'सत्तरीतही फिट असणा-या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुदृढ आरोग्याचे रहस्य तुम्ही वाचलंच पाहिजे

सत्तरीतही फिट असणा-या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुदृढ आरोग्याचे रहस्य तुम्ही वाचलंच पाहिजे

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताचे आजवरचे सर्वात व्यस्त पंतप्रधान म्हणून ओळखले जातात. रोज १८ तास काम करण्याच्या त्यांच्या सवयीमुळे त्यांनी हे बिरूद मिळवले आहे.

१७ सप्टेंबर हा त्यांचा वाढदिवस. आज त्यांनी सत्तरी गाठली आहे. उतारवयात सर्वसामान्यपणे व्यक्तीची काम-कष्ट करण्याची शक्ती कमी होते. परंतु नरेंद्र मोदी आजही पंचविशीतल्या तरुणासारखे अगदी उत्साहात देश सांभाळताना दिसतात.

 

स्रोत

 

नं थकता, अविरत काम करण्याच्या त्यांच्या जोशपूर्ण व्यक्तिमत्वाचे गुपित मात्र फारच कमी लोकांना ठावूक आहे. काही वर्षांपुर्वी मिडीयाला प्रतिक्रिया देताना नरेंद्र मोदींनी स्वत:हून सांगितले की त्यांच्या या सुदृढ आरोग्यामागे ‘माकरुलाचा’ हात आहे.

हिमाचल मध्ये आढळणारे ‘माकरुला’ हा मशरूमचा प्रकार आहे.

भरपूर औषधी गुण असणाऱ्या या मशरूमचे नरेंद्र मोदी नं चुकता सेवन करतात.

 

narendra-modi-health-marathipizza01

स्रोत

 

नरेंद्र मोदींचा आहार शुद्ध सात्विक आणि शाकाहारी आहे. एकदा हिमाचल प्रदेशाला भेट दिली असताना त्यांच्या खाण्यात हे मशरूम आलं आणि मोदीजी या मशरूमचे फॅन झाले.

पुढे आरोग्यासाठी त्याचा असणारा बहुमुल्य उपयोग ऐकल्यानंतर त्यांनी रोज हे मशरूम खाण्याची सवय लावून घेतली.

 

narendra-modi-health-marathipizza03

स्रोत

 

या मशरूमची खास गोष्ट ही आहे की हे दुर्मिळ असून सहसा उपलब्ध होत नाही.

हे मशरूम मिळवण्यासाठी स्थानिकांना खूप कसरत करावी लागते. हिमाचलचे लोक व्यापाऱ्यांना हे मशरूम प्रति किलो ८ ते १० हजार रुपयांना विकतात.

हे व्यापारी त्यावर आवश्यक प्रक्रिया करून बाजारात प्रति किलो २५ ते ३० हजार रुपयांना विकतात.

‘माकरुला’  मशरूम सहसा फाईव्ह स्टार हॉटेल्समध्ये आढळून येते.

 

narendra-modi-health-marathipizza04

स्रोत

‘माकरुला’ मशरूम शरीर संतुलित ठेवण्यास मदत करते आणि मोदींच्या उत्साहामागे माकरूलाचा हात आहे ही बातमी पसरल्यापासून ‘माकरुला’ चा बोलबाला प्रचंड वाढलाय म्हणे!

याव्यतिरिक्त शुद्ध शाकाहार हे त्यांच्या आरोग्याचं आणखी एक रहस्य.

मोदींची परदेश भ्रमंती हा विषय कायमच चर्चेत राहतो, मात्र जगभरातील वेगवेगळ्या शहरांत फिरूनही मोदी आपल आहार कसा सांभाळतात, परदेशात त्यांना शाकाहारी पदार्थ मिळतात कसे? यावर अनेकांची मतमतांतरे आहेत, मात्र जगात कुठेही गेलं तरी ते शाकाहारालाच दिले जाणारे प्राधान्य, त्याबाबतच्या पुर्वसुचना याला ते श्रेय जाते.

वयाच्या सत्तरीतही योगा करणारे पंतप्रधान हा देखील नेहमी औत्सुक्याचा विषय ठरतो. मग त्यांनी योगदिनाची केलेली घोषणा असो किंवा मानसिक ताण हलका करण्यासाठी गुहेतील साधना असो…

टिका किंवा विनोद होत असले तरी व्यायामामुळेच मोदींची कार्यउर्जा कायमच ज्वलंत असते यावर अनेक डॉक्टरांनीही शिक्कामोर्तब केलं आहे.

शरीराला आवश्यक तेवढीच झोप,  न चुकता केलेला व्यायाम, मनःशांतीसाठी केलेली साधना आणि सात्विक आहार या चतुःसुत्रीच्या आधारे सत्तरीत मोदी जर फीट राहू शकतात, तर तरुणवयापासून आपण याची सुरुवात केली तर आपल्यालाही त्याचा फायदा होवू शकतो.

यासह आयुर्वेदावर भर हे देखील त्यांचे आणखी एक वैशिष्ठ्य आहे. अनेक आजारांवर आयुर्वेदात रामबाण उपाय असल्याने गरजेला आयुर्वेदिक औषधांवर त्यांचा भर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येते.

त्याच सह कोमट पाणी हा अत्यंत साधा सोपा उपाय त्यांच्या निरोगी आरोग्याचा मंत्र आहे. कोणताही विकार असो, कोमट पाण्याच्या नियमित सेवनाने प्रकृती निरोगी राहते हे त्यांनी अनेकदा स्पष्ट केलं आहे.

केवळ प्रकृतीचीच नव्हे तर केस, त्वचा यांचीही काळजी घेण्यासाठी कोणत्याही कॉस्मॅटिक्स किंवा औषधांवर अवलंबून राहण्यापेक्षा ते आयुर्वेदातील वेगवेगळ्या प्रकारची तेल, जडीबुटी यांचा वापर करतात.

तसंच नियमितपणे चालणं हा त्यांचा सर्वाधिक आवडता व्यायाम असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

निरोगी प्रकृतीसाठी मोदी हे अनेकांचे आदर्श आहेत, सत्तरीतही त्यांचा फिटनेस, कामाची उर्जा, प्रत्येक वेळी दिसणारी सकारात्मकता यांचे अनुकरण केवळ वयोवृद्धच नव्हे तर तरुणही करतात. मात्र यासाठी आपल्या जिवनशैलीत आजपासूनच थोडे बदल केलेत तर मोदींप्रमाणेच आपल्यालाही निरोगी आयुष्याचे वरदान मिळेल यात शंका नाही.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?