' प्राध्यापक असूनही ट्रेनमध्ये भीक मागितली, स्वतःसाठी नव्हे, तर...

प्राध्यापक असूनही ट्रेनमध्ये भीक मागितली, स्वतःसाठी नव्हे, तर…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

आजकाल माणसातली माणुसकी राहिलेली नाही असंच चित्र सगळीकडे बघायला मिळतं. पण आजही या जगात अशी काही माणसं आहेत जी माणुसकी जपतात. यापैकीच एक म्हणजे संदीप देसाई…

 

sandeep desai InMarathi

 

ज्यांनी आपल्यातली माणुसकी जपत ट्रेनमध्ये वर्तमानपत्रे विकली, एवढंच नाही तर त्यांनी भीक देखील मागितली… चला जाणून घेऊ कोण आहेत संदीप देसाई आणि त्यांना असं का करावं लागलं.

 

sandeep desai 1 InMarathi

 

NDTV च्या एका रिपोर्टनुसार संदीप देसाई हे २०१२ साली मुंबईच्या लोकल ट्रेन्समधील एक सर्वपरिचित चेहरा होते. महाराष्ट्र आणि राजस्थान येथील गरीब मुलांना इंग्रजी माध्यमातून शिक्षा प्राप्त करता यावी याकरिता ते लोकल ट्रेनमधील प्रवाश्यांकडे भिक मागून पैसे गोळा करायचे. यासाठी एकदा त्यांना पकडण्यात देखील आले आहे.

 

sandeep desai 2 InMarathi

 

म्हणतात ना, प्रयत्न करणारा कधी हरत नसतो, तसंच झालं; अखेर संदीप देसाई हे त्यांच्या ध्येयात यशस्वी झाले आणि त्यांनी २०१० ते १०१२ दरम्यान त्या लहानग्यांसाठी ५० लाखांहून अधिक निधी गोळा केला.

यासंबंधी NDTV सोबत बोलताना एका प्रवाश्याने सांगितले होते, की तो दोन वर्षांपासून एकाच गाडीने प्रवास करत असे आणि त्याने देसाई यांना रोज बघितले होते. जर त्यांचे बोलणे खरे नसते, तर ते रोज तिथे आलेच नसते.

 

sandeep desai 3 InMarathi

===

===

भारतात अशी मुलं खूप आहेत, जी केवळ पैशाअभावी शिक्षण घेण्यात असमर्थ ठरत आहेत. जर अशा लोकांच्या छोट्याश्या योगदानाने त्यांना शिकायला मिळत असेल, तर याहून चांगलं अधिक काय असू शकतं!

संदीप देसाई हे मुंबई येथील राहणारे आहेत. आधी ते मरीन इंजिनिअर होते त्यांनतर त्यांनी मॅनेजमेंट कॉलेजमध्ये शिकविण्यास सुरवात केली.

सर्वात आधी त्यांनी त्यांची ही कल्पना त्यांचे मित्र नुरुल इस्लाम यांना सांगितली होती, ज्यानंतर नुरुल यांनी देखील त्यांची या कामात मदत केली.

 

sandeep desai 5 InMarathi

 

सहा वर्षानंतर अखेर संदीप यांनी त्याचं ध्येय गाठलं. २०१६ साली संदीप यांची महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त यवतमाळ जिल्ह्यात आणि उदयपूरमधील सिपकोड, सादकडी आणि नवीनजार गावात एक-एक शाळा होती.

यवतमाळ येथील शाळेत दुसऱ्या वर्गापर्यंत १८० विद्यार्थी आणि ५ शिक्षक आहेत. तर उदयपूर येथील तीन शाळांत ३१० विद्यार्थी असून ७ शिक्षक आहेत. त्यांची यवतमाळ आणि उदयपूर येथील एका शाळेला शासन मान्यता देखील प्राप्त आहे.

 

sandeep desai 4 InMarathi

 

असे हे संदीप देसाई ज्यांनी गरीब मुलांना शिकवण्यासाठी एक प्राध्यापक असून देखील भीक मागितली. जेणेकरून या देशाचं भविष्य सुधारावं. निश्चितच त्यांचा हा प्रवास काही सोपा नसणार, तरीही त्यांनी ही कामगिरी करून माणुसकीची एक वेगळीच परिभाषा मांडली आहे…

===

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?