' येथे शहिदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी फुलं नाही, पाण्याची बाटली चढवली जाते – InMarathi

येथे शहिदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी फुलं नाही, पाण्याची बाटली चढवली जाते

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

एका सैनिकाच बलिदान हे त्या देशासाठी सर्वात अनमोल असत, त्याची तुम्ही कुठल्याही इतर गोष्टीसोबत कधीही तुलना करू शकत नाही.

आज जर आपण आपल्या देशात सुख-शांतीपूर्ण जीवन जगत आहोत तर ते केवळ या सैनिकांच्या बलिदानामुळेच. आपल्या देशाला सुरक्षा प्रदान करण्यासाठी हे सैनिक कुठल्याही समस्येला सामोरे जाण्यापासून घाबरत नाहीत आणि नाही त्यासंबंधी कधीही कुठली तक्रार करतात.

आपलं घर-दार, कुटुंब सोडून ते देशाच्या रक्षणाकरिता रात्रंदिवस झटत असतात. खरंच खूप हिम्मत असते या सैनिकांमध्ये जे आपल्या देशाच्या रक्षणासाठी स्वतःचे प्राण देखील गमवायला तयार असतात आणि त्याहून जास्त हिम्मत असते त्यांच्या कुटुंबात जे त्यांना एक सैनिक बनण्यासाठी प्रेरित करतात.

 

 

देशासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या या वीर पुत्रांच्या स्मरणार्थ त्यांना श्रद्धांजली म्हणून अनेक युद्ध स्मारक बनविण्यात आली आहेत. एक असंच युद्ध स्मारक उत्तरखंड येथील निलांगघाटी येथे आहे. हे स्मारक ११ हजार फुटाच्या उंचीवर आहे.

या स्मारकाची विशेषता म्हणजे, येथे शहीद जवानांना श्रद्धांजली देण्याकरिता फुलं नाही तर पाण्याची बाटली अर्पण केली जाते. पण असे का?

हे स्मारक झूम प्रसाद गुरुंग, लान्स नायक सुरेंद्र सिंग आणि भारतीय सेनेच्या ६४ फिल्ड रेजिमेंटच्या गनर दान बहादूर यांना समर्पित आहे. ६ एप्रिल १९९४ मध्ये हे तिघे कोरड्या परिसरात पाण्याच्या शोकारिता निघाले होते. पण अचानक हिमस्खलन मध्ये फसले आणि त्यांचा मृत्यू झाला.

१९६२ मध्ये झालेले इंडो-चायना युद्धा दरम्यान निलांग च्या सीमारेषेच्या भागात राहणाऱ्या ग्रामीण लोकांना स्थलांतरित करण्यात आले होते. त्यासोबतच या क्षेत्राला पुढील पाच वर्षांकरिता बंद ठेवण्यात आले होते.

यानंतर जेव्हा उत्तराखंड सरकारने हे क्षेत्र पुन्हा सुरु केले तेव्हा येथे येणाऱ्या पर्यटकांनी या शहिदांना पाण्याची बाटली अर्पण करून त्यांना श्रद्धांजली दिली. आता येथे येणारा प्रत्येक पर्यटक हा पाण्याची बाटली अर्पणकरूनच या शहिदांना श्रद्धांजली वाहतो.

आपल्या देशासाठी त्याच्या रक्षणासाठी स्वतःचे प्राण त्यागणाऱ्या या जवानांच्या बलिदानाला आपण सर्वांनीच नेहमी लक्षात ठेवायला हवे.

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?