' जगातील सर्वात सुंदर १४ ग्रंथालयं : बघूनचं प्रेमात पडाल

जगातील सर्वात सुंदर १४ ग्रंथालयं : बघूनचं प्रेमात पडाल

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

ज्यांच्यासाठी पुस्तके म्हणजे श्वास आहेत त्यांना ग्रंथालयाची दारं सताड उघडी मिळाली, की स्वर्गाचे दार उघडल्याची अनुभूती मिळते.

ग्रंथालयात शांतपणे बसून पुस्तक वाचण्याचा अनुभव काही औरच!

घरी बसून पुस्तक वाचण्याचा कितीही आनंद असला तरी लायब्ररीमध्ये पुस्तकं वाचण्यात जी मजा आहे ती इतर कोणत्याही गोष्टीत नाही.

 

libraries-marathipizza01

स्त्रोत

 

वेळेचा सदुपयोग करण्याची सर्वोत्तम जागा म्हणून पूर्वी ग्रंथालयांकडे पाहिले जायचं.

शाळा, कॉलेज यांना तर स्वतंत्र लायब्ररी असायची, त्यासाठी विद्यार्थ्यांना वेगळा वेळ राखून दिला जायचा.

पण आता मात्र शाळांमध्ये लायब्ररी असली तरीही विद्यार्थ्यांना पुस्तकं वाचण्यात फारसा वेळचं नसतो.

ई-बुक्स आणि ई-ऑडीयोच्या जमान्यात ग्रंथालयांना उतरती कळा लागली आहे.

आपल्या गाव-शहरांमधील ग्रंथालयांची उतरती कळा बघून वाचन प्रेमींच्या काळजाला चटका लागल्याशिवाय रहात नाही.

परंतु काही देशांत ग्रंथालयांचा हा वारसा टिकून आहे. त्यांचे बाह्य आणि अंतरंगातील सौंदय तितकेच जपून ठेवले जात आहे.

त्यामुळे एखाद्या वाचनप्रिय माणसाला ही ग्रंथालये पाहण्याचा अनुभव हा कायमच सुखावह ठरणारा आहे.

चला तर मग जाणून घेऊया – जगातील सर्वात सुंदर ग्रंथालयांबद्दल!

१)  नॅशनल लायब्ररी ऑफ प्राग, झेक रिपब्लिक

 

libraries-marathipizza02स्त्रोत

तुम्हाला हा एखादा राजवाडा वाटत असेल, पण प्रत्यक्षात ही लायब्ररी आहे. 

झालात ना चकित?

अत्यंत वैभवशाली परंपरा असलेल्या या लायब्ररीत प्रचंड पुस्तकांचा खजिना सापडतो.

इंग्रजी, फ्रेन्च, जर्मन या भाषांमधील पुस्तकांचं प्रमाण इथे जास्त आहे, विशेषतः लायब्ररीची काळजी घेण्यासाठी अनेक कर्मचारी मेहनत घेत असतात.

 

२)  ट्रिनीटी कॉलेज लायब्ररी, डब्लिन, आयर्लंड

ट्रिनीटी कॉलेज लायब्ररी ही डब्लिनमधील सर्वाधिक प्रसिद्ध लायब्ररी मानली जाते.

या लायब्ररीचं सर्वाधिक वैशिष्ठ्य म्हणजे इथे केवळ वाचकचं नव्हे तर पुस्तकांच्या लेखकांचीही ये-जा असते.

 

libraries-marathipizza03

स्त्रोत

आयर्लंडमध्ये प्रकाशित होणा-या प्रत्येक पुस्तकाची पहिली कॉपी या लायब्ररीत नोंदविण्याचा नियम आहे, अर्थात ही कॉपी लायब्ररीत विनामुल्य ठेवली जात असल्याने लेखक, प्रकाशन यांनाही त्याचा फायदा होतो. आणि वाचकांनाही नवी पुस्तके ताबडतोप वाचता येतात.

३)  बिब्लीओटेका रियल गॅबीनेट पोर्तुगीज डी लेयूटीरा, रियो डी जेनेरो, ब्राझील

 

libraries-marathipizza04

स्त्रोत

४)  द अॅडमॉन्ट लायब्ररी, अॅडमॉन्ट, ऑस्ट्रिया

 

libraries-marathipizza05

स्त्रोत

 

या लायब्ररीमध्ये सुमारे बारा लाखांपेक्षांही अधिक पुस्तकांचा समावेश आहे.

विशेषतः याची रचना आणि सैौदर्य पाहण्यासाठी आजही पर्यटक आवर्जुन येतात.

५) जॉर्ज पीबॉडी लायब्ररी, बॅल्टीमोर, मेरीलॅंड, अमेरिका

 

libraries-marathipizza06

स्त्रोत

स्थापत्य शास्त्राचा उत्तम नमुना म्हणून या लायब्ररीकडे पाहिलं जातं.

पहिल्याच नजरेत हे एखादं हॉटेल असावं असा कुणाचाही समज होणं स्वाभाविक आहे. मात्र त्यातले पुस्तकांची दालनं पाहिली की लायब्ररी असल्याचा विश्वास बसतो.

त्यातील दिव्यांची सजावट, विविध शोपीस आणि वाचकांना दिलेल्या सुविधा पाहिल्यानंतर पुस्तकप्रेमी आपला जास्तीत जास्त वेळ इथेच घालवतील याबाबत शंकाच वाटत नाही.

६) सेंट फ्लोरियन मॉनेस्ट्री, ऑस्ट्रिया

 

libraries-marathipizza07स्त्रोत

७) बिब्लीओथीक नॅशनले डी फ्रान्स, पॅरीस, फ्रान्स

मुळातचं पॅरिसचं सौंदर्य पाहणं म्हणजे स्वर्गसुख.

पॅरिसमध्ये गेलेल्या पर्यटकांना पाहण्यासारखी अनेक ठिकाणं उपलब्ध असली तरीही, बिब्लिओथीक नॅशनले या लायब्ररीकडे पुस्तकप्रेमींची पावलं हमखास वळतात.

१३६५ साली ही लायब्ररी उभारण्यात आली, तेंव्हापासून आजतागायत लाखो वाचक याच्याशी जोडले गेले आहेत.

साहित्याचे वेगवेगळे प्रकार या लायब्ररीत उपलब्ध आहेतच, मात्र त्याचं सौंदर्यसृष्टिचा अफलातून प्रकार असलेल्या या वास्तुत काही क्षण घालविण्यासाठीच अनेकजण या लायब्ररीला भेट देतात.

 

Stitched Panorama

स्त्रोत

८) वॉकर लायब्ररी, मेन्नीएपॉलीस, मेन्नीसोटा, अमेरिका

या लायब्ररीची रचना आकर्षक आहे.

मुळातच अमेरिकेत लायब्ररींची संख्या प्रचंड मोठी असली तरी, या लायब्ररीत येणा-यांची संख्या देखील मोठी आहे.

 

libraries-marathipizza09

 

स्त्रोत

यामध्ये स्वतंत्रपणे वाचन करण्याचीही सोय असल्याने अनेक पुस्तकप्रेमी दिवसभर येथे अभ्यास करताना दिसतात.

साहित्याचे वाचन, अभ्यास, चर्चा या प्रत्येकासाठी येथे स्वतंत्र विभाग आढळतो.

 

९)  द लायब्ररी ऑफ कॉंग्रेस, वॉशिंग्टन डी.सी. अमेरिका

 

libraries-marathipizza10स्त्रोत

 

पार्लमेंटसारखा आकार असलेली ही लायब्ररी सर्वाधिक जुनं वाचनालय म्हणून ओळखली जाते.

केवळ याची रचना पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करतात.

१०)  द नॅशनल लायब्ररी ऑफ चायना, बीजिंग, चायना

आशिया खंडातील सर्वात मोठी लायब्ररी म्हणून हे वाचनालय ओळखलं जातं.

३७ कोटी पुस्तकांचा खजिना असलेल्या या लायब्ररीत एकावेळी हजारो वाचकांना बसण्याची सोय आहे.

 

libraries-marathipizza11

स्त्रोत

११)  अॅब्बेय लायब्ररी ऑफ सेंट गॅलेन, स्वित्झर्लंड

 

libraries-marathipizza12स्त्रोत

बर्फाळ स्वित्झर्लंडची ओळख ही सुंदर निसर्ग ही असली, तरी ही लायब्ररी हे देखिल महत्वाचं वैशिष्ठ्य आहे.

युरोपातील बहुतांश घरं, हॉटेल्स ही वुडन अर्थात लाकडी प्रकारात तयार केली जातात, इथे बर्फाचं प्रमाण अधिक असल्याने लाकडी फर्निचर तयार करण्यावर भर दिला जातो.

१२) बुक माउंटेन, स्पीजकेनीस्स्झ, नेदरलँड्स

 

libraries-marathipizza13स्त्रोत

 

पुस्तकांचं भव्यदिव्य दुकान वाटावं अशी या लायब्ररीची रचना आहे.

विशेष म्हणजे लायब्ररीच उभं राहिलं की चारही बाजुंनी पुस्तक दिसणं आणि कोणतंही पुस्तक शोधण्यासाठी फारसे कष्ट न घेता ते पु्तक हाती मिळणं ही सुविधा या लायब्ररीत उपलब्ध करून देण्यात आहेत.

 

१३) गिरोलामीनीज लायब्ररी, नॅपल्स, इटली

इटलीतील एखादं चर्च असावं अशी या लायब्ररीची रचना आहे.

त्यामुळे या सुंदर इमारतीत पुस्तक वाचण्याची मजा काही औरचं.

 

libraries-marathipizza14

स्त्रोत

१४)  एल अॅटेनीओ, ब्युनोस एरिस, अर्जेंटिना

 

libraries-marathipizza15

स्त्रोत

प्रचंड झगमगाट असलेली ही इमारत कोणताही मॉल नाही, तर चक्क लायब्ररी आहे.

इथे कोणत्याही वेळी जाऊन आपलं आवडतं पुस्तक वाचता येतं,

ही लायब्ररी इतकी मोठी आहे, की अंतर्गत फिरण्यासाठी लिफ्टची सोय आहे.

  तुम्हीही अशा कोणत्या वेगळ्या ठिकाणाला भेट दिली असेल तर कमेंटमध्ये त्याठिकाणाबाबत जरुर लिहा, शिवाय तुम्हाला ही माहिती आव़डली असेल तर नक्की शेअर करा.

====

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?