‘ह्या’ उत्तराने तिने जिंकली मन आणि मिळविला ‘मिस वर्ल्ड 2017’ बनण्याचा मान

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

भारताची 20 वर्षीय मानुषी छिल्लरने 2017 चा मिस वर्ल्डचा किताब आपल्या नावावर केला आहे. चीनमध्ये झालेल्या मिस वर्ल्डच्या स्पर्धेसाठी जवळपास 130 देशातून सौंदर्यवती सहभागी झाल्या होत्या. मानुषीने दक्षिण अफ्रिका, वियतनाम, इंडोनेशिया आणि फिलिपिन्सच्या सौंदर्यवतींना मागे टाकत हा किताब पटकावला. 2016 मधील मिस वर्ल्ड प्यूटो रिकोची स्टेफनी डेल वेलीने विश्व सुंदरीचा हा मुकुट मानुषीच्या डोक्यावर घातला.

 

manushi chhillar-inmarathi06
tribune.com.pk

मानुषीने 17 वर्षांनंतर हा मान देशाला मिळवून दिला आहे. याआधी 17 वर्षांआधी प्रियांका चोप्रा हिने हा किताब मिळविला होता. हा किताब जिंकणारी मानुषी छिल्लर देशातील 6 वी मिस वर्ल्ड बनली आहे. 17 वर्षांनंतर हा किताब पुन्हा एकदा भारताच्या नावे करून तिजे जगभरात भारताचा मान उंचावला आहे.

 

manushi chhillar-inmarathi01
ndtv.com

हरियाणा येथे जन्मलेली मानुषी ही स्वतः एक मेडिकल विद्यार्थिनी आहे. मानुषीचे शिक्षण दिल्ली आणि सोनीपत येथे झाले. तर तिचे वडील हे डीआरडीओमध्ये वैज्ञानिक आहे. तिची आई नीलम या देखील बायोकेमिस्‍ट्रीमध्ये एमडी आहेत. मानुषीने दिल्लीच्या सेंट थॉमस शाळेतून शिक्षण घेतले. सोनीपतच्या भगत फूल सिंह गवर्नमेंट मेडिकल कॉलेज फॉर वूमन येथून ती मेडिकलचे शिक्षण घेत होती. पण मिसवर्ल्ड बनण्यासाठी तिला तिच्या शिक्षणातून एक वर्षाचा ड्रॉप घ्यावा लागला.

 

manushi chhillar-inmarathi03
ndtv.com

या स्पर्धेचे सर्व राउंड पार करत मानुषी शेवटच्या राउंड पर्यंत पोहोचली. या राउंडमध्ये तिला एक प्रश्न विचारण्यात आला ज्याचं उत्तर देऊन तिने सर्वांचं मन जिंकलं. तिला विचरण्यात आलं की, तिच्या हिशोबानी सर्वात जास्त वेतन मिळविण्याचा अधिकार कुठल्या व्यवसायाला आहे. यावर उत्तर देत ती म्हणाली की,

‘माझ्या मते आईला सर्वात जास्त आदराचा हक्क आहे आणि जर तुम्ही वेतन बद्दल बोलत आहात तर ते फक्त पैश्यांबद्दल नसून तो प्रेम आणि आदर आहे जो तुम्ही कोणाला देता. माझी आई माझ्या जीवनातील सर्वात मोठी प्रेरणा आहे.’

पुढे ती म्हणाली की,

‘सर्वांचीच आई ही तिच्या मुलांकरिता खूप काही त्यागते. म्हणून मला असं वाटत की आईला सर्वात जास्त वेतन मिळायला हवं.’

 

manushi chhillar-inmarathi04
starsunfolded.com

20 वर्षीय मानुषीला डेंजरस गेम्स खेळायला खूप आवडतात. तिला पॅराग्लायडिंग, बंजी जम्पिंग आणि स्कुबा डायविंग खूप आवडत. यासोबतच तिला पेंटिंगची देखील आवड आहे.  मानुषीने नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा येथून देखील ट्रेनिंग घेतली आहे. रिकाम्या वेळात तिला स्विमिंग करायला आवडत तसेच तिला कवितांची देखील आवड आहे.

 

manushi chhillar-inmarathi05
indiatimes.com

मानुषी ही कुचीपुडी या नृत्य प्रकारात पारंगत आहे. तिने डान्सर राजा आणि राधा रेड्डी यांच्याकडून या नृत्याची ट्रेनिंग घेतली आहे.

भारताने आतापर्यंत सहा वेळा हा किताब पटकावला आहे. त्यामुळे सर्वाधिक वेळा मिस वर्ल्डचा किताब पटकावणाऱ्या देशांच्या यादीत भारताचा समावेश झाला आहे.

 

manushi chhillar-inmarathi02
indianexpress.com

भारताने सहा वेळा हा किताब मिळवत व्हेनेझुएलाच्या विक्रमाची (1955,1981,1984,1991,1995,2011) बरोबरी केली. व्हेनेझुएलानेही सहा वेळा हा मान मिळवला आहे. याआधी रीता फरिया(1966), ऐश्वर्या राय(1994), डाइना हेडन(1997), युक्ता मुखी(1999), प्रियंका चोपड़ा(2000)  आणि आता मानुषी छिल्लर(2017)  यांनी हा किताब मिळविला आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

One thought on “‘ह्या’ उत्तराने तिने जिंकली मन आणि मिळविला ‘मिस वर्ल्ड 2017’ बनण्याचा मान

  • November 21, 2017 at 1:02 am
    Permalink

    Mast app ahe

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?