' सासरचीच माणसं “सुनेला” देहविक्रीला भाग पाडतात, ‘परना’ समाजाचे भयंकर वास्तव! – InMarathi

सासरचीच माणसं “सुनेला” देहविक्रीला भाग पाडतात, ‘परना’ समाजाचे भयंकर वास्तव!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

=== 

आज आपल्या देशातील स्त्रियांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये आपले नाव कमवले आहे. क्रीडा, राजकारण, समाजकारण अशा सर्व क्षेत्रांमध्ये आज स्त्रिया अग्रेसर आहेत. मोठ्मोठ्या पदांवर काम करून इतर स्त्रियांना पुढे जाण्यासाठी प्रेरित करत आहेत.

सध्या स्त्रिया या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून चालतायत!

काही क्षेत्रांमध्ये तर स्त्रिया या पुरुषांच्या एक पाऊल पुढे गेल्याच आपल्याला माहीत आहे, पण असे असले तरी देखील अजूनही स्त्रियांवर होणारे अत्याचार काही केल्या कमी होत नाही आहेत. प्रत्येकवेळी स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांच्या बातम्या समोर येताना दिसत आहेत.

jobs-for-women InMarathi

 

आणि हे अत्याचार किंवा ज्याला आपण harassment असेही म्हणू शकतो, ते प्रत्येक ठिकाणी होताना आपल्याला दिसत आहेत! फक्त कामाच्या ठिकाणी नव्हे तर कित्येक सार्वजनिक ठिकाणी तसेच स्वतःच्या घरी सुद्धा स्त्रियांवर अत्याचार होतच आहेत!

स्वतःच्या घरातच एखाद्या स्त्रीला असुरक्षित वाटणे यासारखी शरमेची गोष्ट दुसरी नाही! आपल्या देशात स्त्री ला जन्मापासूनच याचा सामना करावा लागतो!

त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेवर नेहमीच प्रश्नचिन्ह निर्माण होताना दिसतात. आज आम्ही तुम्हाला एका अशा समुदायाबद्दल संगाणार आहोत, जिथे मुलींची विक्री तिच्याच घरच्यांकडून होते.

एवढेच नाही तर लग्नानंतर देखील त्यांच्या सासरची माणसे तिला वेश्याव्यवसाय करण्यासाठी प्रवृत्त करतात.

women prostitutes 1 InMarathi

 

एखादी स्त्री लग्न करून आपल्या सासरी जाते आणि तिला अशा लोकांसमोर बसवले जावे, जे तिला खरेदी करण्यासाठी आले आहेत. त्यावेळी त्या स्त्रीला काय वाटत असेल, याचा विचारही आपण करू शकत नाही. पण या समुदायामध्ये असचं घडतं.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

दिल्लीच्या नजफगढमध्ये एक असा समुदाय आहे, जिथे सासरची माणसे स्वत:च आपल्या सुनेला वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त करतात. या समुदाययाचे नाव ‘परना’ असे आहे.

माहितीनुसार प्रेमनगरच्या वस्तीत राहणारे ‘परना’ जातीतील लोक खूप काळापासून येथे राहत आहेत. हा धंदा ‘परना’ समुदायातील लोक कितीतरी पिढयांपासून करत आहेत.

 

 

 

women forced for prostitution
entertales

या समुदायातील मुलींचे लग्न १२ ते १५ वर्षांच्या वयामध्ये केले जाते. वेश्या व्यवसायाच्या बरोबरच या मुली घरातील काम देखील करतात. आपल्या पती आणि मुलांसाठी जेवण बनवल्यानंतर रात्री या वेश्या व्यवसायासाठी निघतात.

जी सून वेश्याव्यवसाय करण्यासाठी नकार देते, तिच्यावर अत्याचार केले जातात. कधी-कधी तर त्यांना ठार देखील केले जाते. हेच कारण आहे की, कितीतरी स्त्रियांना आपल्या इच्छेविरुद्ध या धंद्यात यावे लागते.

prostitution-brothel-girls-in-india InMarathi

आश्चर्यचकित करणारी गोष्ट म्हणजे त्यांचे आई – वडील स्वत:च आपल्या मुलींना या व्यवसायात ढकलतात. ते आपल्या मुलींना शिकवत नाही, तर त्यांचे लहान वयामध्येच लग्न करून दिले जाते.

असे देखील म्हटले जाते की, मुली जन्मल्यावरच त्यांना ट्रेनिंग देण्यासाठी दलालांकडे पाठवले जाते. त्या बदल्यात मुलींच्या पालकांना पैसे दिले जातात.

Child-prostitution InMarathi

या समुदायामध्ये मुलींचे लग्न होत नाहीत, तर त्यांना विकले जाते. सासरचे लोक चांगली ऑफर देऊन मुलींना खरेदी करतात. अशामध्ये ज्या मुलाकडचे लोक जास्त पैसे देतात, मुलगी त्यांची होते. पण हे लग्न नसते, तर एक प्रकारचा करार असतो.

सासरी गेल्यावर देखील तिची या गोष्टींपासून सुटका होत नाही. तिथे तर सासरची माणसे स्वत:च आपल्या सुनेसाठी ग्राहक शोधतात.

 

perna prostitution
women planet

 

सर्वच स्त्रियांना ही परंपरा आवडते असे नाही, तर काही स्त्रियांनी या विरोधात आवाज देखील उठवला आहे. पण त्यामुळे खूप स्त्रियांना आपला जीव गमवावा लागला आहे. या दलदलीत फसलेल्या काही स्त्रिया शिक्षण घेऊ इच्छित आहेत.

पण याचे जाळे एवढे मोठे आहे की, स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या संघटनांचा आवाज देखील या समुदायापर्यंत पोहचत नाही.

perna girl
badlega india

 

या स्त्रियांवर होणारा अत्याचार रोखणे खूपच गरजेचे आहे. जर सरकारने या मुद्यांकडे लक्ष दिले आणि या विकृत परंपरेला येथेच थांबवले तर कितीतरी स्त्रियांचे जीवन वाचू शकते आणि त्या या कचाट्यातून निघून त्या चांगले आयुष्य जगू शकतात!

अशी अजून किती गावं, किती समाज आहेत जिथे स्त्रियांवर असे किळसवाणे आणि जीवघेणे अत्याचार होतात याची आपल्याला अजिबात माहिती नाही!

अशा अजून किती महिला आहेत ज्या अशा घाणेरड्या परंपरेमुळे अडकून बसल्या आहेत, त्यांना यातून बाहेर काढणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?