' एक वेगळीच भूमिका बजावणारं ‘जेलीफिश लॉज’, काय आहे ही भानगड? – InMarathi

एक वेगळीच भूमिका बजावणारं ‘जेलीफिश लॉज’, काय आहे ही भानगड?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

समुद्रातील जीवन योग्यप्रकारे चालण्यासाठी त्यामधील मासे महत्त्वाची भूमिका बाजावतात. समुद्रामध्ये देखील जलचरांचे एक वेगळे विश्व पाहण्यास मिळते आणि ते विश्व आपल्यापेक्षा कितीतरी वेगळे असते.

याच माशांमधील एक म्हणजे जेलीफिश. जेलीफिश तुम्ही सहसा टीव्हीवर किंवा चित्रांमध्ये बघितली असेल, कारण ती भारतात खूप कमी प्रमाणात पाहण्यास मिळते. जेलीफिश नदी आणि तलावांना साफ करू शकते, असे जैनीन हंग नावाच्या स्त्रीचे म्हणणे आहे.

जैनीन हंग एक जेलीफिश लॉज चालवते. आपल्या या लॉजमधून ती फक्त अन्नच उगवत नाही, तर हवा, पाणी आणि जमीन शुद्ध करण्यासाठी देखील एक महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

 

jellyfish lodge im

 

जैनीन हंग ही फिलिपिन्समध्ये राहणारी एक आर्किटेक्ट आहे आणि तिने जेलीफिशच्या आकारचे लॉज बनवले आहे.

हंगचा हा लॉज बायोडिझाइनचा एक अद्भुत नमुना आहे आणि त्यांच्याकडे असलेले अॅक्वापोनिक (Aquaponic) गार्डन, वॉटर फिल्टर सिस्टम आणि कचरा एकत्र करणारा तंतुमुद्र (Tentacles) त्यांना त्यांच्या ह्या कामामध्ये मदत करतो.

हंग या जेलीफिश लॉजच्या निर्माणाला जगभरातील जलमार्गांच्या समस्येच्या समाधानाच्या रुपात पाहत आहे. हे लॉज फिलिपिन्समध्ये खूपच प्रसिद्ध आहे.

एक जेलीफिशसारखा आकार देण्यात आलेल्या या लॉजमध्ये एक सोलरपॉवर स्ट्रक्चर आहे. या स्ट्रक्चरमध्ये अॅक्वापोनिक गार्डन आहे, जिथे चार प्रकारचे मासे आणि काही वनस्पती तयार केल्या जाऊ शकतात.

स्थानिक लोक जे या स्ट्रक्चरची देखरेख करत आहेत, ते या गार्डनमध्ये तयार होणाऱ्या या वस्तूंचा फायदा कारण घेऊ शकतात, याप्रकारची सूट हंगने त्यांना दिली आहे. प्रत्येक लॉजमध्ये एक लिव्हिंग एरिया, किचन, प्रायव्हेट क्वार्टर आणि एक टॉयलेट देखील आहे.

सोलरपॉवर स्ट्रक्चरच्या मदतीने प्रदूषित पाण्याला फिल्टर करत असताना इंटीरीयर गार्डनला Flourish देखील केले जाते.

 

Jellyfish Lodge.Inmarathi1

 

जेलीफिशचे लांब जाळीवाले हात समुद्रातील वाइल्डलाइफ़ला कोणतेही नुकसान न पोहोचवताच कचऱ्याला एकत्र करण्यासाठी सक्षम असतात. तसेच या लॉजमध्ये याव्यतिरिक्त पाण्यामध्ये असणाऱ्या विषारी पदार्थांची तपासणी केली जाते.

एका वेगळ्या प्रकारच्या डायजेशन चेंबरच्या मदतीने पाण्याचे शुद्धीकरण करण्याचे काम देखील केले जाते. एकदा का पाणी शुद्ध झाले, मग त्या पाण्याला परत पर्यावरणामध्ये पाठवण्यात येते.

अॅक्वापोनिक गार्डन, इलेक्ट्रोस्टॅटिक सिस्टमच्या मदतीने अन्न तयार केले जाते, तसेच हवेला देखील शुद्ध करण्यात येते. हंगला आशा आहे की, हा प्रकल्प आजूबाजूच्या लोकांना देखील याप्रकारचे तंत्राचा प्रयोग करण्यासाठी प्रेरित करेल. पर्यावरणासाठी करण्यात आलेल्या उल्लेखनीय कामासाठी या लॉजला बायोडिझाइन स्पर्धेमध्ये खास ओळख मिळाली आहे.

असे हे जेलीफिश लॉज खूपच वेगळे आणि पर्यावरणासाठी खूपच लाभदायक आहे. यामुळे पाण्यामध्ये असणारी घाण कमी होणार आहे आणि पाण्यातील सजीवांना घातक असणाऱ्या पाण्यापासून वाचण्यास मदत होऊ शकते.

भविष्यात हे जेलीफिश लॉज मॉडेल जगाला कोणत्या स्तरावर प्रभावित करू शकते, हे पाहण्याची उत्सुकता वाढत चालली आहे.

अशा प्रकारचे जेलीफिश लॉज अजून जगातील इतर कितीतरी देशांमध्ये पाहण्यास लवकरच मिळतील आणि निसर्गाचा समतोल राखण्यासाठी त्याची मदत होईल.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?