' या बहुगुणी आणि फायदेशीर पदार्थाबद्दल तुम्हाला माहिती हवेच!

या बहुगुणी आणि फायदेशीर पदार्थाबद्दल तुम्हाला माहिती हवेच!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लेखिका – डॉ. प्राजक्ता जोशी 

==

कुठलाही ऊपवास म्हटला की,  २ गोष्टी हमखास आठवतात, “साबुदाणा खिचडी किंवा वरईचा भात”! तर अशी ही वरई किंवा भगर.

भगरीला samo rice किंवा jungle rice असे देखील म्हणतात. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागात त्याला वरई, वरी, भगर अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं. वनस्पतीशास्त्रानुसार ही millet प्रकारात मोडते. ‘Proso Millet’ हे वरईचे नाव आहे. वरई म्हणजे सर्व पोषकांशाची पुर्तता करणारा अल्पाहाराचा ऊत्तम पर्याय आहे.

 

 

वरईचे ईतर  ऊपयोग पुढीलप्रमाणे :

1) यात anti ooxidants चे प्रमाण भरपूर असते. त्यामुळे त्वचा, केस यांचे आरोग्य राखण्यास मदत होते.

2) यातील lecithin हा घटक nervous system मजबुत करतो व त्याचे कार्य सुकर करतो.

3) Pellagra हा कुपोषणजन्य व्याधी vitamin B3-niacin च्या कमतरतेमुळे होतो. त्यात त्वचा खरखरीत होऊन खवले पडू लागतात.

वरईमध्ये vitamin B3 भरपुर असते. त्यामुळे या रूग्णांना वरई अवश्य द्यावी. तसेच ज्या व्यक्तीचा प्राथमिक आहार मांसाहार आहे. त्यांनाही B3 ची कमतरता जाणवू शकते. अशा व्यक्तींनी भगरीचा समावेश आहारात करावा.

 

 

difference-between-biryani-pulao-inmarathi02

 

4) Calcium प्रचुर मात्रेत असल्याने हाडांची वाढ व आरोग्य राखण्यासाठी ऊपयुक्त ठरते. त्यामुळे लहान मुलांना तसेच वृद्धांना वरई ऊपयुक्त ठरते.

5) वरईतील काही घटक c-reactive protien चे concentration कमी करतात व हृदयरोगाचे प्रमाण घटवते.

6) वरईमध्ये phytic acid हे phytochemical असते. जे cholesterol चे नियमन करते.

7) यातील lignan हा घटक सस्तन प्राण्याच्या आंत्रामध्ये (intestine) मध्ये गेल्यावर mamellian lignan मध्ये परावर्तीत होतो व स्तनांचा कर्करोग होण्याचा धोका टळतो.

8) पेशींच्या वाढीसाठी आवश्यक phospherous यात भरपूर असतो.

 

bhagar-inmarathi

 

9) Magnessium चे प्रमाण भरपूर असल्याने रक्तातील glucose  नियंत्रित ठेवून insulin चे सुद्धा नियमन करते. अशा प्रकारे type-2 diabetes मध्ये उपयुक्त ठरते.

10) यातील insoluble fibers अतिरीक्त bile ची निर्मीती थांबवतात. त्यामुळे पित्ताशयातील खड्यांची (gall stones) निर्मिती थांबते.

11) ज्वारी, गहू, बाजरी, धान्ये ही भारतीय आहाराचा पाया आहेत व ती रोजच्या आहारात समाविष्ट असतात. पण वरई हे एकमेव आहे जे पूर्णतः gluten free आहे. त्यामुळे gluten allergy, celiac disease मध्ये उपयुक्त ठरते.

12) Fiber भरपूर व पचनास हलकी असल्याने वरई भुकेचे शमन करते. वजन कमी करताना वरईचा नक्कीच उपयोग होऊ शकतो.

आयुर्वेदानेही वरई स्थौल्य कमी करताना उपयुक्त सांगितली आहे. तसेच कफाचे संतुलन करणारी सांगितली आहे. अधिक प्रमाणात खाल्यास पित्त व वात दोषाचे वर्धन करते.

अग्नीमांद्य (पचनशक्ती कमी होणे) या व्याधीत वरई उपयुक्त सांगितली आहे. कफजन्य व्याधीत उपयुक्त सांगितली आहे.

टिप—थायराॅईडीसमचा त्रास असल्यास वरई टाळावी. कारण त्यात काही goiterogenic properties आढळतात.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “या बहुगुणी आणि फायदेशीर पदार्थाबद्दल तुम्हाला माहिती हवेच!

  • September 23, 2019 at 2:30 pm
    Permalink

    Bhagar khalltavar highper acidity hotel ka? Highper acidity asel tar bhagar khau shato ka?

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?