' चतुर बिरबल सर्वांना माहीत आहे मात्र त्याच्या वंशजांची सद्यस्थिती बघितलीये का? – InMarathi

चतुर बिरबल सर्वांना माहीत आहे मात्र त्याच्या वंशजांची सद्यस्थिती बघितलीये का?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

अकबरच्या नऊ रत्नांपैकी एक म्हणजेच बिरबल. चतुर बिरबलच्या अनेक गोष्टी आपण लहानपणी एकल्या असतील. त्यातली सर्वात आवडती म्हणजे ‘बिरबलकी खिचडी’

 

birbal-ki-khichdi-InMarathi

 

पण तुम्हाला माहित आहे का की, बिरबलच खर नाव काय होत आणि तो कुठला राहणारा होता?

बिरबलच नाव महेशदास दुबे होतं आणि तो मध्य प्रदेशच्या सिधी जिल्ह्यातील घोघरा येथे जन्मला होता.

 

birbal InMarathi

 

एवढी वर्ष उलटलीत, देश गुलामगिरीतून मुक्त झाला, देशाची सर्व स्तरावर प्रगती झाली, पण मध्यप्रदेशातील सिधी हे गाव नेहमी दुर्लक्षितच राहील. तिथे आजही कच्चे घर, कच्चा रस्ता आहे. जस ते शंभर वर्षांआधी होतं तसच ते आजही आहे.

याच घोघरा गावात बिरबल यांचे वडील गंगादास याचं घर होतं, १५२८ साली अनाभा यांनी रघुबर आणि महेश या दोन जुळ्या मुलांना जन्म दिला.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

आता बिरबलची ३७ वी पिढी या गावात राहत आहे हे लोकं मोल-मजुरी करून आपलं जीवन काढत आहेत.

 

ghogra village InMarathi

 

 

सिधी येथील रहिवासी साधू हे सांगतात की, या कुटुंबाला भेटायला जास्त करून शोधकर्तेच येत असतात.

सरकारी अधिकारी आणि मंत्री यांना बिरबल यांच्या कुटुंबाशी काहीही घेणे देणे नाही. येथील लोकांना या गोष्टीच खूप वाईट वाटत की,

कुठल्याही सरकारने बिरबलच्या या जन्म स्थानाचा, त्याच्या विकासाचा कधीही विचार केला नाही.

जेव्हा अर्जुन सिंग हे केंद्रीय मानव संसाधन मंत्री होते, तेव्हा त्यांनी बिरबल यांच्या स्मृती प्रीत्यर्थ एक सामुदायिक भवन बनवले होते. या व्यतिरिक्त घोघरा ही बिरबलची जन्मभूमी म्हणून त्याला राष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण करवून देण्यासाठी कुठल्याही प्रकारचा प्रयत्न करण्यात आलेला नाही.

या गावातील वृद्ध लोकांच्या मते, बिरबलच्या वेळी घोघराला खूप महत्व होत. पण वेळेसोबतच घोघराने स्वतःच महत्व गमावलं. अकबर नंतर दिल्ली तर दूरच मध्यप्रदेश सरकारने देखील या गावाकडे कधी बघितले नाही.

 

birbal family InMarathi

 

या गावात बिरबलच्या ३६ व्या पिढीचे गंगा दुबे राहतात, ते एक शेतकरी आहेत तसेच त्याचं एक किराण्याच दुकान देखील आहे.

गंगा दुबे सांगतात की, अनेक वर्षांपर्यंत बिरबल संबंधित पुरावे पिढ्यानपिढ्या त्यांच्याकडे सुरक्षित होते, पण पावसामुळे त्यांच्या दुकानात पाणी भरलं आणि त्यातील काही पुरावे नष्ट झाले.

या पुराव्यांमध्ये रीवा येथील महाराज याचं पत्र आणि अकबराच्या दरबारच हुकुम-नामा देखील होते, जे फारसी भाषेत लिहिलेले होते. पण गंगा यांच्या कुटुंबाजवळ बिरबलच्या काही गोष्टी आहेत. जसे की, शंख, घंटा आणि काही पुस्तकं.

 

birbal 1 InMarathi

 

बिरबल हे फारसी आणि संस्कृतमध्ये विद्वान असल्याचे सांगितले जाते. ते कविता देखील करायचे. या व्यतिरिक्त त्यांनी संगिताच शिक्षण देखील घेतलं आहे.

याच कारणामुळे सर्वात आधी त्यांना जयपूरच्या महाराजांच्या दरबारात आणि नंतर रीवा येथील महाराजांच्या दरबारात राज कवी म्हणून नियुक्त करण्यात आले होतं.

रीवाचे महाराज यांनीच बादशाह अकबरला बिरबल भेट म्हणून दिला होता. असे येथील गावकरी मानतात. पण इतिहासकार या गोष्टीशी सहमत नाहीत.

बिरबलच्या या जन्मभूमीवर त्यांची आठवण करवून देणाऱ्या खूप कमी गोष्टी उरल्या आहेत. वेळेसोबतच सर्व काही नष्ट होत गेलं. गावात तलावाच्या किनाऱ्यावर असणारे ते घर जिथे त्यांचे आई-वडील राहायचे आता तिथे नाही आहे.

या गावात एक प्राचीन मंदिरा हे जिथे बिरबल आणि त्यांचा भाऊ लहानपणी जायचे. तेथील वयोवृद्ध पंडित सुखचंद्र सिंह सांगतात की, याचं मंदिरात बिरबलला वरदान मिळाले होते अशी मान्यता आहे.

 

ghogra village 1 InMarathi

 

बिरबलला मुलगा नव्हता, त्यांची केवळ एक मुलगी होती कमला. जिने कधीही लग्न केले नाही. त्यामुळे त्यांचा भाऊ रघुबीर हेच त्याचं वंश चालवत आहेत. घोघरा येथे अशी मान्यता आहे की, असे देवीच्या वरदानामुळे घडले होते.

गंगा दुबे यांच्या घरी लोकांच येण-जाणं सुरूच असत. बिरबलचे वंशज असल्या कारणाने या परिसरात त्यांचा खूप सन्मान केल्या जातो. यांच्या घरी गावकऱ्यांच्या सभा देखील होतात.

 

birbal family-inmarathi04
moralstories26.com

 

यांच्या कुटुंबाला देखील खिचडी आवडते, पण गंगा सांगतात की, त्यांच्या घरची खिचडी लवकर शिजते.

ते गमतीत म्हणतात की,

‘बिरबलची खिचडी तर कधी शिजलीच नाही, कारण ते बादशाह अकबर यांना सल्ला देण्याकरिता खिचडी बनवत होते, पण आमच्या घरची खिचडी लवकर शिजते.’

घोघरा गावात अकबर आणि बिरबलच्या गोष्टी सर्वांच्याच आवडीचा विषय आहे. सिधी जिल्ह्याच्या या दुर्लक्षित ठिकाणावर कधी वीज असते तर कधी नसते. त्यावेळी गावातील लोकं अकबर आणि बिरबलच्या या गोष्टींवरूनच स्वतःचे मनोरंजन करतात.

गंगा दुबे या गावात त्यांच्या पत्नी आणि दोन मुलांसोबत राहतात. त्यांना दोन मुली देखील आहेत ज्याचं लग्न झालं आहे.

बिरबल जो अकबराच्या ९ रत्नांपैकी एक होता, ज्याच्या चतुरतेच्या गोष्टी एकूण आपण मोठे झालो, आज त्यांच्याच वंशजांना असे दिवस काढावे लागणे हे खरच निराशाजनक आहे.

 

स्त्रोत : bbc.com

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?