काय आहे सोन भांडार गुहेतील ‘गुप्त खजिन्याचं’ रहस्य?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

काही वर्षांआधी उत्तर प्रदेशची एक बातमी खूप वायरल झाली होती, उत्तर प्रदेशच्या उन्नाव जिल्ह्यातील डौंडियाखेडा येथील एका साधू महाराजांनी राजा राव रामबक्ष सिंह यांच्या किल्ल्याखाली सोनं असल्याचं स्वप्न बघितलं होतं. त्यांच्या स्वप्नाला खरं मानून तेथील शासनाने सोनं शोधून काढण्यासाठी खोदकाम देखील केले.

शोभन सरकार नावाच्या या साधूने तिथे एक हजार टन सोनं असल्याची बतावणी केली होती. पण खोदकामात एक टन काय एक किलो सोनं देखील सापडलं नाही.

 

shobhan-sarkar-inmarathi
palpalindia.com

जगभरातल्या प्रसारमाध्यमांनी देखील याचे लाइव्ह प्रसारण केले होते. त्यावेळी आताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की,

‘कुठल्याही देशासाठी ही अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे की, एखाद्या बाबाच्या स्वप्नाच्या आधारे सरकारच्या आदेशावर पुरातत्वीय विभाग खोदकाम करत आहे.’

 

sonbhandarcaves-inmarathi (2)
news18.com

यावेळी जरी सोनं सापडलं नसलं, तरी आपण ही गोष्ट नाकारू शकत नाही की एकेकाळी आपल्या देशात खूप सोनं होत.

प्राचीन काळापासूनच आपला देश हा सोन्याचा देश म्हणून ओळखला जातो. आपल्या देशाला आधी हुण आणि मंगोलींनी लुटलं त्यानंतर मुघलांनी आणि मग ब्रिटिशांनी आपल्या देशातील सोनं लुटलं. तरी आजदेखील आपल्या देशात खूप सोनं लपलेलं आहे.

केरळच्या पद्मनाभ स्वामी मंदिरात देखील करोडो रुपयांचं सोनं सापडलं होतं. एवढं सोनं आलं कुठनं?

 

SonBhandarCaves-inmarathi03
hindigyanbook.com

देशात अश्या कितीतरी गुहा आहेत ज्यात आजही लाखो-करोडो टन सोनं लपलेलं आहे.

बौद्धकाळात बौद्ध आणि हिंदू राजांनी सोन्याला लपविण्यास सुरवात केली. कारण याच काळात लोकांमध्ये वैमनस्य वाढायला लागलं होतं. राजा-राजांमध्ये प्रतिस्पर्धा वाढली होती. अश्यात मौल्यवान वस्तूंच्या किंमती वाढायला लागल्या. त्यामुळे सर्वच आपापल्या खजिन्याला लपविण्याचा प्रयत्न करू लागले.

 

SonBhandarCaves-inmarathi04
cpreecenvis.nic.in

बिहार राज्यात अशी एक गुहा आहे, जिथे आजही लाखो टन सोनं असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येते.

ही गुहा बिहारच्या राजगीर शहरातील वैभवगीरी पहाडाच्या पायथ्याशी आहे. प्राचीन मगध साम्राज्याची राजधानी असलेलं बिहारचं राजगीर शहर एक ऐतिहासिक शहर आहे. येथेच बौद्धांनी मगध सम्राट बिम्बिसार यांना धर्मोपदेश दिला होता.

 

 

SonBhandarCaves-inmarathi02
ajabgjab.com

येथेच ई.स. पूर्व ३-४ मध्ये भगवान बुद्धांच्या स्मृतीत बनविण्यात आलेल्या अनेक स्मारकांपैकी एक म्हणजे ‘सोन भांडार गुहा’ (खजिन्याचा अमर्याद साठा) ही रहस्य आणि रोमांचने भरलेली आहे.

लोक कथांनुसार या गुहेत सोनं आणि बहुमुल्य दागिन्यांचा एक अमर्याद साठा आहे. येथे एवढं सोनं आहे की,  त्यामुळे भारत सोन्याच्या बाबतीत जगात पहिल्या क्रमांकावर येईल.

 

SonBhandarCaves-inmarathi05
ajabgjab.com

या गुहेत अमर्याद सोनं असल्याचं मानल्या जातं. पण या गुहेत शिरण्याचा रस्ता आजवर कोणालाही सापडलेला नाही.

हा खजिना १०.४×५.२ मीटरच्या आयताकार मजबूत खोलीत असल्याचं मानल्या जातं. जिथवर जाण्याचा रस्ता कोणाला माहिती असण्याची शक्यता नाही.

या गुहेतील घुमटची आतील बाजू सरळ भिंतींच्या आधारे १.५ मीटर एवढी उंच आहे, जी खडकांना तोडून बनविण्यात आली आहे. ही गुहा मौर्यकालीन गर्भगृहांसारखी दिसून येते.

 

SonBhandarCaves-inmarathi08
bhaskar.com

या गुहेत दोन खोल्या आहेत. या दोन्ही खोल्या खडकाच्या एका मोठ्या तुकड्याने बंद आहेत.

पहिली खोली ही सुरक्षा रक्षकांची असल्याचं मानलं जातं. तर दुसऱ्या खोलीत सम्राट बिम्बिसारचा खजिना होता असं मानलं जातं.

असं म्हणतात की आजही बिम्बिसारचा तो खजिना तिथेच आहे. हा खजिना जरासंध, जो कंसाचा असुर होता, त्याचा असल्याचं देखील सांगण्यात येतं.

 

SonBhandarCaves-inmarathi

 

सोन भांडार गुहे जवळ या गुहेसारखीच आणखी काही गुहा देखील आहेत ज्यांना बराबर गुहा म्हणतात. या गुहांच्या खोल्या देखील सोन भांडार गुहे प्रमाणेच बनविण्यात आल्या आहेत. या गुहांची नोंद ५ व्या आणि ६ व्या दशकात करण्यात आली होती याचे पुरावे अभिलेखाच्या स्वरुपात या गुहांच्या आत तसेच बाहेरही बघायला मिळतात.

 

SonBhandarCaves-inmarathi07
ajabgjab.com

या गुहांना बनविण्यासाठी वापरण्यात आलेले तंत्रज्ञान यांमुळेच या गुहांतील सोनं अजूनही सुरक्षित आहे. या गुहांमध्ये असणाऱ्या खजिन्यापर्यंत जाण्याचा रस्ता हा एका मोठ्या प्राचीन खडकाच्या मागून जातो. तर काही लोकांच्या मते या गुहांत लपविण्यात आलेल्या खजिन्यापर्यंत पोहोचण्याचा रस्ता हा वैभवगिरी पर्वत सागरहून सप्तपर्णी गुहांपर्यंत जातो. जो सोन भांडार गुहांच्या दुसऱ्या बाजूने निघतो.

जर कधी या गुहेत लपलेला खजिना शोधण्यात यश आले तर देशाच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. तसेच आपला देश जगातील सर्वात शक्तिशाली देश बनेल.

आपल्या देशातील अश्या प्रकारच्या अनेक गुहांत तसेच मंदिरांत देखील असे गुप्त खजिने असल्याची शक्यता आहे. 

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?