'एटीएममधून पैसे निघाले नाहीत तर घाबरु नका, हा उपाय केला तर तुम्हाला नुकसान भरपाई मिळू शकते.

एटीएममधून पैसे निघाले नाहीत तर घाबरु नका, हा उपाय केला तर तुम्हाला नुकसान भरपाई मिळू शकते.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

बँकेने जेव्हापासून एटीएमची सुविधा दिली आहे, तेव्हापासून लोकांना कोणत्याही ठिकाणावर पैसे मिळणे सहज शक्य झाले आहे. त्यामुळे लोक या सुविधेचा भरपूर प्रमाणात फायदा घेतात.

एटीएममुळे बँकेमध्ये पैसे काढण्यासाठी तासंतास उभे राहण्याची गरज पडत नाही. अगदी रात्री देखील आपल्याला पैसे काढायला मिळतात. कधी–कधी काही एटीएममधून पैसे काढताना वेगवेगळ्या समस्या येतात.

 

atm mashine InMarathi

 

काही वेळा तर असे देखील होते की, एटीएममध्ये सर्व प्रोसेस होते, पण पैसेच येत नाहीत आणि आपल्याला खात्यातून पैसे कापण्यात आल्याचा मॅसेज येतो, आपल्यापैकी बहुतेक लोकांबरोबर असे नक्कीच झाले असेल.

पण तुम्हाला माहित आहे का ? अशा वेळी तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये तर येणारच. पण ट्रान्जॅक्शन एरर येऊन तुमचे पैसे कापल्यामुळे तुम्हाला नुकसान भरपाई देखील मिळू शकते.

आज आम्ही तुम्हाला रिजर्व बँक ऑफ इंडियाच्या काही अशा नियमांविषयी सांगणार आहोत, ज्यांच्या आधारे तुम्ही बँकेकडे यासाठी नुकसान भरपाई मागू शकता. चला तर मग जाणून घेऊया आरबीआयच्या नियमांविषयी…

 

RBI InMarathi

१) अयशस्वी एटीएम व्यवहाराच्या संबंधित तक्रारी वापरकर्त्याला कार्ड देणाऱ्या बँकेच्या शाखेकडून तक्रार दाखल केल्यापासून ७ दिवसांच्या आत सोडवली जातील.

२) तक्रार केल्याच्या तारखेपासून ७ दिवसांच्या आत वापरकर्त्याची रक्कम खात्यामध्ये जमा केली गेली नाही, तर कार्डधारकाला त्यानंतर प्रती दिवस १०० रुपये भरपाई म्हणून मिळण्याचा हक्क आहे.

३) जर ग्राहकाने व्यवहाराच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत जर याविषयाची तक्रार कार्ड देणाऱ्या बँकेच्या शाखेमध्ये केली, तरच त्याला या प्रकारची नुकसान भरपाईचा मिळू शकते. ३० दिवसांच्या नंतर त्याला ही नुकसान भरपाई मिळत नाही.

 

ATM Transaction Error Refund.Inmarathi2
wp.com

४) जर ग्राहकाच्या तक्रारीची दखल कार्ड देणाऱ्या त्याच्या बँकेकडून घेण्यात आली नाही आणि तक्रार निवारण करण्यात आले नाही, तर ग्राहक बँकिंग लोकपालला त्याविषयी सांगू शकतात.

५) डब्ल्युएलए (व्हाईट लेबल एटीएम्स) च्या वापरकर्त्यांसाठी विवादित आणि अयशस्वी व्यवहारांसाठी उपलब्ध असलेली तक्रार निवारण यंत्रणा बँकांच्या एटीएमच्या वापरकर्त्यांसाठी असलेल्या यंत्रणेप्रमाणेच आहे.

६) अशा डब्लूएलएमध्ये असलेल्या ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्याची प्राथमिक जबाबदारी ग्राहकाला कार्ड देणाऱ्या बँकेचीच राहील, तर प्रायोजक बँक आवश्यक असलेली माहिती कार्ड प्रदान केलेल्या बँकेला देईल. व्हाईट लेबल एटीएम ऑपरेटर जारी केलेल्या बँकेला संबंधित रेकॉर्ड आणि माहिती उपलब्ध करून त्या व्यवहाराची खात्री करून देते.

भारतातील बँक ग्राहक रोख रक्कम काढण्यासाठी इतर बँकेच्या एटीएमचा देखील वापर करतात. ग्राहकाने ज्या बँकेचे एटीएम पैसे काढण्यासाठी वापरले जाते. त्या बँकेला “अॅक्युरिंग बँक” असे म्हणतात.

 

ATM Transaction Error Refund.Inmarathi1
cardbhai.com

 

२००९ च्या नियमांनुसार, बँकेला अयशस्वी व्यवहार झाल्यानंतर पुन्हा रक्कम जमा करण्यासाठी १२ दिवसांचा अवधी दिला जात असे, पण आता तो अवधी कमी करण्यात आलेला आहे.

त्यामुळे बँकेला खातेदाराच्या खात्यामध्ये लवकरात लवकर रक्कम जमा करणे गरजेचे आहे. त्यासाठी ग्राहकाने ३० दिवसांच्या आतमध्ये बँकेमध्ये तक्रार नोंदवणे गरजेचे आहे.

त्याचबरोबर हे देखील लक्षात घेणे गरजेचे आहे की, ३० दिवसांच्या आत तक्रार करण्याचा अवधी हा १०० रुपये नुकसान भरपाईचा दावा करण्यासाठी आहे. पण तुम्ही ३० दिवसांनंतर देखील आपली रक्कम मिळवण्यासाठी मोफत तक्रार करू शकता. पण यावेळी तुम्हाला कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई न मिळता, तुमची रक्कम परत मिळेल.

अशाप्रकारे तुम्ही या नियमांच्या आधारे अयशस्वी व्यवहारा संबंधित आपल्या बँकेमध्ये तक्रार करून नुकसान भरपाई मिळवू शकता.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?