' आशियातील सर्वात मोठी तोफ: एकदाच चालवली आणि तलाव बनला…. – InMarathi

आशियातील सर्वात मोठी तोफ: एकदाच चालवली आणि तलाव बनला….

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

जगभरातील राजा महाराजांचा इतिहास जेवढा त्यांच्या अलिशान राहणीमानासाठी चर्चिला गेला तेवढा कदाचितच इतर कुठल्या गोष्टीकरिता चर्चेचा विषय ठरला असे.

भारतातील महाराणा प्रताप यांच्या तलवारीची गोष्ट असो किंवा टिपू सुलतानच्या तोफेची. या राजा-महाराजांची शान त्यांच्याकडे असणाऱ्या वेगवेगळ्या शस्त्रांनीच होती.

 

maharana-pratap-inmarathi.jpg

 

राजस्थान येथील एका किल्ल्यात अशीच एक तोफ आहे, जी केवळ एकदाच चालविली गेली. ती एकदाच चालली पण तिचा प्रभाव आजही एका तलावाच्या स्वरुपात बघायला मिळतो. ही तोफ आशियाखंडातील सर्वात मोठी तोफ आहे.

 

१७२६ साली बनविण्यात आलेल्या अरावली येथील पाहाडातील जयगढ येथे या जयबाण तोफेला ठेवण्यात आले आहे.

याचा आकार एवढा मोठा होता की, जेव्हा या तोफेला चालविण्यात आले तेव्हा यामधून निघालेला गोळा हा ३५ किलोमीटर दूर एका गावात जाऊन पडला आणि तिथे चक्क एक तलाव बनला.

या तोफेचं वजन ५० टन आहे. ही तोफ किल्ल्याच्या डूंगर दरवाज्यावर ठेवण्यात आली आहे.

jaygadh-canjaygadh-cannon-inmarathi05non-inmarathi05

 

या तोफेची नळीपासून ते शेवटच्या भागाची लांबी ३१ फुट ३ इंच आहे. म्हणूनच जेव्हा या तोफेतून गोळा सुटला तेव्हा तो जयपूरहून ३५ किलोमीटर लांब असणाऱ्या चाकसू नावाच्या क्षेत्रात जाऊन पडला.

या तोफेच्या गोळ्याने बनलेल्या तलावात आजही पाणी आहे, हे इथल्या लोकांची पाण्याची गरज भागवत आहे.

 

Jaivana-cannon-3 InMarathi

 

या तोफेमध्ये ८ मीटर लांब बॅरल ठेवण्याची सुविधा आहे. म्हणूनच ही तोफ आशिया खंडातील सर्वात मोठी तोफ म्हणून प्रसिद्ध आहे. जाणकारांच्या मते ३५ किलोमीटर पर्यंत निशाना साधण्यासाठी या तोफेला १०० किलो गनपावडरची गरज असेल.

 

Jaivana-cannon-2 InMarathi

 

इतिहासकारांच्या मते या तोफेच्या वजनामुळे तिला कधीही किल्ल्याच्या बाहेर नेण्यात आले नाही त्यामुळे तिचा कुठल्याही युद्धात उपयोग झाला नाही.

 

Jaivana-cannon-4 InMarathi

 

या तोफेला केवळ एकदाच परीक्षण करण्याकरिता चालविण्यात आले. किल्ल्याच्या दक्षिण दिशेने ३५ किलोमीटर दूर असलेला तलाव हा याच तोफेच्या परीक्षण करताना निघालेल्या गोळ्यामुळे बनला आहे, असे सांगितल्या जाते.

 

Jaivana-cannon-6 InMarathi

 

सुरवातीच्या काळात या तोफांचा उपयोग दगड फेकण्यासाठी केल्या जात होता. ही तोफ आधी तांबा आणि कांस्य या धातूपासून बनविण्यात आली.

१५ व्या शतकात ही तोफ ३० इंच परिघाच्या असायच्या आणि १२०० ते १५०० पाउंड वजनाचे दगडाचे गोळे यातून फेकण्यात यायचे.

लोखंडाची तोफ आल्यानंतर लोकांच्या लक्षात आले की दगडांऐवजी लोखंडाच्या गोळ्यांनी जास्त नुकसान पोहोचवता येते, त्यामुळे त्यानंतर लोखंडापासून तयार करण्यात आलेली तोफ आणि गोळ्यांचा वापर केला जाऊ लागला.

===

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?