'येथे मंत्रोच्चारही केला जातो आणि कुराणही वाचली जाते, अशी आहेत भारतातील ही धार्मिक स्थळे

येथे मंत्रोच्चारही केला जातो आणि कुराणही वाचली जाते, अशी आहेत भारतातील ही धार्मिक स्थळे

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

हिंदू-मुस्लीम तेढ तर आपल्या देशात सुरूच असतात. या दोन्ही धर्मांतील काही लोकं अशी असतात ज्यांना त्यांच्याचं धर्म सर्वश्रेष्ठ आहे हे दाखवायचं असत आणि मग त्यातून हा द्वेष निर्माण होतो. पण या सोबतच अनेक ठिकाणी आपल्याला हिंदू-मुस्लीम ऐक्य देखील बघायला मिळत. आज आम्ही तुम्हाला अश्या ठिकाणांबद्दल सांगणार आहोत, ज्याबद्दल एकूण तुम्ही देखील थक्क व्हाल..

 

ghoradhara village-inmarathi

मंदिर आणि दरगाह हे अमोरासमोर असलेले तर आपण अनेक वेळा बघितले असेल, पण काय तुम्ही कुठलं असं मंदिर बघितलं आहे जिथे दरगाह आहे? नाही ना.. म्हणूनच आज माही आपल्याला अश्याच ठीकाणांबद्द्ल सांगणार आहोत.. जिथे कुठल्याही प्रकारच्या द्वेषा शिवाय प्रार्थना आणि इबादत दोन्ही केल्या जाते.

 

ghoradhara village-inmarathi02

एकाच परिसरात बनलेली सईद गुलाम चिश्ती ची दरगाह आणि शिव मंदिर ही हिंदू-मुस्लीम ऐक्य आणि आपुलकीच सर्वोत्तम उदाहरण आहे. हे ठिकाण पश्चिम बंगालच्या झाडग्राम जिल्ह्याच्या घोराधरा गावात आहे. हे धर्मस्थळ मागील २३ वर्षांपासून हिंदू-मुस्लीम एक्याची शिकवण देत आहे.

 

ghoradhara village-inmarathi08

येथे प्रत्येक सायंकाळी भजन झाल्यानंतर त्याच लाउडस्पीकर आणि माइकमध्ये एकाच ढोलकी आणि हारमोनियमवर कव्वाली देखील गायिली जाते. या धर्म स्थळाच्या परिसरात केशरी जो हिंदू धर्म दर्शवतो आणि हिरवा जो मुस्लीम धर्म दर्शवतो, या दोन्ही रंगाचे झेंडे लावण्यात आले आहे.

या ठिकाणची देखभाल करणारे नारायण चंद्र आचार्य त्यांच्या मते,

“१९८६मध्ये हे मंदिर बनविले होते. त्यानंतर मी मुस्लीम पीर सईद गुलाम चिश्ती यांच्यापासून खूप प्रभावित झालो होतो. १९९४ साली चिश्ती साहब यांचा मृत्यू झाला. तेव्हा त्यांच्या शेवटच्या इच्छेला पूर्ण करण्यासाठी मी त्यांना शिवलिंग जवळ दफन केले. या ठिकाणावर आजपर्यंत कुठल्याही व्यक्तीने आपत्ती दर्शविली नाही.”

 

ghoradhara village-inmarathi03

आचार्य सांगतात की, पीर साहब हे संस्कृतमध्ये गीता, वेद आणि उपनिषद एकविण्यासोबतच अरबी भाषेत कुराणआणि आयत देखील ऐकवीत होते. पीर साहब हे आचार्य यांना सांगयचे की, ‘गीता आणि कुराण यांची शिकवण एकच आहे.’ ही दोन्ही धर्मग्रंथ प्रेम आणि एकता शिकवितात.

आचार्य याचं म्हणन आहे की, “एवढ्या वर्षांपासून मी या ठिकाणी एकता आणि शांतता बनवून ठेवली आहे. पण मला नेहेमी याची चिंता लागलेली असते की, माझ्या मृत्यूनंतर या ठिकाणाच काय होईल?”

 

ghoradhara village-inmarathi05

 

दुसर ठिकाण म्हणजे, अलवार येथील मोती डूंगरी पहाडावरील हे धार्मिक स्थळ. जिथे सय्यद दरबार यासोबतच संकट मोचन हनुमान मंदिर देखील आहे. हे धार्मिक स्थळ कित्येक वर्षांपासून असच आहे.

या धार्मिक स्थळाची देखभाल करणारे केअरटेकर महंत नवल बाबा यांना त्या लोकांपासून आपत्ती आहे जे एकाच छताखाली दोन धार्मिक स्थळ आहेत हे बघून आश्चर्यचकित होतात. त्यांच्या नुसार,

“दोन्ही धर्म एकच मार्ग दाखवितात. मग त्यात काय अडचण आहे?”

 

ghoradhara village-inmarathi06

 

येथे एकाच पूजेच्या थाळीत दोन्ही धर्मस्थळांची पूजा केली जाते. आधी लोकं हात जोडून टीका लावून घेतात आणि त्यानंतर डोक्यावर कपडा बांधून प्रार्थना देखील करतात.

आजवर जिथे आपण नेहेमी हिंदू-मुस्लीम तेढ यांबद्दलच वाचत आलो आहोत तिथे अश्या एखाद्या ठिकाण बद्दल वाचून नक्कीच तुम्हालाही छान वाटल असेल… प्रत्येक धर्म हा समांतर आहे, कुठलाही धर्म उच्च नाही आणि तुच्छही नाही. तर प्रत्येक धर्म हा आपल्याला ऐक्य, प्रेम, एकता याचीच शिकवण देतो. त्यामुळे आतातरी आपण या सर्वांच्या पुढे जाऊन विचार करायला हवा… नाही का?

 

स्त्रोत : wittyfeed.com

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?