' या “११” विदेशी शहरांना देण्यात आली आहेत आपल्या भारतीय शहरांची नावं – InMarathi

या “११” विदेशी शहरांना देण्यात आली आहेत आपल्या भारतीय शहरांची नावं

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

===

आपण नेहमी बोलतो की, आपल्या देशातील लोकं विदेशी गोष्टींच्या मागे लागले आहेत. त्यामुळे ते प्रत्येक गोष्टीत विदेशींची कॉपी करण्याचा प्रयत्नात असतात. मग ते वेशभूषेत असो किंवा बोलण्यात असो.

आपण विदेशींच्या प्रत्येक गोष्टीपासून प्रभावित असतो आणि त्याचं काही अंशी का होईना अनुकरण करण्याचा प्रयत करत असतो. पण काय आपणच त्याचं अनुकरण करतो? तर असे नाही ते देखील काही गोष्टींत आपले अनुकरण करतात.

जसे की जगातील अशी काही राष्ट्र आहेत ज्यांनी आपल्या देशातील ठीकांणांना आपल्या भारतातील शहरांची नाव दिली आहेत. आश्चर्य वाटतय ना.. पण हे सत्य आहे.. आज आम्ही तुम्हाला अश्याच ११ विदेशी ठिकाणांबद्दल सांगणार आहोत ज्यांना आपली स्वदेशी नाव देण्यात आली आहे.

१. डेल-हाई (कॅनडा) :

देशाची राजधानी दिल्ली (Delhi) शिवाय युएसमध्ये देखील याच नाव आणि स्पेलिंगचं एक ठिकाणं आहे Delhi.

एवढचं काय तर कॅनडाच्या ऑन्टारियो शहरात देखील याच नावाचे एक ठिकाण आहे पण तेथे त्या ठिकाणाला Delhi नाही डेल-हाई म्हटले जातं.

 

delhi-inmarathi00

 

२. कोलकत्ता (युएस) :

युएसमध्ये Calcutta नावाचं शहर हे १८७० साली वसवण्यात आलं होतं.

या ठिकाणी कोळश्याच्या खाणी होत्या. तर भारतातील Calcutta, म्हणजेच कोलकाता तेथील संस्कृती आणि कलेसाठी प्रसिद्ध आहे.

 

Calcutta-inmarathi

 

३. लखनऊ (अमेरिका) :

लखनऊ म्हणजे ‘ढगांत बनलेला महाल’..

भारतातील लखनऊ म्हणजे संस्कार आणि रॉयल याचं मिश्रण तर अमेरिकेत देखील एक लखनऊ आहे, जो पहाडावर ५ हजार एकरात बनलेलं एक अलिशान मेंशन आहे.

 

lucknow-inmarathi

 

४. पटना (स्कॉटलंड) :

एकेकाळी मगध राज्याची राजधानी असणारी पटना, भारताचा इतिहास सांगतो. तर इकडे स्कॉटलंड मध्ये देखील याचं नावाचं एक सुंदर गावं आहे.

या गावाचं नाव या गावाला वसवणाऱ्या William Fullarton यांनी ठेवलं होत.

William Fullarton यांचे वडील इस्ट इंडिया कंपनीत काम करायचे आणि त्यांच्याच तोंडून William Fullarton यांनी हे नाव ऐकलं होत, जे त्यांना खूप आवडलं होत.

 

patna-inmarathi

 

५. ठाणे (ऑस्ट्रेलिया) :

महाराष्ट्रातील ठाणे याबद्दल तर आपण सर्वच जाणतो, पण काय तुम्हाला माहित आहे की, ऑस्ट्रेलियात देखील एक ठाणे नावाचं शहर आहे.

 

Thane-inmarathi

 

६. इंदौर (युएस) :

मध्यप्रदेशातील इंदौर, जे तेथील सेव-पोहे करिता खूप प्रसिद्ध आहे. पण युएसच्या West Virginia येथे देखील एक इंदौर आहे.

पण हा शब्द हिब्रूच्या ‘Endore’ यापासून घेण्यात आला आहे ज्याचा अर्थ एखाद्या ठिकाणी राहणे असा होतो.

 

indore-inmarathi

 

७. ढाका (बांगलादेश) :

बांगलादेश येथील ढाका जी बांगलादेशची राजधानी आहे, पण आपल्या भारतातील बिहार राज्यात देखील ढाका नावाचे क्षेत्र आहे.

 

dhaka-inmarathi

 

८. हैद्राबाद (पाकिस्तान):

भारतातील हैद्राबाद या शहराचे नाव याला वसवणाऱ्या राजाच्या आवडत्या नृत्यांगनेच्या नावावर पडले. आज हे शहर येथील बिर्याणी आणि चार मिनार करिता जगविख्यात आहे.

तर एक हैद्राबाद पाकिस्तानात देखील आहे. ज्याच नाव हैदर आली यांच्या नावावर ठेवण्यात आले आहे, जे पैगंबर मोहोम्मद यांचे भाऊ होते.

 

hyderabad-inmarathi01

 

९. कोची (जपान) :

कोची हे केरळचे सर्वात सुंदर शहर आहे, तर एक कोची जपान येथे देखील आहे जे एक टूरिस्ट डेस्टिनेशन आहे.

 

kochi-inmarathi

 

१०. सलेम (युएस) :

तामिळनाडू येथील पौराणिक शहर सलेम याचा उल्लेख आपल्याला पहिल्या आणि दुसऱ्या शतकाच्या पुस्तकांत सापडतो. जेव्हा की युएस येथील सलेम हे हिब्रू भाषेतून घेण्यात आले आहे ज्याचा अर्थ ‘शांती’ असा होतो.

 

salem-inmarathi

 

११. फरीदकोट (पाकिस्तान) :

भारतातील पंजाब राज्यात फरीदकोट नावाचा एक जिल्हा आहे. याचं नावाचे एक ठिकाण पाकिस्तानात देखील आहे.

पाकिस्तानचे फरीदकोट २६/११ मुंबई हल्ल्या नंतर जास्त चर्चेत आले, २६/११ मुंबईच्या हल्ल्यातील आतंकवादी कसाब हा इथलाच राहणारा होता.

 

Faridkot-inmarathi

 

जर तुम्ही देखील या ठिकाणी गेलात तर त्या शहरांची नावे एकूण आश्चर्यचकित होऊ नका…

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?