' बालिका वधू ते आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू : वाचा एका प्रेरणादायी स्त्री ची कहाणी

बालिका वधू ते आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू : वाचा एका प्रेरणादायी स्त्री ची कहाणी

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आपल्या आयुष्यामध्ये असे कितीतरी प्रसंग येतात, जेव्हा आपण खचून जातो आणि आपला स्वतःवरील विश्वास कमी होत जातो. त्यावेळी आपण डिप्रेशनमध्ये जाण्याची शक्यता असते आणि आपण स्वतःला खूप एकटे समजत असतो.

याचवेळी आपल्याला खरेतर प्रेरणा देणाऱ्या व्यक्तीची गरज असते आणि तशी व्यक्ती मिळाल्यास आपल्याला आपला आत्मविश्वास परत मिळवण्यासाठी मदत होते आणि आपण तिच्याकडून प्रेरणा घेत आलेल्या संकटाना सामोरे जात, आपले आयुष्य जगू लागतो.

आज आम्ही अशाच एका प्रेरणादायी स्त्रीविषयी सांगणार आहोत, जिने केवळ १४ व्या वर्षी दोन जुळ्या मुलांना जन्म दिला आणि तरी आज ती एक आंतरराष्ट्रीय रेसलर आहे. चला तर मग जाणून घेऊया, या धाडसी आणि महत्त्वाकांक्षी स्त्रीबद्दल..

 

neetu sarkar InMarathi

 

या महत्त्वाकांक्षी स्त्रीचे नाव नीतू सरकार आहे. वयाच्या १३ व्या वर्षी तिचे जबरदस्ती लग्न करून देण्यात आले आणि वयाच्या १४ व्या वर्षी तिने जुळ्या मुलांना जन्म दिला.

या स्त्रीची विल पॉवर खूपच अद्भुत आहे. आर्थिक आणि सामाजिक समस्या असूनही ही स्त्री आज आंतरराष्ट्रीय रेसलर बनली आहे.

नीतूची आर्थिक परिस्थिती खूप बिकट होती. गरिबीमुळे तिच्या आई – वडिलांनी तिला भिवानीच्या एका गावात ४३ वर्षाच्या व्यक्तीला विकले. या माणसाची मानसिक स्थिती देखील चांगली नव्हती.

नीतू तिथून तीन दिवसातच पळून परत आपल्या घरी आली. पण आपल्या मुलीला पाहून तिचे निर्दयी पालक जराही आनंदी नव्हते आणि लगेच त्यांनी तिचे दुसरे लग्न करून टाकले.

 

neetu sarkar 1 InMarathi

 

नितूचा दुसरा नवरा बेरोजगार होता आणि कुटुंबाचा खर्च आईच्या पेन्शनने चालवत असे. या गरिबीला कंटाळून नितूने आपले पॅशन फॉलो करण्याचा निर्णय घेतला.

नितूने सांगितले की,

“ माझे आई – वडील माझ्या कुस्तीच्या विरोधात होते. मी ड्रेस घालून कुस्ती लढत असे. मला कुस्ती खूप आवडत असे. पण माझ्या घरातल्यांनी माझे लग्न लावून दिले. त्यांनतर मला मुले झाली.

 

neetu sarkar 5 InMarathi

 

पण मी जेव्हाही एखाद्या मुलीला कुस्ती करताना पाहत असे, तेव्हा मी खूप उत्सुक होत असे. मी त्यांना या खेळाविषयी विचारात असे. १४ वर्षातच आई बनल्यानंतर मी दोन तीन वर्ष त्यातच अडकून राहिले. पण शेवटी मी माझ्या स्वप्नांना सत्यात उतरवण्याचा निर्णय घेतला.”

 

neetu sarkar 2 InMarathi

 

नितूला आपल्या गावामधून खूप विरोध सहन करावा लागला. तिने सांगितले की, लोक तिच्या नवऱ्याला तिला कुस्तीला न पाठवण्याचा सल्ला देत असत. पण या प्रकरणामध्ये तिच्या नवऱ्याने नेहमी तिचे समर्थन केले.

तो म्हणत असे की,

“तुला जिंकण्याची गरज नाही. मला तुझा विजय नको आहे. माझी इच्छा आहे कि, तू खूप मेहनत कर आणि आपले पॅशन फॉलो कर.”

 

neetu sarkar 3 InMarathi

 

आपल्या नवऱ्याच्या पाठिंब्यामुळे नीतू निश्चिंत झाली. ती दररोज सकाळी ३ वाजता उठते, दीड तास प्रवास करून रोहतकच्या जवळ असलेल्या गावात जाते आणि साडे पाच वाजता ट्रेनिंगची सुरुवात होते. ती सहा तास वर्कआउट आणि ट्रेनिंग करते आणि घरी येता – येता तिला नऊ वाजतात.

नीतू म्हणाली आहे की,

“जे लोक सुरुवातीला माझ्या आणि माझ्या पॅशनच्या विरोधात होते, तेच आज माझ्याकडे येऊन त्यांच्या मुलींना रेसलिंग शिकवण्यास सांगतात. ते लोक म्हणतात की, यांना तुझ्याबरोबर ठेव आणि तुझ्यासारखे बनव.”

कितीतरी वर्षांच्या मेहनतीनंतर आज नीतू एक आंतरराष्ट्रीय स्तरावरची रेसलर बनली आहे. तिने यावर्षी झालेल्या इंडियन नॅशनल गेम्समध्ये रौप्य पदक पटकावले आहे आणि ब्राझीलमध्ये झालेल्या ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते.

 

neetu sarkar 4 InMarathi

 

अशा या धाडसी स्त्रीने कोणाच्याही विरोधाला न जुमानता आपले स्वप्न साकार केले. आपल्या समाजातील तरुण स्त्रियांनी यातून नक्कीच शिकवण घेतली पाहिजे आणि आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी नेहमी झटले पाहिजे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?