' घरी मारहाण फक्त स्त्रियांना होत नाही – पुरुषांना होणाऱ्या मारहाणीचं धक्कादायक वास्तव! – InMarathi

घरी मारहाण फक्त स्त्रियांना होत नाही – पुरुषांना होणाऱ्या मारहाणीचं धक्कादायक वास्तव!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आपल्या भारतामध्ये स्त्रियांवर दरवेळी वेगवेगळ्या कारणांमुळे अत्याचार होत आले आहेत, लग्न झालेल्या स्त्रियांनी सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याच्या घटना देखील अनेकदा घडल्या आहे.

आज आपला देश एवढा प्रगत झालेला असूनही, स्त्रियांवर होणारे अत्याचार कमी होताना दिसून येत नाही, प्रत्येकवेळी स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराची एक नवीन बातमी कानावर पडते. त्यामुळे आपल्या देशातील स्त्रियांच्या सुरक्षिततेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. हे कुठेतरी कमी होणे, गरजेचे आहे.

यासाठी पोलीस प्रशासनाने स्त्रियांवर होणाऱ्या या अत्याचारांना रोखण्यासाठी आता योग्य ती पाऊले उचलायला सुरुवात केली आहे आणि ती काही प्रमाणात यशस्वी देखील होताना दिसून येत आहे.

असो, हे तर आहेच, पण आज आम्ही तुम्हाला ह्याच्या विपरीत अशी माहिती देणार आहोत. आपल्या भारताच्या पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये पुरुषांवर अत्याचार झाल्याचे आपण खूप कमी वेळा ऐकले असेल. पण हो, कधीकधी उलट होते आणि पुरुषांवर देखील अत्याचर आणि अन्याय होतो.

टाईम्स ऑफ इंडियाच्या एका वृत्तानुसार, काही वर्षांपूर्वी उत्तरप्रदेश या फक्त एका राज्यामध्ये गेल्या एका वर्षात ६,६४६ पुरुषांनी पोलीस हेल्पलाईनवर घरगुती हिंसेची तक्रार नोंदवली आहे. जे आपल्या पत्नीच्या हिसंक प्रवृत्तीला त्रासले होते.

पण स्त्रियांवर होणारी घरगुती हिंसेच्या प्रकरणांची संख्या यापेक्षा कितीतरी पटीने जास्त होती. गेल्या एका वर्षात पत्नींकडून १ लाख ५३ हजार तक्रारी नोंदवण्यात आलेल्या आहेत, म्हणजेच प्रत्येक दिवशी सरासरी ४१९ तक्रारी नोंदवण्यात येतात.

यूपी – १०० ऑपरेशनला एक वर्ष होण्याच्या मुहूर्तावर या आकड्याला उघड करण्यात आले. एका वर्षामध्ये पोलिसांना ४३ लाख फोन मदतीसाठी करण्यात आले होते. ज्यामधील ७ लाख फोन हे घरगुती हिंसाचाराविषयी होते.

 

Mans beaten by wife.Inmarathi2

 

या आकड्यांची पडताळणी केल्यावर हे लक्षात आले की, शहरी क्षेत्रांमधून घरगुती हिंसाचाराच्या जास्त तक्रारी येतात. लखनऊ, गोरखपूर, आग्रा, अलाहाबाद यांसारख्या शहरांची नावे या यादीमध्ये सर्वात वरती येतात. सर्वात जास्त तक्रारी गोरखपूरमधील गोरखपूर कोतवाली भागामधून येतात. हा प्रदेश १६ ग्रामीण आणि १० शहरी पोलीस ठाण्यांमध्ये विभागलेला आहे.

यावरून समजते की, काही ठिकाणी स्त्रियांसोबताच नाहीतर पुरुषांबरोबर देखील अन्याय होतात आणि या जगात केवळ पती पिडीत स्त्रियाच नाहीत पत्नी पिडीत पुरुष देखील आहेत.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?