' आत्मविश्वासाने प्रेझेन्टेशन, भाषण करायचंय? मग या ५ महत्त्वाच्या गोष्टी आत्मसात करा… – InMarathi

आत्मविश्वासाने प्रेझेन्टेशन, भाषण करायचंय? मग या ५ महत्त्वाच्या गोष्टी आत्मसात करा…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

===

आपल्या सगळ्यांना विविध क्षेत्रात, कुठे नं कुठे, वेगवेगळ्या विषयावर प्रेझेन्टेशन (भाषण)  द्यायची वेळ नक्की येते. मग ते लहान-सहान मिटिंग्जमध्ये असो किंवा शंभर-हजार श्रोत्यांसमोरचं व्यासपीठ असो.

त्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवून, step by step तयारी केलेली असली की प्रेझेन्टेशन करणं आणि ते लोकांना आवडणं अगदी सोप्प होतं. चला तर मग अश्या भाषण/प्रेझेंटेशनच्या यशाच्या ५ सोप्या स्टेप्स जाणून घेऊन या.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

१. पूर्वतयारीच्या पण आधी…!

प्रेझेन्टेशन च्या पूर्वतयारीच्या देखील आधी काही गोष्टी ठरवणं गरजेचं असतं. त्यातून आपण स्वतःला ‘क्लियर’ होतो आणि पुढे तयारी करतांना ‘Basic’ मुद्द्यांचा प्रश्न उद्भवत नाही.

 

presentation preparation InMarathi

 

सगळ्यात आधी प्रेझेन्टेशन चा विषय ठरवणं महत्वाचं आहे. आपण प्रेझेन्टेशन नेमकं कशावर देतोय हे आधी नीट समजून घ्या. शंका असल्यास त्यांचं निरसन करून घ्या. विषय ठरल्यावर त्याची आपल्याला असलेली माहिती आठवून घ्या.

भाषणात अजून काय मांडायचं आहे? त्यासाठी काय वाचावं लागेल? कोणाशी चर्चा करावी लागेल? हे देखील ठरवून घ्या.

म्हणजे आपल्या प्रेझेन्टेशन चा विषय, त्यासाठी लागणारी स्पष्ट आणि खरी माहिती, त्याची माहिती उपलब्ध करून देणारी माणसं अथवा साधनं (पुस्तक, लेख, ऑडीओ-व्हीडीओ क्लिप्स) ह्या सगळ्या बद्दल workout करा.

शक्यतो हे कागदावर नोट करून ठेवा, पुढे नं आठवल्यास अश्या नोट्स उपयोगी ठरतील.

२. प्रेझेन्टेशन ची पूर्व तयारी

सगळ्या गोष्टींची जमवा-जमव झाली की त्यावर दोन-तीन दिवस छानसं ‘चिंतन’ करायचं. ह्या चिंतनात, विषयावरचं तुमच मत ठरवा आणि ते पक्क करा. ह्या सगळ्या गोष्टी झाल्या की आपण प्रेझेन्टेशन चे कच्चे टिपण (Rough points) काढू शकतो.

भाषणात आपल्याला जे मांडायचं आहे, त्याचे कच्चे मुद्दे नोट करून घ्या. त्याचा किती विस्तार करायचा, त्यावर काय बोलायचं हे देखील लगेच ठरवून घ्या.

त्यावर बोलतांना द्यावे लागणारे संदर्भ (References) देखील वेगळे नोट करून घ्या. ती गोष्ट श्रोतेवर्गाला व्यवस्थित समजावी ह्यासाठी उदाहरणं, शक्य झाल्यास लहानशी कथा, काही आकडेवारीचे रिपोर्ट्स इत्यादी नोट करून त्याची पण जमवाजमव करून ठेवा.

 

prepare for PPT InMarathi

सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्यात हे पाहून, पुढच्या पायरीकडे वळायला हरकत नाही.

३. प्रेझेन्टेशन चं “लेखन”…!

सगळे साधन तयार झाले की कंटाळा नं करता अख्खं भाषण / प्रेझेन्टेशन लिहून काढायचं.

  • प्रास्ताविक (विषयाबद्दल थोडक्यात)
  • मूळ मुद्दे आणि त्यावरील आपले मत
  • विरोधी मत – त्याचं खंडन आणि
  • भाषणाचा निष्कर्ष

अश्या ढोबळ टप्प्यात लिहीलं म्हणजे आपलं म्हणणं योग्य पद्धतीने मांडता येतं.

planning Sequence InMarathi

लिहितांना श्रोतेवर्गाला समजतील आणि तुम्हाला सुद्धा आठवायला आणि उच्चारासाठी सोपे असतील असेच शब्द घ्यायचे. भाषण / प्रेझेन्टेशन दोन-तीन वेळा वाचून त्यात वाक्यरचना, व्याकरण, शब्द ह्यात हवे ते फेरबदल करायचे आणि भाषण व्यवस्थित लिहून झालं की एकदा “काही चुकीचं तर नाही ना ?” हे पाहण्यासाठी एकदा वाचून घ्यायचं.

शब्दांचे अर्थ, म्हणींचे अर्थ, वापरलेले संदर्भ किंवा आकडेवारीचा खरे-खोटे पणा हे तपासायला विसरायचं नाही! गरज वाटल्यास, त्या बाबतीतल्या जाणकार मित्रांना देखील एकदा लिहलेलं भाषण दाखवून घ्यावं.

सगळ्या प्रेझेन्टेशनचं व्यवस्थित लेखन पार पडल्यावर ते सादर करतांना साधारण किती वेळ लागतोय, हे लगेच तपासून घ्या. नियोजित वेळेत बसत आहे का – हे पाहून घ्या. नाही, तर आवश्यक ते बदल करून पुढची स्टेप करायला हरकत नाही.

४. प्रेझेन्टेशन चा सराव

सरावासाठी,  प्रेझेन्टेशन आणि  त्यातले शब्द, मुद्द्यांची सुसंगती हे सगळं लक्षात असणं गरजेचं असतं. पण भाषण /प्रेझेन्टेशन आणि पाठ करणं अगदी चुकीचं आहे. म्हणून ते ६-७ वेळा किमान मन लावून वाचावं. आपण एखादी favorite फिल्म किंवा सिरीयल पाहतो अगदी तस्सचं! ते किती लक्षात राहत आहे, हे लगेच तपासून पाहायचं. गरज वाटल्यास पुन्हा दोनदा-तीनदा वाचून घ्या.

प्रेझेन्टेशन सगळं आठवत आहे, हे पक्कं झालं की त्याची तयारी सुरु होते.

भाषणात कसं बोलायचं आहे, कुठे थांबायचंय, कुठे आवाज उंचवायचे, कुठे लहान करायचे – इतकंच काय तर भावनिक विषयांवर बोलतांना कधी गहीवर फुटल्यासारख बोलायचं – हे सगळं ठरवून घ्या आणि मग त्याप्रमाणे तालीम करा!

भाषणाची  / प्रेझेन्टेशनची उजळणी करतांना थोडंसुद्धा लाजू नका. भाषणाचा आवाज, हावभाव आणि हातवारे सगळळं भाषणाच्या उजळणीमध्येच करून पहावं. आरशासमोर उभे राहून ते कसं वाटतंय, हे बघा. आवडलं तर तीच पद्धत ठेवा नाहीतर दुसरं काही शोधा.

प्रॅक्टिस, प्रॅक्टिस, आणि प्रॅक्टिस हाच खऱ्या यशाचा महामंत्र आहे, हे अजिबात विसरू नका

 

एक प्रकारे ही स्टेप म्हणजे एखाद्या मोठ्या क्रिकेट मॅच आधीची नेट प्रॅक्टिस असं आपण समजू शकतो

net Practice iNmarathi

५. प्रेझेन्टेशन सादरीकरणा आधी

प्रेझेन्टेशन व्यवस्थित मांडता येतंय असा आत्मविश्वास आला, की आपल्या घरचे, मित्र-मैत्रिणी, आपल्या माहितीमधील भाषणं करणारे व्यक्ती ह्यांच्या समोर सादरीकरण करून पहा. त्यांनी सांगितलेले बदल योग्य वाटल्यास लगेच बदल करा.

त्यासोबतच घश्याचा त्रास ऐनवेळी उभा राहणार नाही ह्याची पण काळजी घ्या. त्यादिवशी आपला पोशाख, आपल दिसणं ह्या गोष्टींची पण तयारी करायला विसरू नका. सगळी तयारी छान झाली की संपूर्ण आत्मविश्वासाने भाषणाला उभे रहा…!

मित्रांनो, मग हे प्रेझेन्टेशन तुमचं असो, अथवा आपल्या पंतप्रधान मोदींचे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मधील भाषण असो.
चारचौघां समोर, अथवा मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या लोकांसमोर एकदम आत्मविश्वासाने बोलण्याचा, स्वतःला परिणामकारकरीत्या व्यक्त करण्यासाठी लागणाऱ्या तयारीचा मार्ग एकच आहे…

Confident Presentation Modi inmarathi

 

तुम्हाला ही माहिती उपयोगी पडली तर नक्की कळवा. तुमच्या कल्पना, सूचना आवर्जून शेयर करा.

– तुमचाच मित्र,
अजिंक्य

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?