' २० रुपयात १ GB इंटरनेट! जिओ ला टक्कर देणारं नवं स्टार्ट अप – InMarathi

२० रुपयात १ GB इंटरनेट! जिओ ला टक्कर देणारं नवं स्टार्ट अप

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

सध्या मोबईल आणि इंटरनेट माणसाच्या मुलभूत गरजांपैकी एक गरज बनली आहे. आता माणसाला इंटरनेट नसेल तर चैन पडत नाही. ‘हॅपी जर्नी’ चित्रपटामधील अभिनेत्री प्रिया बापट हिचा एक संवाद प्रकर्षाने आठवतो. ‘अन्न, वस्त्र, निवारा आणि वयफाय हे मला लागतंच’…

आज अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, खासकरून तरुण पिढीच्या बाबतीत की, एकवेळ त्यांना जेवण मिळाले नाही तरी देखील चालेल, पण मोबाईल आणि इंटरनेट नसेल, तर त्यांचा दिवस जात नाही.

त्यातच जिओ आल्यामुळे हे इंटरनेटचे वेड वाढतच गेले आहे. जेव्हा रिलायन्सने जिओ लाँच केले, त्यावेळी भल्याभल्या नेटवर्क ऑपरेटरचे धाबे दणाणले होते आणि या ऑपरेटर्सच्या समोर जिओ नावाचा आजपर्यंतचा सर्वात मोठा प्रतिस्पर्धी उभा राहिला.

 

jio-marathipizza03

 

त्यांनतर गेल्या काही वर्षांत बाकी नेटवर्क ऑपरेटर कंपन्यांनी देखील आपल्या इंटरनेट आणि कॉल्सच्या दरामध्ये खूप घट केली आहे.  नवनवीन आकर्षक प्लॅन आणायचा प्रयत्न केला आहे.

जर आज तुम्ही जिओचा वापर कॉलसाठी आणि इंटरनेटसाठी करत असाल आणि यांचा भरपूर मनभरून वापरत असाल. तर आम्ही तुमच्यासाठी अजून एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत.

आज आम्ही तुम्हाला अशा एका स्टार्टअपबद्द्ल सांगणार आहोत, जो जिओ पेक्षा कमी दरात इंटरनेटचा डेटा पुरवत आहे. चला तर मग जाणून घेऊया, या स्टार्टअपबद्द्ल…

 

Wifi Dabba.Inmarathi

 

बंगळुरूमध्ये सुरू झालेला ‘वायफाय डब्बा’हे स्टार्टअप जिओपेक्षाही कमी दरामध्ये मोबाईल डेटा ऑफर करत आहे.

३ वर्षांपूर्वी जेव्हा जिओचा सर्वात स्वस्त प्लॅन १९ रुपयांमध्ये १५० एमबी डेटा हा होता (ज्याच्यानंतर ६४ केबी / प्रतिसेकंदन या स्पीडने अमर्यादित डेटा मिळतो), तिथेच या स्टार्टअपच्या ऑफर्समध्ये फक्त २ रुपयांपासून प्लॅनची सुरुवात होते.

तुम्ही २४ तासांसाठी २ रुपयात १०० एमबी, १० रुपयात ५०० एमबी आणि २० रुपयात १ जीबी डेटा मिळवू शकता.

 

wifi-dabba-inmarathi

 

‘वायफाय डब्बा’ चे रिचार्ज कूपन टोकनच्या स्वरूपात लोकल स्टोर्समधून खरेदी केले जाऊ शकतात. या स्टोर्सवर छोटे फायबर ऑप्टिक-फेड रावटर्स (Fibre Optic-Fed Routers) च्या मदतीने इंटरनेट कनेक्टीव्हिटी दिली जाते.

कोणत्याही प्रकारचे साइन अप करण्याचे किंवा अॅपची येथे गरज नसणार आहे. या वायफाय डब्बा स्टार्टअपचे म्हणणे आहे की, या वायफाय पॉइंट्सच्या १०० ते २०० मीटर भागामध्ये तुम्हाला ५० एमबीपीएसची स्पीड देईल.

फक्त रिचार्ज कूपन खरेदी करा आणि आपला मोबाईल नंबर, ओटीपी (OTP) आणि टोकन नंबर टाकून तुम्ही डेटा वापरू शकता.

 

Wifi Dabba.Inmarathi3

 

हे स्टार्टअप स्थानिक केबल ऑपरेटर्स बरोबर मिळून इंफ्रास्ट्रक्चर तयार करत आहे. पुढे जाऊन संपूर्ण देशामध्ये आपले नेटवर्क पसरवण्याचा त्यांचा उद्देश आहे. त्यामुळे तुम्ही जिथे जाल, तिथे वायफाय उपलब्ध असेल.

या उलट टॉवर लावण्यासाठी इतर टेलिकॉम कंपन्यांना खूप खर्च येतो आणि त्यामुळे त्यांना एवढ्या कमी किंमतीमध्ये डेटा पुरवणे अवघड आहे.

 

wifi-dabba-inmarathi

 

अशा प्रकारच्या स्टार्टअपच्या पुढे राहण्यासाठी जिओ आणि बाकी टेलिकॉम ऑपरेटर आपले डेटा प्लॅन्स अजून कमी करतील का? हा प्रश्न अजून तरी अनुत्तरितच आहे.

हे येणाऱ्या काळातच उघड होईल. आता ही फक्त बंगळूरूमध्ये असलेली वायफाय डब्बा या कंपनीची सेवा लवकरच संपूर्ण भारतामध्ये सुरु होईल, अशी आशा आहे. अशा स्टार्टअप सारखेच येणाऱ्या काळात या टेलिकॉम ऑपरेटर कंपन्यांना मोठे प्रतिस्पर्धी निर्माण होऊ शकतात.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?