वाटतो.

 

sam-rouen-inmarathi08

 

आता सॅमची गर्लफ्रेंड देखील आहे, जिच्यासोबत त्याची एंगेजमेंट झाली आहे.

असा हा सॅम रॉएन त्या प्रत्येक व्यक्तीकरिता प्रेरणास्थान आहे जी आपले वजन आणि लाइफस्टाइल सुधारू इच्छिते. सॅम रॉएनच्या मेहेनत आणि निष्ठेने आज त्याचे शरीरच नाही संपूर्ण जीवन बदलले आहे.

स्त्रोत : boredpanda

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?