'दहशतवाद्याला पडकण्यासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती देणा-या ख-याखु-या हिरोची कथा नक्की वाचा

दहशतवाद्याला पडकण्यासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती देणा-या ख-याखु-या हिरोची कथा नक्की वाचा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

काबुल अफगाणीस्तान मध्ये काही वर्षांपूर्वी ट्रेनिंग पूर्ण करून आलेला तरूण ऑफिसर. वय वर्ष फक्त २५, नाव सय्यद बासम पाछा, अफगाणिस्तान पोलिसात लेफ्टनंट या पदावर कार्यरत होता.

एका सभागृहात सुरू असलेल्या कार्यक्रमात नागरिक आणि महत्वाच्या राजकीय व्यक्ती होत्या. तिथेच मोठा पोलीस बंदोबस्त होता. पाछाही तिथेच बंदोबस्ताला होते.

दरम्यान त्यांना एक संशयीत व्यक्ती हॉलच्या दिशेने पोलिसांची नजर चुकवत जाताना दिसली. त्यांनी त्या व्यक्तिला थांबण्यासाठी सांगितले असता तो पुढेच धावत सुटला.

क्षणाचाही विलंब न लावता पोलीस अधिकारी पाछा यांनी त्या व्यक्तीवर झेप घेतली.

 

army pasha

 

त्या आत्मघातकी दहशतवाद्याच्या लक्षात आले की आपल्याला पोलिसांनी ओळखले आहे.

अधिकारी पाछा यांनी त्या दहशतवाद्याला पकडले असताना त्याने त्याच्या कंबरेला असलेल्या बॉम्बचे बटण दाबले आणि एक मोठा स्फोट झाला. त्यामध्ये सात पोलीस कर्मचारी, सहा नागरिक मारले गेले तर इतर 18 जण जखमी झाले आहेत.

 

Suicide Bomber InMarathi 2
Twitter

 

या घटनेमध्ये राह–ए –फरदा रेडियो आणि टिव्हीचे दोन पत्रकार सापडले आहेत. पत्रकार ताकी सादीक् आणि कॅमेरामन हुसेन नाझरी अशी त्यांची नावं आहेत.

पाछा यांचे वडीलही पोलिसात जनरल या पदावर कार्यरत होते. जेंव्हा पाछा शहीद झाल्याचे त्याच्या वडीलांना कळवण्यात आले त्यावेळी त्यांना भरून आले.

ते म्हणाले की “माझा मुलगा देशासाठी शहीद झाला, ही बाब जरी अभिमनाची असली तरी मी मुलगा गमावला आहे. मला या घटनेचे दुःख आहे. आमच्या घरात आम्ही दोघेजण पोलिसात नोकरी करणारे होतो”. असं सांगत त्यांच्या भावना अनावर झाल्याने त्यांनी अधिक बोलण्यास नकार देत दिलगिरी व्यक्त केली.

पाछा यांनी पोलिटीकल सायन्स आणि पोलीस अकादमीमधून प्रशिशण अशा दोन डिग्र्या मिळवल्या होत्या. ते अविवाहीत होता. तसंच वेट लिफ्टिंग हा त्यांचा आवडता खेळ होता.

पाशा यांनी दाखवलेल्या धैर्यामुळे अनेक लोकांचे जीव वाचले. तो आत्मघातकी दहशतवादी जर त्या सभागृहात गेला असता तर काय झालं असतं त्याची कल्पनाही न केलेली बरी !

 

Suicide Bomber InMarathi 3
Reuters

 

“पाछा यांनी दाखवलेल्या शौर्याचा आणि त्यांनी केलेल्या त्यागाचा आम्हाला अभिमान आहे. ते आमच्या आठवणींमध्ये कायम असतील. तसंच अशा घटना अफगाणीस्तानच्या पोलिसांनी रोज समोरे जावे लागते. असं पोलीस प्रवक्ते मुजाहेद यांनी सांगितले. यापुर्वी झालेल्या हल्ल्यात आम्ही पाच पोलीस अधिकारी गमावलेत. ते सातही जण आपले कर्तव्य बजावताना शहीद झाले पण पाशा आमचा हिरो आहे”.  असंही मुजाहेद यांनी सांगितले.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?