' दार उघड बये दार उघड – Courier घेऊन Robot आलाय! – InMarathi

दार उघड बये दार उघड – Courier घेऊन Robot आलाय!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

साधारण दहा-पंधरा वर्षांपूर्वी खाजगी कुरिअर सर्विसेसचं प्रस्थ मूळ धरतं झालं. तेव्हापासून भारतीय logistics क्षेत्रात मोठे बदल घडायला सुरूवात झाली. नोकऱ्या निर्माण झाल्या, सामानाची ने-आण अधिक सोपी व सुटसुटीत करण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञान निर्माण केलं जाऊ लागलं.

गेल्या सात आठ वर्षात भारतीय e-commerce मधे झपाट्याने झालेली वाढ, logistics क्षेत्राला परत एकदा boost देऊन गेली. कधी नव्हे तेवढे तरुण रस्त्यावर उतरले – माल त्वरित जागेवर पोहोचवायला! ह्या तरुणांसोबत आता tabs आणि इलेक्ट्रॉनिक मशीन्स असतात. हे क्षेत्र, आता आणखी एक पाऊल पुढे जाणार आहे.

लवकरच तुम्ही ऑनलाईन ऑर्डर केलेल्या वस्तू हवेत उडणारे रोबोट्स तुम्हाला घरी आणून देतील…!

Thanks to Amazon…!

amazon prime air
Amazon कंपनी Courier industry मध्ये एक नवीन पायंडा पाडू पाहत आहे. तुम्ही त्यांच्या वेबसाईटवर दिलेल्या ऑर्डर deliver करण्यासाठी amazon हवेत उडणारे रोबोट्स म्हणजेच drones वापरण्याचा विचार करत आहेत.

एवढंच नाही, amazon ने नुकताच Drone delivery via courier चा यशस्वी प्रयोगसुद्धा केलाय.

amazone-prime-marathipizza-00

 

विचार करा – तुम्ही एक छोटीशी वस्तू online order केली आणि १५-२० मिनीटातच तुमच्या दाराशी drone ने ती वस्तू आणून दिली!

 

amazone-prime-marathipizza

 

Amazon ने ३० नोव्हेंबरला ह्याची announcement केलीये. हे अजून एका prototype format मध्ये जरी असलं तरी लवकरंच हे प्रताक्षात येईल.

२०१३ मध्ये Amazon ने Prime Air नावाची same day delivery सेवा सुरु करणार असल्याची announcement केली होती आणि हे drone त्याच initiative चा भाग आहेत.

amazone-prime-marathipizza-01

 

सध्या हे Drone जवळपास २.३ kg parcel deliver करू शकतात आणि ह्याचं स्वतःचं वजन जवळपास २५ kg आहे. हे Drone ३० minutes मध्ये १० मैलांच्या अंतरावर package पोहोचवू शकतं.

ह्यामध्ये “sense-and-avoid” technology चा वापर केलेला असून त्यामुळे कोणताही अडथळा आला तरी हे तो लगेच sense करून directions adjust करू शकतं.

शिवाय हे operator च्या line of sight च्या बाहेर जाऊन सुद्धा कंट्रोल करता येतं.

Courier industry आणि online shopping चा चेहरामोहरा पूर्णपणे बदलणारं innovation आहे हे!

Demo चा हा video बघायला विसरू नका !

 

 

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

Abhijeet Panse

Author @ मराठी pizza

abhijit has 24 posts and counting.See all posts by abhijit

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?