'अनिल कपूरच्या ‘नायक’पेक्षाही भारी! हे आहेत वास्तव जगातील १० नायक!

अनिल कपूरच्या ‘नायक’पेक्षाही भारी! हे आहेत वास्तव जगातील १० नायक!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आपण नेहमीच देशाची बाहेरील शत्रूंपासून सुरक्षा करणाऱ्या सैनिकांचे कौतुक करत असतोच. करायलाही हवं.

कारण हे सैन्यातील जवान आपल्या जीवाची पर्वा न करता प्रामाणिकपणे आणि निष्ठेने देशाची सुरक्षा करतात. देशाला सुरक्षित ठेवण्याचं काम करतात.

त्यामुळे सहाजिकच आपल्याला त्यांचा अभिमान असणारच.

पण आपल्या देशात आणखी काही असे अधिकारी देखील आहेत, ज्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या कर्तव्याकरिता स्वतःला समर्पित केले.

आपण अनिल कपूरचा नायक हा चित्रपट बघितला असेलच, पण आज आम्ही तुम्हाला आपल्या देशातील खऱ्या नायकांची ओळख करवून देणार आहोत.

१. नरेंद्र कुमार

 

Narendra-Kumar-inmarathi

 

आयपीएस नरेंद्र कुमार यांनी २००९ साली बिहार राज्यातून आपल्या करिअरची सुरवात केली. जेव्हापासून त्यांनी त्याचं पद संभाळल तेव्हापासूनच त्यांनी आपल्या कर्तव्याप्रती शौर्य आणि बांधिलकीची एक वेगळीच परिभाषा मांडली.

त्यानंतर ते मोरेना मध्य प्रदेशच्या कार्यालयात रुजू झाले. ते अवैधरित्या चालत असलेल्या दगड खनन थांबविण्याकरिता प्रसिद्ध होते. तसेच त्यांनी त्यांच्या कार्यकाळाचा खूप वेळ हा माईन माफियांविरोधात लढण्यात घालवला.

२०१२ साली या अधिकाऱ्याची मायनिंग माफियाच्या सदस्यांनी हत्या केली. तेव्हा ते केवळ ३० वर्षांचे होते. नरेंद्र कुमार कर्तव्यावर असताना त्यांना अवैधरित्या खनन करून दगड नेण्यात येणारा ट्रॅक्टर दिसला.

त्यांनी या ट्रॅक्टरला थांबविण्याचा प्रयत्न केला, पण जेव्हा तो नाही थांबला तेव्हा नरेंद्र कुमार त्या ट्रॅक्टर समोर उभे झाले. पण त्या ट्रॅक्टरच्या ड्रायव्हरने ट्रॅक्टर न थांबवता तो नरेंद्र यांच्यावर चढवला ज्यात नरेंद्र यांचा मृत्यू झाला.

या वीराची पत्नी देखील एक आयएएस अधिकारी आहे.

२. अजित डोवाल

 

Ajit-Doval-inmarathi

 

अजित डोवल हे नाव तर सर्वज्ञात आहे, ते १९६८ बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत आणि ते त्यांच्या कार्यकाळादरम्यान त्यांच्या प्रशंसनीय कामामुळे प्रसिद्ध होते. त्यांनी मिझोरम, पंजाब आणि काश्मीर येथील विद्रोहींच्या संचालनात सक्रीय भूमिका निभावली.

त्यांनी विद्रोहींना अतांकवाद्यांच्या विरोधात भारतीय सेनेची मदत करण्याकरता, तसेच आतंकवाद्यांच्या विरोधात होण्याकरिता त्यांचे मन वळवले.

या राज्यांत आपल्या असाधारण कामांसोबतच त्यांनी १९७१-१९९९ च्या इंडियन एअरलाईन्सच्या सर्व १५ अपहारणामध्ये मोलाची भूमिका निभावली होती. एवढचं नाही तर ते एक अतिशय धोकादायक कामासाठी पाकिस्तानात एक गुप्त एजंट म्हणून देखील राहिले.

त्यानंतर ते इंटेलिजन्स ब्युरोमध्ये रुजू झाले. सध्या ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकरिता राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार या पदावर कार्यरत आहेत.

 

३. बी. चंद्रकला

 

B-CHANDRAKALA-inmarathi

 

बी चंद्रकला यांनी नेहमीच भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या विरोधात आवाज उठवला.

त्यांच्या पहिल्या पोस्टिंगवरून त्यांना दुसऱ्या ठिकाणी ट्रान्स्फर करण्यात आलं होतं, कारण त्यांनी चुकीचा मार्ग स्वीकारण्यास नकार दिला. जे आपल्या कर्त्यव्याबद्दल प्रामाणिक नाहीत त्यांना सर्वांसमोर आणण्यात त्या थोड्याही घाबरत नाहीत.

 

४. आर्मस्ट्रांग पेम

 

Armstrong-Pame-inmarathi

 

मणिपूर येथील आर्मस्ट्रांग पेम हे एक तरुण आयएएस अधिकारी आहेत. सामाजिक सुधार यात ते एवढे समर्पित आहेत की, मणिपूरच्या लोकांच्या भल्यासाठी त्यांनी मणिपूरच्या एका पहाडात सरकारच्या मदतीशिवाय १०० किलोमीटर लांब रस्ता बनवला.

त्यांच्या या मेहनत आणि निष्ठेला बघून तेथील लोकांनी देखील त्यांना समर्थन दिले आणि त्यातून ‘लोकांचा रस्ता’ अस्तित्वात आला. ज्यामुळे राज्यातील इतर भाग या पहाडीसोबत जुळला.

त्यांनी यासाठी त्यांच्या बचत केलेल्या पैश्यांचा वापर केला. तसेच या प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी सोशल नेटवर्किंग साईटच्या माध्यमातून पैसे जोडले. तेथील रहिवासी त्यांना प्रेमाने ‘चमत्कारिक मनुष्य’ म्हणून संबोधतात.

 

५. सत्येंद्र दुबे

 

satyendra-dubey-inmarathi

 

या यादीतील आणखी एक नावं म्हणजे सत्येंद्र दुबे. हेदेखील त्यांच्या कर्तव्याप्रती आणि नैतिकतेसाठी प्रसिद्ध आहेत. सत्येंद्र दुबे हे एक भारतीय इंजिनिअर सेवा अधिकारी आहेत.

ते झारखंडच्या कोडरमा येथे राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (एनएचएआई) मध्ये प्रकल्प निर्देशक होते. जिथे ते स्वर्णिम चतुर्भुज प्रकल्पावर काम करत होते.

त्यांनी वित्तीय अनियमितता आणि उद्योगातील अनेक भ्रष्ट कामांना उजेडात आणण्याचं साहस दाखवलं. त्यांनी अनेक ठेकेदारांना रस्त्याची पुनर्निर्मिती करताना निकृष्ट दर्ज्याचे सामान वापरताना बघितले.

त्यासाठी त्यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना एक पत्र लिहिले ज्यात त्यांनी प्रकल्पातील भ्रष्टाचार आणि आर्थिक घोटाळा उघड केला होता.

त्यांनी हे पत्र लिहिताना त्यांची ओळख गुप्त ठेवण्याची विनंती केली होती. कारण या घोटाळ्यात अनेक मोठी नावं समाविष्ट होती. पण अखेर त्याचं नावं बाहेर आलं आणि त्याची त्यांना खूप मोठी शिक्षा मिळाली.

काही महिन्यानंतर बिहारच्या दुबे येथे गोळी झाडून त्यांची हत्या करण्यात आली.

 

६. शन्मुग्म मंजुनाथ

 

Shanmugam Manjunath-inmarathi

 

हा अधिकारी इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने येथे विक्री प्रबंधक म्हणून कार्यरत होते. ते भेसळयुक्त इंधनाच्या विक्रीला रोखू इच्छित होते. त्यांच्या शौर्याने त्यांना देशातील सर्वात चांगल्या अधिकाऱ्यांपैकी एक बनवले.

लखनऊमध्ये भेसळयुक्त इंधन विकणाऱ्या दोन पेट्रोल पंपांचा कारभार उघड करणार होते. त्यांनी त्या पंपांना सील करण्याचा आदेश देखील दिला, पण त्यांनी परत आपला कारभार सुरु केला.

तेव्हा त्यांनी या पंपांवर धाड टाकण्याची योजना आखली.

पण त्याच रात्री त्यांच्यावर ६ गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली. त्यांचा मृतदेह त्यांच्याच गाडीच्या मागच्या सीटवर आढळला. त्यादिवशी परत एकदा एका इमानदार अधिकारी भ्रष्टाचाऱ्यांच्या बळी पडला आणि देशाने एक सक्षम अधिकारी गमावला.

 

७. शिवदीप वामन लांडे

 

shivdeep-lande-inmarathi

 

२००६च्या बॅचचा हा आयपीएस अधिकारी त्याच्या कामांमुळे नेहेमी चर्चेत राहिला आहे. त्यांनी अनेक गुन्हेगारांना अटक केली. महिलांच्या सुरक्षेकरिता कामे केली. तसेच फार्मास्यूटिकल माफियांना देखील रोखले.

त्यांच्या कार्यकाळात पटना येथील क्राईम रेट खूप घसरला आहे. त्यांच्या पर्यंत लोक सहजपणे पोहोचू शकतात. असं म्हणतात की, त्यांना दर दिवशी शेकडो मेसेज मिळतात आणि प्रत्येक मेसेजचं उत्तर देण्यात येईल हेही ते बघतात.

त्यांच्या अधिकार क्षेत्रात चालणाऱ्या अवैध दारू विक्रीवर आळा घालण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. ते त्यांच्या वेतनाचा ७० टक्के भाग हा सामाजिक कार्यासाठी दान करतात. ज्यामध्ये गरीब मुलींची लग्न, गरीब मुलांकरिता हॉस्टेल बनवणे हे सर्व येत.

जेव्हा त्यांना पटनावरून अररिया येथे ट्रान्स्फर देण्यात आले, तेव्हा त्यांच्या समर्थनार्थ कित्येक लोक रस्त्यावर उतरले आणि सरकारच्या या निर्णया विरोधात मेणबत्त्या पेटवून आपला रोष दर्शवला.

ते सध्या अँटी नार्कोटिक्स विभागात डेप्युटी इन्स्पेक्टर म्हणून कार्यरत आहेत.

 

८. यू. सागायम

 

U. Sagayam-inmarathi

 

तामिळनाडूच्या या सिविल कर्मचाऱ्याचे त्याच्या २० वर्षांच्या कार्यकाळात २० वेळा ट्रान्स्फर करण्यात आले आहे. ते भ्रष्टाचाराविरोधात लढण्याकरिता प्रसिद्ध आहेत.

आपली संपत्ती सार्वजनिकपणे घोषित करणारे ते पहिले आयएएस अधिकारी अधिकारी आहेत.

मदुराई येथे अवैध ग्रेनाईट खननवर त्यांच्या कारवाहीने अनेक राजनेता आणि व्यावसायिकंच्या विरोधात गुन्ह्याचं नेतृत्व केलं होतं.

त्यांनी रेस्टॉरंटमध्ये वापरण्यात येणारे घरच्या वापराकरिता असलेल्या ५ हजारपेक्षा जास्त सबसिडी गॅस सिलेंडर देखील जप्त केले होते. त्यांनी मतदानादरम्यान वोट विकत घेण्याविरूद्ध देखील आवाज उठवला.

जेव्हा त्यांना मदुराईच्या कलेक्टर पदावरून त्यांची ट्रान्स्फर सह-ऑप्टेक्स पदावर करण्यात आली तेव्हा या निर्णयाचा तेथील सामान्य जनतेने विरोध केला.

 

९. वी. वी. लक्ष्मीनारायण

 

V. V. Lakshminarayana-inmarathi

 

लक्ष्मीनारायण हे एका सामान्य नागरिकांसारखे राहतात, ते कुठेही जाण्याकरिता बसचा वापर करतात. पण त्यांनी अनेक भ्रष्ट अधिकाऱ्यांना समोर आणले. ते सीबीआयचे जॉईंट डायरेक्टर बनले.

त्यांनी सत्यम घोटाळ्यात सामील असलेले जनार्दन रेड्डी यांच्या ओबुलापुरम माइनिंग कंपनीच्या अवैध खनन केस, वाईएसजी जगनमोहन रेड्डी याची अवैध संपत्ती आणि सोहराबुद्दीन शेख यांच्या खोट्या एन्काऊंटर सहित १९ हाय प्रोफाईल केस सांभाळल्या.

ते जगन मोहन रेड्डी यांना अटक करण्याकरिता ओळखले जातात. तसेच ते एक अप्रतिम वक्ता देखील आहेत.

 

१०. एस आर शंकरन

 

S.R. Sankaran-inmarathi

 

ह्या माजी आयपीएस अधिकाऱ्याला ‘आदर्श लोकांचा एक आयपीएस अधिकारी’ म्हणून संबोधलं जातं त्यांनी गरिबांसाठी नेहेमी काम केलं.

गरीब लोकांकरिता तयार करण्यात आलेल्या धोरणांत त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली तसेच गुलामांच्या श्रमबंदीचे उच्चाटन यामागे देखील तेच होते.

त्यांनी अनुसूचित जाती आणि जमातींसाठी विशेष योजना निर्माण केल्या, ग्रामिण विकास कार्यक्रमात दुर्लक्षित जमातींना संसाधनांचे वाटप केले. समाजाची सेवा करता यावी याकरता त्यांनी कधी लग्न देखील नाही केलं.

२०१० साली आजारपणामुळे त्यांचा मृत्यू झाला. त्यांना ‘लोकांचा माणूस’ म्हणून ओळखल्या जातं.

या अधिकाऱ्यांनी आपल्या कर्तव्याप्रती आपली सचोटी आणि निष्ठा दाखवून आपल्या समोर एक उदाहरण ठेवले आहे की, आपल्या देशात केवळ भ्रष्टच नाही तर प्रामाणिक अधिकारी देखील आहेत.

आपण सर्वांनी यांच्यापासून प्रेरणा घ्यायला हवी आणि आपणही जीवनात आपल्या देशाप्रती निष्ठा आदर आणि इमानदारी ठेवायला हवी…

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?