'फोटोतील कपड्यांवर आक्षेप घेणाऱ्याला तापसी पन्नू चं जबरदस्त प्रत्युत्तर

फोटोतील कपड्यांवर आक्षेप घेणाऱ्याला तापसी पन्नू चं जबरदस्त प्रत्युत्तर

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

बॉलीवूडच्या चित्रपटांना आज भारतामध्ये जेवढा मान मिळत आहे, तेवढाच मान टॉलीवूडला देखील मिळतो आहे. या दक्षिणात्य चित्रपटांमधील काही अभिनेते आपल्याला बॉलीवूडमध्ये पाहण्यास मिळतात. त्याचप्रमाणे आता या अभिनेत्री देखील आता बॉलीवूडमध्ये आपली पाऊले मजबूत करण्यासाठी पुढे सरसावत आहेत.

त्यातलीच एक म्हणजे तापसी पन्नू आहे.

दक्षिणात्य चित्रपटांमध्ये गाजलेली ही अभिनेत्री सध्या बॉलीवूडमधील काही चित्रपटांमध्ये दिसून आलेली आहे. नुकताच तिचा जुडवा – २ हा बॉलीवूड चित्रपट येऊन गेला. या चित्रपटामध्ये तिचा काहीसा बोल्ड अंदाज प्रेक्षकांना पाहण्यास मिळाला आहे.

 

Tapsee Pannu,Inmarathi
amazonaws.com

आपल्या भारतामध्ये स्त्रियांविषयी नेहमीच काही न काही बोलले जाते. त्यांच्या राहण्या – खाण्यापासून, वागण्यापासून ते अगदी त्यांच्या कपड्यांपर्यंत बोलले जाते. स्त्रियांनी कसे कपडे घातले पाहिजेत, हे देखील या पुरुषप्रधान भारतामध्ये स्त्रियांना समाजाच्या नावाखाली सांगितले जाते. समाजातील अशा प्रवृत्तीच्या माणसांकडून सामान्य स्त्रियांचाच काय, तर अभिनेत्रींचा देखील अपमान केला जातो.

तसे, चित्रपट सृष्टीतील सर्वच कलाकरांना ट्रोल केले जाते, पण आपल्या भारतामध्ये अभिनेत्यांपेक्षा अभिनेत्रींना जास्त ट्रोल केले जाते.

असेच, काहीसे तापसी पन्नू बरोबर घडले आहे. आजपर्यंत या लोकांनी कितीतरी अभिनेत्रींना शहाणपणा शिकवण्याचा प्रयत्न केला, पण काहींनी ते मनावर घेतले नाही, तर काहींनी त्यांना सडेतोड उत्तर दिले.

तापसीला असेच काहीसे शिकवण्याचा प्रयत्न एकाने केला आणि तिने त्याला असे काही उत्तर दिले की, आपण देखील तिच्या या उत्तराला दाद देऊ.

तर झालं काहीसं असं :

 

 

Tapsee Pannu,Inmarathi1
twitter.com

तापसीने आपल्या ट्विटर अकाऊंट वरून स्वतःचे काही फोटो शेअर केले होते. ती त्यामध्ये खूपच सुंदर दिसत होती, यात काहीच शंका नाही. तिने दिलेल्या फोटोच्या संदर्भावरून हे समजते की, हा फोटो कोणत्याही चित्रपटासाठी काढण्यात आलेले नाहीत.

हा एक रॉ फोटो आहे, जो तिने असाच काढलेला आहे आणि त्याचा वापर चित्रपटांच्या फोटोशूटसाठी केला जाणार नाही.

पण तिच्या त्या सौंदर्याची स्तुती करून तिला प्रेरणा देण्याऐवजी एकाने उगाचच तिला ट्रोल केले आणि तिला नको असलेले आपले मत मांडले. त्या माणसाचे म्हणणे पुढीलप्रमाणे,

 

 

Tapsee Pannu,Inmarathi2

 

यामध्ये तो म्हणतो की, ‘कपडे मिळत नाही आहेत की पैसे, की अंग प्रदर्शन केल्याविना चित्रपट मिळत नाहीये’…

पण तापसी पन्नू हिने त्याच्या म्हणण्याला, त्याच्या प्रमाणेच उत्तर दिले. तापसी हिने त्याच्या या बोलण्यावर दिलेले उत्तर पुढीलप्रमाणे :

 

Tapsee Pannu,Inmarathi3

 

ती म्हणाली की,

‘तुमच्यासारखे संस्कृतीचे रक्षक मिळत नाही आहेत सर, तुम्हाला शोधण्यासाठी असं करावं लागतं, नाहीतर तुमच्यासारखे हिरे सहजासहजी मिळतात कुठे’…

तिचं हे उत्तर म्हणजे त्या व्यक्तीच्या मानसिकतेवर तापसीची चपराकचं… तिचं हे उत्तर वाचून त्यालाच नाही तर त्याच्यासारख्या ‘संस्कृतीच्या रक्षकांना’ अद्दल नक्कीच घडली असेल…

आणि या तिच्या उत्तरला तिच्या चाहत्यांनी तसेच खुद्द बॉलीवूडचा स्टार अभिनेता अर्जुन कपूर याने देखील शाबासकी दिली आणि तिला समर्थन दिले.

अर्जुन कपूर याने तिच्या या सडेतोड उत्तराचे कौतुक केले आणि त्याने ट्वीटरवर दिलेली प्रतिक्रिया पुढीलप्रमाणे,

 

Tapsee Pannu,Inmarathi4
mid-day.com

Tapsee Pannu,Inmarathi5

एक गोष्ट या आताच्या बॉलीवूड अभिनेत्यांची खूप आवडणारी आहे, ती म्हणजे आताचे हे बॉलीवूड अभिनेत्यांना आपल्या बरोबर असलेल्या कलाकारांच्या कर्तुत्वाची जाणीव आहे. त्या

मुळे इंटरनेटवर होणाऱ्या या ट्रोलना सामोरे कसे जावे, याबाबतचे धडे ते त्यांना देण्याचा प्रयत्न करत असतात.

तापसीने दिलेल्या या सडेतोड उत्तरामुळे  तिला परत अशा प्रकारे ट्रोल करण्याआधी  एखादा नक्कीच विचार करेल.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?