' या एकाच इंग्रजाने राणी लक्ष्मीबाईला “प्रत्यक्ष” बघितले होते – InMarathi

या एकाच इंग्रजाने राणी लक्ष्मीबाईला “प्रत्यक्ष” बघितले होते

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

‘खूब लडी मर्दानी वो झांसी वाली रानी थी’… कवितेच्या या ओळी आपल्यापैकी प्रत्येकाने शाळेत असताना गायल्या असतील. जय ज्या वेळी १८५७ च्या स्वातंत्र्य संग्रमाचा विषय निघतो; तेव्हा सर्वात पहिले जर कुठलं नाव आठवत असेल, तर ते म्हणजे ‘राणी लक्ष्मीबाई’.

त्यांच्या बाबतीत एक असा दावा करण्यात येतो, की राणी लक्ष्मीबाई यांना केवळ एकच इंग्रज प्रत्यक्ष पाहू शकला होता.

 

rani lakshmibai-inmarathi02

 

नेमका काय आहे हा दावा? आणि झाशीच्या राणीला पाहणारी ती व्यक्ती कोण आहे? वाचा सविस्तर माहिती…

ऑस्ट्रेलियाचे जॉन लँग हे ब्रिटनचे रहिवासी होते. तरी ते त्यांच्याच सरकार विरोधात म्हणजेच ब्रिटन सरकार विरोधात केस लढत असत. राणी लक्ष्मीबाई यांनी जॉन लँग यांना त्यांची केस लढण्यासाठी नियुक्त केले होते.

२८ एप्रिल १८५४ ला राणी लक्ष्मीबाईंना मेजर एलिस यांनी किल्ला सोडण्याचं फर्मान सुनावलं. तेव्हा राणी लक्ष्मीबाई त्यांचा किल्ला सोडून दुसऱ्या महालात राहायला लागल्या. पण त्यांना त्यांचा किल्ला परत हवा होता.

त्यामुळे त्यांनी इंग्रजांच्या विरोधात केस लढण्याचा निर्णय घेतला. त्यांना ती केस ब्रिटन येथे लढायची होती. त्यासाठी ब्रिटन विरोधात लढणारा एखादा वकील त्यांना हवा होता.

त्यांनी इंग्रजांच्या विरोधात असणाऱ्या जॉन लँग यांची निवड केली. लँग यांना सोन्याच्या पट्टीवर पत्र लिहून भेटायला येण्याचे निमंत्रण पाठवण्यात आले.

 

john lang-inmarathi02

 

जेव्हा त्यांना राणीने भेटण्याकरिता पत्र पाठवले तेव्हा ते भारतातच आग्रा येथे होते. त्यांना आग्र्याहून झाशीला येण्याकरिता २ दिवस लागले होते. जॉन लँग यांनी त्यांच्या पूर्ण भारत यात्रेविषयी एक पुस्तक लिहिले आहे.

यात त्यांचा आणि राणी लक्ष्मीबाई यांच्या भेटीचा उल्लेख आहे. जॉन लँग यांच्या या पुस्तकाच नाव ‘वांडरिंग्स इन इंडिया’ हे आहे.

लँग हे आग्रा ते ग्वालियर आले आणि तेथून राणीने पाठवलेल्या शानदार घोडागाडीने त्यांनी झाशीपर्यंतचा प्रवास केला. त्या गाडीत हात पंखे होते आणि त्या घोडा-गाडीचे घोडे हे फ्रेंच घोडे होते.

ते झाशी येथे पोहोचल्यावर तेथील लोकांनी त्यांचं कशाप्रकारे स्वागत केलं, राणीच्या महालात जाण्याआधी त्यांना बूट काढण्यास सांगण्यात आले होते. दामोदर यांच्याशी त्यांची पहिली भेट कशी झाली, हा इतिवृत्तांत त्यांनी त्यांच्या पुस्तकात मांडलेला आहे.

 

john lang-inmarathi01

 

राणी लक्ष्मीबाई यांनी जॉन यांना महालाच्या वरच्या खोलीत बोलावले. राणी आणि जॉन यांच्यामध्ये एक पडदा होता. ज्यातून राणींचा चेहरा थोडा देखील दिसत नव्हता.

तेव्हा अचानक राणीचा दत्तक पुत्र दामोदर राव यांनी पडदा बाजूला केला आणि जॉन यांना राणींचे दर्शन घडले.

 

rani lakshmibai-inmarathi

 

जॉन लँग हे राणीला बघून एवढे प्रभावित झाले, की ते राणी लक्ष्मीबाई यांना म्हणाले,

“If the Governor-General could only be as fortunate as I have been and for even so brief a while, I feel quite sure that he would at once give Jhansi back again to be ruled by its beautiful Queen.”

जॉन लँग त्यांच्या पुस्तकात राणी बद्दल लिहितात की,

‘महाराणी या साधारण उंची, साधारण शरीरयष्टी आणि गोल चेहरा असलेली एक खूप सुंदर महिला होती. त्यांचे डोळे तेजस्वी तर त्यांचे नाक खूप रेखीव होते. त्यांचा रंग खूप गोरा किंवा खूप सावळा नव्हता, त्यांच्या कानात डूल होते. त्या व्यतिरिक्त आणखी कुठलाच दागिना परिधान केलेला नव्हता.

त्यांनी पांढऱ्या रंगाचे मखमली कपडे नेसले होते. त्या खरंच खूप सुंदर दिसत होत्या. पण त्यांच्या या सुंदरतेत एकच अडचण होती आणि ती म्हणजे त्यांचा आवाज. त्यांचा आवाज खूप जड होता. पण त्या एक प्रभावशाली आणि समजूतदार  महिला होत्या.’

जॉन लँग व्यतिरिक्त इंग्रज सर रोबर्ट हॅमील्टन यांनी देखील राणीला बघितलं असल्याचं सांगितलं जातं, पण त्याबद्दल कुठलाही ठोस पुरावा नाही. इतिहासात त्या घटनेचा कुठेही उल्लेख आढळून येत नाही.

२०१४ मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील लँग यांचा उल्लेख केला होता. लँग यांनी राणींना केलेल्या मदतीमुळे भारत-ऑस्ट्रेलियाचे संबंध मजबूत होण्यास देखील मदत झाली.

 

modi-australia-visit-inmarathi

 

प्रसिद्ध लेखक रस्किन बॉन्ड यांनी १९६४ साली जॉन लँग यांची कबर मसुरी येथे शोधली होती. त्यानंतरच भारतीय लोकांना लँग बद्दल माहित झालं होतं.

जॉन लँग यांनी राणी लक्ष्मीबाई यांना त्यांच्या कठीण काळात मदत केली. तसेच त्यांनी त्यांच्या पुस्तकात झाशीच्या राणीचं जे वर्णन केलं आहे त्यामुळे आज भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला राणी लक्ष्मीबाई यांच्या शूर व्यक्तित्वाची दुसरी बाजू समजली… त्यासाठी जॉन लँग यांचे आम्ही आभार मानतो…

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?