' परिस्थिती घटस्फोटापर्यंत का जाते? संसारात या १० गोष्टींची काळजी घ्यायला हवी! – InMarathi

परिस्थिती घटस्फोटापर्यंत का जाते? संसारात या १० गोष्टींची काळजी घ्यायला हवी!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

घटस्फोट… तसं पाहिलं तर भारत हा अश्या देशांपैकी एक देश आहे जिथे घटस्फोटांचे प्रमाण खूप कमी आहे. कारण विवाहसंस्कृती, कुटुंबपद्धती, नातीगोती या सगळ्याला पुर्वीपासूनच आपल्या देशात प्रचंड महत्व आहे.

 

amte family inmarathi

 

मूल जन्मल्यापासूनच आईवडिलांसह आजीआजोबा, काका, मावश्या अशा सगळ्या गोतावळ्यात वाढतं, आणि तेव्हापासूनच आपल्यावर नाती जपण्याचे संस्कार होतात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

त्यामुळे आपल्या जोडीदारासह संपुर्ण आयुष्य घालवणं हाच नियम मागच्या काही पिढ्या पाळत होत्या.

पण बदलत्या काळानुसार हे चित्र देखील बदलायला लागले आहे. गेल्या काही वर्षांत, घटस्फोटांच्या संख्येत लक्षणीय वाढ झालेली दिसून आली.

पण हे घटस्फोटांचे प्रमाण का वाढत आहेत, याकडे आपण लक्ष द्यायला हवे.

 

divorce-in-india InMarathi

 

आजकाल तर कुठल्याही लहान-सहन कारणांवरून लोकं घटस्फोट घ्यायला तयार होतात.

मुळात लोकांनाच आता ती जबाबदारी नकोशी झाली आहे. पण हे सामाजिक दृष्ट्या घातक आहे. त्यामुळे घटस्फोटांमागील मुख्य कारणे जाणून घेणे गरजेचे आहे.

१) प्रामाणिक नसणे 

 

unfaithful woman Inmarathi

 

विश्वास आणि प्रामाणिकता हा कुठल्याही नात्याचा पाया असतो. जर नात्यात विश्वासच उरला नसेल तर ते नातं टिकू शकत नाही. अप्रामाणिकपणा हे घटस्फोटांचे सर्वात कॉमन कारण आहे.

सध्याच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येक व्यक्ती ही स्वतंत्र विचारांची आहे, मात्र स्वातंत्र्य आणि प्रामाणिकपणा यांची गल्लत करु नका.

आपल्या कृतीतून विश्वास सार्थ ठरवावा.

२) कम्युनिकेशन गॅप 

 

fights after marraige InMarathi

 

नात्यात संवाद साधणं खूप गरजेचं असतं.

प्रत्येकजण हल्ली बिझी असतो, मात्र तरिही त्यातून जोडीदारासाठी वेळ काढणं, दिवसभरातील छोट्याछोट्या गोष्टी शेअर करणं महत्वाचं आहे, अन्यथा त्यातून प्रचंड गैरसमज निर्माण होतात.

तुम्हाला एकमेकांचे विचार, भावना समजून घ्यायच्या असतील तर तुमच्यात नियमित संवाद असणं गरजेचं आहे. कधीकधी संवाद नसल्याने नात्यात दुरावा येतो आणि मग तेच घटस्फोटाचे कारण ठरते.

३) महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य 

 

Career Woman

आपली संस्कृती ही पुरुष प्रधान संस्कृती आहे, जिथे पुरुष हाच कर्ताधर्ता मानला जातो. पण आजच्या काळात ही परिस्थिती बदलत चालली असून आता केवळ पुरुषच नाही तर महिला देखील कमवायला लागल्या आहेत.

आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हायला लागल्या आहेत. पण जर तुमची पत्नी तुमच्यापेक्षा जास्त कमावती असेल तर आजही आपल्या देशातील पुरुषांना पटत नाही.

हो, काही पुरुष याला नक्कीच अपवाद असतील, पण महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य हे देखील घटस्फोटाचे एक महत्वाचे कारण आहे.

४) जबाबदारी स्वीकारण्यात कमी पडणे 

 

irrisposible spouse inMarathi

 

लग्न म्हणजेच जबाबदारी, लाग्नासोबतच तुमच्यावर अनेक जबाबदाऱ्या येतात ज्या तुम्हाला स्वीकाराव्या लागतात. तुमच्या जोडीदाराच्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक संकटाला सोबत सामोरे जाण्याची तुमची तयारी असली पाहिजे.

त्याच्या चांगल्या वाईट प्रत्येक गोष्टीत तुम्ही तेवढं जबाबदार आहात हे समजणं आणि ते स्वीकारणं  गरजेचं असतं.

जोडीदाराला दिलेला आधार, वेळोवेळी त्याला किंवा तिला केलेली मदत, घऱच्या जबाबदा-या एकत्र पार पाडणं या सगळ्यामुळे नातं घट्ट होतं.

५) संमतीशिवाय केलेलं लग्न 

 

marriage without concent Inmarathi

 

लग्न ही दोन व्यक्तींच्या जीवनातील सर्वात सुंदर आणि महत्वाची गोष्ट आहे, यामुळे त्या दोघांचचेही जीवन थोड्याफार प्रमाणात का होईना पण बदलते.

ज्यांना त्यांचा संसार सोबत थाटायचा आहे त्यांची त्यासाठी संमती असणे खूप आवश्यक असते. जर त्यांची संमतीच नसेल तर ते नातं फार काळ टिकून राहत नाही. कारण ते नात जबरदस्तीने जोडलेलं असत.

अशी लग्न खूप लवकर तुटतात आणि जरी ती टिकली, तरी ते केवळ समाज आणि कुटुंबाच्या दडपणाखाली जगात असतात.

६) लैंगिक संबंध 

 

unhappy_couple_in_bed Inmarathi

 

सुखी वैवाहिक जीवनात सेक्सचा खूप मोठा वाटा असतो.

जर तुमचे लैंगिक संबंध समाधानकारक असतील तर तुमचं नात जास्त काळ टिकून राहत, त्यामुळे नातं नेहेमी रिफ्रेश होत असत.

पण जर तुमचा जोडीदार हा तुम्हाला समाधानकारक लैंगिक सुख देऊ शकत नसेल तर ते नात फार काळ टिकत नाही.

७) अपेक्षापूर्ती नं होणे 

 

marriage05-marathipizza

 

आपल्या अपेक्षा नेहेमी पूर्ण व्हायलाच हव्यात असे नाही. पण नेहेमी असे बघितल्या गेले आहे की लग्नानंतर ज्याची अपेक्षा केली होती तसे झाले नाही आणि म्हणून देखील नातं तुटतं.

अपेक्षांची पूर्तता जर झाली नाही तर त्या त्या व्यक्तीच्या मनात असंतुष्टता राहते आणि त्यातून राग, चिडचिडेपणा उद्भवतो. पण यावर एक सोपा उपाय आहे, तो म्हणजे अपेक्षा न ठेवणे…!

जेव्हा आपण कुठल्या गोष्टीची अपेक्षाच ठेवणार नाही तर ती पूर्ण नाही झाली याचा त्रासही होणार नाही. अर्थात यामध्ये आपल्या जोडीदाराला त्याच्या गुणदोषासकट स्विकारलं तर यावर भांडणं होणारचं नाहीत.

८) सासू-सुनेची भांडणं 

 

saas-bahu-inmarathi

 

भारतात लग्न हे भलेही दोन व्यक्तींचं होत असल तरी त्यामुळे दोन कुटुंब जुळतात.

त्यामुळे मुलीला सासरी गेल्यावर तिच्या सासरच्या मंडळींसोबत देखील जुळवून घ्यावं लागते.

सासू-सुनेची भांडणं आपल्याकडे काही नवीन नाहीत. पण कधी-कधी जर ही भांडणे विकोपाला गेली तर ते देखील घटस्फोटाचे कारण ठरू शकते.

९) मुलीच्या संसारात माहेरच्यांचा हस्तक्षेप 

 

dominating Mom inmarathi

 

बरेचदा असं होतं की, मुलगी सासरी गेली की तिच्या माहेरचे तिला प्रत्येक लहान-सहन गोष्ट विचारतात, त्यावर तिने सार्सच्या लोकांशी कसे वागावे हे सांगतात.

अश्या वारंवार माहेरच्यांच्या हस्तक्षेपाने देखील मुलीचा संसार चुकीच्या मार्गावर जातो आणि मग शेवटी तो कोर्टाची पायरी ओलांडतो.

१०) वेगळेपण 

 

Angry Indian couple Inmarathi

 

हे मुख्यकरून प्रेम विवाहांत बघायला मिळतात.

ज्यामध्ये धर्म, जात, संस्कृती, जीवनशैली इत्यादी गोष्टींत वेगळेपण आढळून येते यावेळी समजूतदारपणा दाखवत तिच्याशी जुळवून घेणे महत्वाचे असते.

जर ते जमल तर संसाराची गाडी अगदी रुळावर आनंदाने चालते, नाही तर ते नातं टिकून राहण्याची शक्यता फार कमी असते.

ही आणि अशी अनेक करणे आहेत जी घटस्फोटासाठी जबाबदार असतात. पण मुळात अशी वेळच न येऊ देणे यातच शहाणपण आहे…!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?