' विष्णूद्वेषामुळे पडलं भारतातील या ठिकाणाचं नाव – InMarathi

विष्णूद्वेषामुळे पडलं भारतातील या ठिकाणाचं नाव

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

प्राचीन काळापासून ते आजवर सत्तेच्या माजापायी अनेकांनी आपला जीव गमावला. त्या सत्तेच्या नादी लागून ते स्वतःला सर्वशक्तिमान समजू लागले आणि अखेर त्यांची हीच वृत्ती त्यांच्या शेवटाचे कारण ठरली. याची अनेक उदाहरणे आज आपण देऊ शकतो.

माणसाने कधीही स्वतःला सर्वशक्तिमान समजू नये कारण ज्याला उगम आहे त्याचा अंतही आहे, पण काहीजण या गोष्टी विसरतात आणि त्यांना एका भयानक शेवटला सामोरे जावे लागते. याचच एक उदाहरण म्हणजे हिरण्यकश्यपू.

 

hardoi-inmarathi03

 

राग, द्वेष आणि लोभ हे मानवाचे शत्रू आहेत हे आपल्या पुराणांत लिहिलेले आहे, तसेच अनेक कथांमधून आपल्याला वारंवार याची जाणीवही करवून देण्यात येते. तरी देखील माणसाची लोभ आणि रागीट वृत्ती सर्वकाही संपवून जाते.

अशीच एक कथा आहे हिरण्यकश्यपूची. जो भगवान विष्णूचा एवढा द्वेष करायचा की त्याने एका ठिकाणाचे नावच विष्णूच्या विरोधात ठेवले.

 

hiranyakashyap-InMarathi

 

विष्णुपुराणात या संबंधी एक कथा आहे. ज्यात हिरण्यकश्यपू भगवान विष्णूचा किती द्वेष करायचा यासंबधी एक प्रसंग सापडतो.

हिरण्यकश्यपू याचा विष्णूच्या नरसिंह अवताराने वध केला हे तर आपण सर्वच जाणतो. पण तो विष्णूचा एवढा द्वेष करायचा की त्याने एका ठीकाणाचे नामकरण केवळ विष्णूद्वेशापायी केले होते हे कदाचितच आपल्याला ठाऊक असेल.

 

hiranyakashyap-4 InMarathi

 

त्याने या ठीकाणाचं नाव हरिद्रोही ठेवले होते. ज्याचा अर्थ हरी म्हणजेच विष्णू-विरोधी असा होतो. त्याच्या द्वेषाची ही परिसीमाच म्हणावी.

त्याने या जागेच नाव हरिद्रोही याकरिता ठेवले कारण तेथील जास्तीत जास्त लोकं हे हरी भक्त होते. त्यासोबतच त्याची अशी इच्छा होती की, त्या ठिकाणावरील सर्व हरी-भक्तांना ठार करण्यात यावं, नाहीतर त्यांना नास्तिक बनविण्यात यावं.

 

hardoi-InMarathi

 

उत्तरप्रदेशातील ज्या ठिकाणाला आज हरदोई म्हणून ओळखल्या जात तेच हे हरिद्रोही.

हिरण्यकश्यपू हा एक राक्षस होता, याने ब्रह्म देवाला प्रसन्न करून असे वर प्राप्त केले की, त्याला कुठलाही मनुष्य अथवा प्राणी मारू शकत नाही, तो नाही दिवसा मरणार ना रात्री, त्याला ना शस्त्र मारू शकणार ना अस्त्र, तो नाही घरात मरणार ना घरा बाहेर.

हे वरदान प्राप्त करून तो अहंकारी बनला, तो स्वतःला अमर समजू लागला, त्याला कशाचेही भय राहिले नाही, तो स्वतःला सर्वात श्रेष्ठ माणू लागला. त्याने इंद्राचे राज्य हिसकावून घेतले, प्रजेवर अत्याचार केले. त्याने त्याच्या राज्यात विष्णूची पूजा करण्यावर बंदी आणली, त्याचं म्हणणं होत की सर्वांनी त्याची पूजा करावी.

 

hiranyakashyap-1 InMarathi

 

हिरण्यकश्यपूची दुरसी पत्नी ही विष्णूभक्त होती, ती हरदोई येथील राहणारी होती. तिच्या पहिल्या प्रसुतीवेळी ती तिच्या माहेरी गेली, हरदोई येथील लोकं हे विष्णूभक्त होते. त्यामुळे तिचा पुत्र म्हणजेच प्रह्लाद हा देखील विष्णू भक्तीत रमला.

आपला मुलगा हा आपल्या शत्रूचा भक्त आहे हे बघून हिरण्यकश्यपू संतापला, त्याने अनेकवेळा प्रह्लादला समजवले की तू विष्णूची भक्ती नाही करायची, तुझा देव मी आहे. पण बाळ प्रह्लाद काही केल्या मानत नव्हता, तेव्हा त्याने अनेक प्रकारे प्रह्लादला शिक्षा देण्याचा, त्याला मारण्याचा प्रयत्न केला.

 

hiranyakashyap-3 InMarathi

 

पण विष्णूने प्रत्येक वेळी त्याचे रक्षण केले आणि अखेर हिरण्यकश्यपूचा वध करून त्याच्या जाचातून सर्वांना सोडवलं… प्रह्लाद हा हरदोई येथे जन्मला आणि म्हणून तो विष्णू भक्त झाला, त्यामुळे तिथे परत कोणीही विष्णू भक्त जन्माला येऊ नये म्हणून हिरण्यकश्यपूने त्या ठिकाणाचं नाव हरिद्रोही ठेवल होतं.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?