ही ८ तुरुंगं – पंचतारांकित हॉटेल्सपेक्षा कमी नाहीत

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

तुरुंग म्हटले की, आपल्यासमोर चित्रपटांमध्ये दाखवण्यात येणारे विविध तुरुंग आठवतात. चित्रपटांमध्ये आपल्याला दाखवण्यात येते की, तुरुंगवासामध्ये राहणाऱ्या लोकांना खूप समस्यांचा सामना करावा लागतो. तुरुंग, अर्थातच शिक्षा देण्यासाठी असतात. त्यामुळे तिथलं जीवन कठोर असणं स्वाभाविक आहे. परंतु अनेक तुरुंगांमध्ये कैद्यांचे हाल होतात. त्यांना खाण्यासाठी अन्न देखील चांगले मिळत नाही. त्यामुळे कधीही तुरुंगाचा विषय काढला तर जनसामान्यांच्या मनामध्ये धडकी भरते. जे चित्रपटांमध्ये तुरुंगाविषयी दाखवले जाते, ते काही प्रमाणात खऱ्या जीवनात घडते. चित्रपटांमध्ये दाखवल्याप्रमाणे काही तुरुंग आहेत, पण काही तुरुंग यांच्यापेक्षा खूप वेगळे आहेत.

आज आम्ही तुम्हाला अशा काही तुरुंगांविषयी सांगणार आहोत, जे एखाद्या बंगल्याप्रमाणे आहेत आणि तेथील कैद्यांना खूप मोकळीक दिली जाते.

चला तर मग जाणून घेऊया, या अलिशान तुरुंगांबद्दल…

१. बेस्तॉय तुरुंग, नॉर्वे (Bastoy Prison, Norway)

 

Luxurious prisons.Inmarathi

बेस्तॉय बेटावर बनवले गेलेले तुरुंग खूप वेगळे आहे. नॉर्वेच्या या तुरुंगामध्ये खूप कमी सुरक्षा ठेवण्यात आलेली आहे. हे तुरुंग जगातील सर्वात पहिले इकोलॉजिकल तुरुंग बनण्याच्या मार्गावर आहे. या तुरुंगामध्ये राहणारे कैदी एका लाकडाच्या बॉक्समध्ये राहतात.
तसेच, त्यांना येथे शेतामध्ये काम देखील करावे लागते.

आपल्या उरलेल्या वेळेमध्ये येथील कैदी आपल्या इच्छेनुसार, घोडेस्वारी, फिशिंग किंवा टेनिस खेळून आपला वेळ घालवतात. खासकरून, या तुरुंगामधून सुटणाऱ्या कैद्यांद्वारे परत एखाद्या गुन्ह्यात सामील असल्याचे प्रकरणे फक्त १६ टक्के आहेत. हा आकडा युरोपियन देशांमध्ये ७० टक्क्यांपर्यंत आहे. त्यामुळे यावरून हे समजते की, हे तुरुंग कैद्यांमध्ये चांगल्याप्रकारची सुधारणा करते.

 

२. हल्डेन तुरुंग, नॉर्वे (Halden Prison, Norway)

 

Luxurious prisons.Inmarathi1
binsbox.com

हल्डेन तुरुंग हे निसर्गाच्या सानिध्यामध्ये स्थित आहे. या तुरुंगाच्या आजूबाजूचा परिसर निसर्गाने वेढलेला आहे. या कारागृहात कैद्यांसाठी आरामशीर क्वार्टर्स बनवल्या आहेत, जिथे ते एकांतामध्ये राहू शकतात. त्यांच्या मनोरंजनासाठी येथे खूप गोष्टी आहेत, त्याचबरोबर सर्व सुविधा असलेले जिमदेखील आहे. येथील कैदी व्हिडियो गेम्स खेळणे, चित्रपट पाहणे आणि इतर काही गोष्टी करून आपला वेळ घालवतात.

 

३. चँप-डॉलन तुरुंग, स्वित्झर्लंड (Champ-Dollon Prison, Switzerland)

 

Luxurious prisons.Inmarathi2
ytimg.com

स्वित्झर्लंडच्या जेनेव्हामध्ये असलेले हे तुरुंग पहिल्यापासून इतके आरामदायी नव्हते. युरोप अँटि-टॉर्चर कमिटीने २००८ मध्ये या तुरुंगाला खूप खराब रिव्ह्यू दिला होता. यानंतर स्विस सरकारने या तुरुंगाची परिस्थिती सुधारण्याचे ठरवले.

आज या तुरुगातील सुविधा कोणत्याही थ्री स्टार हॉटेलपेक्षा कमी नाही. या तुरुंगाच्या प्रत्येक रुममध्ये ३ कैदी राहतात. त्याचबरोबर रुममध्ये प्रायव्हेट बाथरूम देखील आहेत.

 

४. एचएमपी अॅडीव्हेल, स्कॉटलॅंड (HMP Addiewell, Scotland)

 

Luxurious prisons.Inmarathi3
sps.gov.uk

या तुरुगांमध्ये कैद्यांना खूप काही शिकवले जाते. एचएमपी अॅडीव्हेल या दक्षिणी स्कॉटलॅंडमधील तुरुंगाच्या मॅजेस्टीने आठवड्यातील ४० तास कैद्यांमध्ये असलेले कौशल्य वाढवण्यासाठी वाटून दिलेले आहेत. आपल्या नागरी जीवनामध्ये उपयुक्त असे बदल कसे करावे, यावर विशेष भर दिला जातो. अॅडीव्हेल असणाऱ्या ७०० हून अधिक कैद्यांना एका चांगल्या हाताखाली आपण महत्त्वपूर्ण बाबी शिकत आहोत, असे वाटते.

 

५. सेबु तुरुंग, फिलिपिन्स (Cebu Prison, Philippines)

 

Luxurious prisons.Inmarathi4
wordpress.com

दिवसभर तुरुंगातील एका रुममध्ये बसून राहणे खूपच कांटाळवाणे असेल. फिलिपिन्सच्या या तुरुंगातील कैदी डान्स ग्रुप ज्वाइन करू शकतात. सुरुवातीला हा डान्स ग्रुप कैद्यांचे दररोजच्या कवयतीसाठी होता. पण काही काळाने याला खऱ्या डान्स ग्रुपसारखे चालवण्यात येऊ लागले.

 

६. अरानज्यूझ तुरुंग, स्पेन (Aranjuez Prison, Spain)

 

Luxurious prisons.Inmarathi5
gulfnews.com

स्पेनचे हे तुरुंग जगातील एकमेव असे तुरुंग आहे, जिथे कैद्यांच्या कुटुंबियांना राहण्यासाठी देखील रूम आहेत. सामान्यपणे जर एखाद्या कैद्याला मूल झाल्यास त्याला इतर कुटुंबाजवळ किंवा फोस्टर केयरमध्ये पाठवण्यात येते, येथे कैद्यांबरोबर त्यांची छोटी मुले वयाच्या तीन वर्षापर्यंत सोबत राहू शकतात. येथे लहान मुलांसाठी खूप सुंदर रूम आहेत. त्याचबरोबर मुलांना खेळण्यासाठी येथे अजून काही लहान मित्र देखील भेटतात. हे जगातील खूप वेगळे आणि आकर्षक आहे.

 

७. सोलंटुना जेल, स्वीडन (Sollentuna Prison, Sweden)

 

Luxurious prisons.Inmarathi6
rtoz.org

तुरुंगामध्ये राहताना कैदी आपल्या शरीराकडे लक्ष देऊ शकत नाही. पण ही समस्या स्वीडनमधील या जेलमध्ये होणार नाही, कारण या तुरुंगात कैद्यांसाठी आधुनिक जिम बनवण्यात आले आहे. त्याचबरोबर, येथे कैदी किचनमध्ये स्वतःचे जेवण स्वतः तसेच त्यांच्या खोलीमध्ये बसून आरामात टीव्ही बघू शकतात.

 

८. जस्टीस सेंटर लोबेन, ऑस्ट्रिया (Justice Center Leoben, Austria)

 

Luxurious prisons.Inmarathi7
wp.com

ऑस्ट्रियाच्या या तुरुंगामध्ये कैद्यांना सामान्य नागरिकांप्रमाणे समान अधिकार प्राप्त होतात. येथे कैद्यांना नागरिकांप्रमाणे सन्मानाने वागवले जाते. इतर तुरुंगांपेक्षा वेगळे – या तुरुंगाच्या भिंती लाकडाच्या आणि शटरप्रूफ काचेने बनवली गेली आहे. येथे काही कैद्यांचे सेल्समध्ये बाल्कनी देखील आहे. पण सुरुक्षेसाठी त्यांना ग्रील्स लावण्यात आलेल्या आहेत. काही रुममध्ये किचन देखील आहेत.

येथील कैद्यांना कोणत्याही प्रकारचा गणवेश नाही. त्यांना स्वतःच्या आवडीचे कपडे घालण्याची सूट आहे. याबद्दल येथील वॉर्डनचे म्हणणे आहे की, येथून बाहेर गेल्यानंतर येथील कैद्यांना बाहेरच्या वातावरणामध्ये लगेच रमता यावे, यासाठी येथे एवढी सूट दिली जाते.

अशी ही तुरुंगे खूपच वेगळी आणि कोणत्याही कैद्याला येथे राहण्यास आवडेल अशी आहेत. अर्थात, शिस्त या तुरुंगांमध्ये देखील तेवढीच पाळली जाते.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?