' इथे दसऱ्याच्या दिवशी चक्क रावणाचं 'श्राद्ध' केलं जातं! वाचा अपरिचित इतिहास

इथे दसऱ्याच्या दिवशी चक्क रावणाचं ‘श्राद्ध’ केलं जातं! वाचा अपरिचित इतिहास

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

===

मर्यादा पुरुषोत्तम ‘राम’ यांची आपण केवळ पूजाच नाही करत तर त्यांचे आचरण अवलंबण्याचा देखील प्रयत्न करतो. कारण राम हे सदपुरुष होते. त्यांनी रावणाचा अंत करून सत्याचा नेहमी विजय होतो आणि असत्य वा दुष्ट प्रवृत्ती विनाश पावते हे सिद्ध केलं.

म्हणूनच आपण दर विजयादशमीला रावण दहन करून सत्याचा असत्यावर झालेला विजय साजरा करतो…

 

Ravan-inmarathi06

 

रावण हा एक महाज्ञानी होता. त्याच्या तोडीचा विद्वान पुरुष कोणीच नाही असे मानले जाते. या विद्वानाच्या मृत्यू नंतर स्वतः रामदेखील दुखी झाले होते. आपण दरवर्षी विजयादशमी साजरी करतो ती रामाचा विजय झाला म्हणून..

पण तुम्हाला माहित आहे, त्याच वेळी भारतातील एका गावात रावणाच श्राद्ध केलं जातं, त्याच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला जातो.

 

raavan-marathipizza05

 

राजस्थानच्या जोधपुर येथे रावणाचे वंशज आजही रावणाला त्यांच्या कुटुंबातील सदस्य मानून त्याची पूजा करतात, एवढचं नाही तर रावणाचं श्राद्ध देखील करतात.

यावेळी संपूर्ण विधिवत यज्ञ केले जाते, सोबतच रावण ज्या देवीला त्याची कुलदेवता म्हणून पुजायचा त्या खरानना देवीला नैवेद्य देण्यात येतं.

 

ravan-inmarathi03

 

संपूर्ण जगात रावण हा एकच असा जावई असेल ज्याचं श्राद्ध त्याच्या सासरी केल्या जातं. प्राचीन काळातील जोधपूरची राजधानी मंडोर रावणाचं सासर म्हणून ओळखल्या जातं.

हा योगायोगच म्हणावा की, रावणाचे वंशज देखील जोधपुरमधेच राहतात. जोधपुर येथे राहणारे दवे-गोधा श्रीमाली ब्राह्मण समाजाचे लोकं स्वतःला रावणाचे वंशज मानतात. येथे राहणारे रावणाचे हे वंशज अनेक वर्षांपासून रावणाचं श्राद्ध संपूर्ण विधिवत स्वरुपात करतात. रावणाचे हे नातेवाईक दरवर्षी यज्ञ आणि पिंडदान करतात सोबतच ते ब्राह्मणांना जेवण देखील देतात.

जोधपुरच्या अमरनाथ मंदिर येथे रावणाची एक मूर्ती स्थापित आहे. जिथे रावणाचे वंशज त्याची पूजा करतात. भारतात शंकरजीची पूजा करताना रावणाची ही एकच मूर्ती आहे.

खीर-पुरी रावणाच्या आवडीचा पदार्थ होता, म्हणून या श्राद्धा दरम्यान आवर्जून खीर-पुरी बनविली जाते.

विजयादशमीला एकीकडे जिथे राम भक्त रावण दहन करून हा सण साजरा करत असतात, तिथे दुसरीकडे हे रावणाचे वंशज या दिवशी सुतक स्नान करतात. ते या दिवसाला अशुभ मानतात, शोक व्यक्त करतात.

 

ravan-inmarathi02

 

ही परंपरा येथे अनेक काळापासून सुरू आहे. रावणाचा श्राद्धावेळी दवे-गोधा श्रीमाली ब्राह्मण समाजाचे लोकं त्याच प्रकारे एकत्र येतात जसे इतर कुठल्या समान्य व्यक्तीच्या श्राद्धावेळी. यामागे यांची अशी भावना आहे की, याद्वारे ते त्यांच्या धार्मिक आणि सामाजिक जबाबदाऱ्या पार पाडत आहेत.

रावण याला भलेही अन्याय आणि विकृतीचं प्रतिक मानल्या जात असलं तरी देखील रावण हा महाज्ञानी ब्राह्मण होता, हे देखील सत्य आहे आणि त्याचा हा गुणधर्म त्याला पूजनीय बनवतो, असे हे लोकं मानतात.

 

ravan-inmarathi07

 

श्री अमरनाथ मंदिर येथे रावणाच्या मंदिरा समोरच त्याच्या पत्नीचे म्हणजेच मंदोदरीचे देखील मंदिर आहे. या मंदिरात मंदोदरीच्या हातात शिवलिंग आहे, तिची शिव भक्ती दाखविणारी ही मूर्ती या मंदिरात स्थापित आहे. २००७ साली हे मंदिर रावणाच्या वंशजांनी बनवलं.

त्यांच्या मते मंदोदरी ही मंडोर (जोधपुर)ची कन्या होती. रावण आणि मंदोदरीच्या मंदिरांचं मध्यभागी एक शिव वाटिका आहे. श्री अमरनाथ मंदिर परिसरातच रावणाची कुलदेवी खरानना देवीचं मंदिर देखील आहे.

 

ravan-inmarathi05

 

रावण भलेही विकृत मानसिकतेचा असला तरी तो एक विद्वान ब्राह्मण होता त्यामुळे शिवभक्त अशीही त्याची ओळख आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?