'तुम्हाला अनावश्यक वाटणाऱ्या ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत!

तुम्हाला अनावश्यक वाटणाऱ्या ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

आपण छोटे असताना प्रत्येक लहान-सहान गोष्टींबद्दल आपल्यला कुतूहल असायचे. प्रत्येक गोष्ट आपण बारकाईने पाहत असायचो आणि याचा वापर नक्की कशासाठी केला जातो, हे सारखे आपल्या पालकांना विचारात असायचो. पण मनातील शंका कधीही दूर व्हायच्या नाहीत. पण हळूहळू मोठे होत असताना आपल्यातील ते कुतूहल नष्ट होत जाते आणि आपण कोणत्याही गोष्टीचा बारकाईने विचार करत नाही. त्यामुळे आपल्या मनामध्ये तयार होणारे हे प्रश्न संपुष्टात आले आहेत. आज आपल्याला आपल्या कामामधून यावर विचार करण्यासाठी वेळ भेटत नाही. मोबाईलवरच आपला दिवस सुरु होतो आणि मोबाईलवरच संपतो. काही करायचे असल्यास आपण त्यावरच करतो.

आपल्या आजूबाजूला कितीतरी अशा गोष्टी असतात, ज्या कामाच्या असतात, पण आपण त्यांना अनावश्यक समजतो. आपल्या डोळ्यासमोर असूनदेखील त्या आपल्या नजरेतून सुटतात. आज आम्ही तुम्हाला अशाच काही गोष्टींबद्दल सांगणार आहोत, ज्यांचा खरा वापर असा होत असेल, असा आपण विचार देखील केला नसेल. चला तर मग जाणून घेऊया, या वेगळ्या गोष्टींबद्दल ज्या कधीही आपल्या लक्षात येत नाहीत..

१. हेडफोन जॅकवरील  रिंग्स

 

Useful Things.Inmarathi
staticflickr.com

हेडफोन जॅकमध्ये दिसण्यात येणाऱ्या या तीन रिंग्समधील सर्वात खाली असलेली रिंग डावीकडील ऑडीओसाठी, मधली रिंग उजवीकडील ऑडीओसाठी आणि सर्वात वरची रिंग ही माईक किंवा ग्राउंड ऑडीओसाठी असते.

२. बूटांना असलेले छिद्र

 

Useful Things.Inmarathi2
wimp.com

काही बूटांच्या बाजूच्या भागामध्ये २ छिद्रे देण्यात आलेली असतात. काही लोकांना ते स्टाइल म्हणून दिलेली असतात, असे वाटते. पण ही छिद्रे देण्याचे मुख्य कारण काही वेगळेच आहे. ही बूटांमधील छिद्रे खास वेन्टीलेशन होण्यासाठी दिलेली असतात.

३. मेजर टेपवर असलेले छिद्र

 

Useful Things.Inmarathi1
wp.com

योग्य मोजमाप करताना मेजर टेप हळू नये किंवा घसरू नये, यासाठी नख किंवा स्क्रूमध्ये टेप अडकवण्यासाठी या छिद्राचा आधार घेतला जातो.

४. मेजर टेपवरील टोकदार दात

 

Useful Things.Inmarathi3
Youtube.com

मेजर टेपवरील टोकदार दात हे तुम्ही मोजमाप घेताना कुठपासून मोजमाप घेतले आहे. हे दाखवण्यासाठी याचा वापर केला जातो. याच्या मदतीने तुम्ही कधीही मोजमाप कुठपर्यंत घेतले आहे, हे विसरणार नाही.

५. कारच्या छतावरील फिन

 

Useful Things.Inmarathi4
alicdn.com

कारच्या छतावरील फिन हे एकप्रकारचे झाकण आहे, जे जीपीएस झाकण्यासाठी लावण्यात येते.

६. लॅपटॉप चार्जरमधील छोटासा सिलेंडर

 

Useful Things.Inmarathi5
dainikbhaskar.com

लॅपटॉप चार्जरमधील हा छोटासा सिलेंडर फेराइट बीड, फेराइट चॉक आणि फेराइट सिलेंडर नावाने ओळखली जाते. फेराइट सिलेंडर आपल्या लॅपटॉपला इलेक्ट्रोमॅग्नेटिक नॉइजपासून वाचवतो,

७. बॉबी पिनची एक बाजू झिग-झॅग असणे

 

Useful Things.Inmarathi6
womenshealthmag.com

बॉबी पिनची एक बाजू झिग – झॅग असते, कारण त्यामुळे ती केसांमध्ये चांगल्याप्रकारे फिट बसते.

८. गॅस मीटरवरील अॅरो

 

Useful Things.Inmarathi7
greenbiz.com

कदाचित तुम्ही गॅस मीटरवरील इंडिकेटरच्या बाजूला असलेल्या बाणाकडे कधी लक्ष दिले नसेल. ओपन हा बाण सर्वात महत्त्वाचा भाग आहे. ही गोष्ट दर्शवते की कारच्या कोणत्या बाजूची गॅस कॅप चालू आहे. भाडेतत्त्वावर गाडी चालवणाऱ्या लोकांसाठी हे खूप मदतीचे आहे.

९. भांड्याच्या हँडलवरील होल

 

Useful Things.Inmarathi8
toopanda.com

भांड्याच्या हँडलवर असलेले होल यासाठी असते, जेणेकरून तुम्ही त्यामध्ये चमचा फसवून ठेवू शकता.

१०. कुलुपाच्या खाली असलेले छिद्र

 

Useful Things.Inmarathi9
ytimg.com

कुलुपाच्या खाली छिद्र यासाठी दिलेले असते, जेणेकरून पावसाच्या वेळी कुलुपामध्ये पाणी गेल्यास ते बाहेर निघू शकेल आणि या छिद्राचा वापर करून तुम्ही कुलुपामध्ये तेल देखील टाकू शकता.

११. आयफोनच्या कॅमेऱ्यामागे देण्यात येणारे छिद्र

 

Useful Things.Inmarathi10
deadbees.net

आयफोनच्या मागे असलेले छिद्र, हा एक मायक्रोफोन असतो.

१२. दारूच्या बाटल्यांचा तपकिरी रंग

 

Useful Things.Inmarathi11
cdn.co

दारूच्या बहुतेक बाटल्या ह्या तपकिरी रंगाच्या असतात, कारण हा रंग सूर्याकडून येणाऱ्या अल्ट्रावायलेट किरीणांना थांबवतो. ही किरणे दारूला खराब करून दारूची चव बिघडवतात.

१३. दोन फ्लॅश बटन

 

Useful Things.Inmarathi12
infobuild.it

टॉयलेटच्या फ्लॅशमध्ये दोन बटनांचा वापर केला जातो. यामधील लहान बटन हाफ फ्लॅशसाठी, तर मोठे बटन फुल फ्लॅशसाठी असतो.

१४. गोल्फच्या बॉलवरील खड्डे

 

Useful Things.Inmarathi13
ebayimg.com

गोल्फच्या बॉलवर असलेले खड्डे ‘turbulators’ सारखे काम करतात. यामुळे बॉल हवेमध्ये चांगल्याप्रकारे फ्लो करतो.

असे ह्या आणि यांच्यासारख्या इतरही काही गोष्टी, ज्यांच्याकडे आपण लक्ष देत नाही. पण त्या खूप उपयोगी असतात.

स्त्रोत :  , 

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?