'मुलींचं मन जिंकण्यात हमखास यशस्वी ठरणाऱ्या १५ टिप्स

मुलींचं मन जिंकण्यात हमखास यशस्वी ठरणाऱ्या १५ टिप्स

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

तुमचं तुमच्या बायको किंवा प्रेयसीवर खूप प्रेम आहे. पण ते व्यक्त करण्यासाठी दरवेळी महागडे गिफ्ट घेऊन देणे, फिरायला जाणे, सिनेमाला जाणे हे रोज परवडणारे नसते. बरं हे तर तुम्ही अनेक वर्षं केलं असेलच.

मग असं काय करावं की रिलेशनशिप, प्रेम किंवा लग्न जुनं झाल्यावरही ते अद्याप ताजं वाटेल?

खालील गोष्टी वाचा आणि प्रत्यक्ष अनुभव घ्या. ह्या गोष्टी पाळाल तर मुलींचं मन जिंकल्याशिवाय रहाणार नाही!

१. कपड्यांबाबत शेरेबाजी अज्जीबात नको !

 

How to Impress Woman InMarathi
hindustantimes.com

ज्याप्रमाणे तुम्हाला कपडे घालण्याचं स्वातंत्र्य आहे. त्याचप्रमाणे महिलांनाही जे आवडेल ते कपडे घालायचं स्वातंत्र्य आहे. त्यांच्या कपड्यांवरून कधीच त्यांना बोलू नका. एखादा ड्रेस आवडल्यास त्याची स्तुती मात्र नक्की करा.

 

२. तिच्या करिअरचा आदर करा

 

How to Impress Woman InMarathi 3
Indianexpress.com

ज्याप्रमाणे तुम्हाला तुमचे करिअर आवडते. त्याचप्रमाणे महिलांनीही त्यांचे आवडते क्षेत्र निवडलेले असू शकते. तिच्या संमतीशिवाय तिच्या करिअरविषयीक किंवा कामाविषयीच्या गोष्टींत ढवळाढवळ करू नका.

असं केलेलं पुरुष असो किंवा स्त्री कोणालाच आवडणार नाही.

३. भावना व्यक्त करा

 

How to Impress Woman InMarathi 4
youtube

तुमच्या भावना व्यक्त करायला अजिबात घाबरू नका. पुरूष कधी भाऊक होत नाहीत वगैरे अशा भाकड गोष्टींवर विश्वास ठेवू नका. तुमच्याभावना खुलेपणाने व्यक्त केल्यास तुम्ही त्यांना किती जवळचे समजता ते तुमच्या प्रेयसी किंवा पत्नीच्या लक्षात येईल.

ज्याप्रमाणे तुम्ही त्यांच्या भावना समजता त्याचप्रमाणे त्याही तुमच्या भावनांचा आदर करतील.

४. घर कामात मदत करा…फार महत्वाचं आहे हे!

 

How to Impress Woman InMarathi 5
Rediffmail.com

महिलांना घरकामात मदत करण्यात काहीच चुक नाही. ते दिवस गेले ज्यावेळी फक्त महिला घरकाम करायच्या आणि पुरूष बसून असायचे. सध्या महिला व पुरूष दोन्ही नोकरी करतात.

तेव्हा तुम्ही जर घरकामात मदत केलीत तर तुमच्याबद्दलचा आदर निश्चितच दुणणावेल.

५, भुतकाळात जाऊ नका

 

How to Impress Woman InMarathi 6
insiderindian.com

त्यांच्या भुतकाळावरून त्यांचे चारीत्र्य ठरवू नका. आपल्या प्रत्येकाच्या मनात एक दुखरा कोपरा असतो. सर्वांचाच कधीना कधी ब्रेकअप झालेला असतो. तसंच आपण कुणालातरी डेटवर नेलेलं असतं.

सर्वांच्याच मनोकामना पूर्ण होत नाहीत. तेव्हा फार भुतकाळात गेलात तर हाती निराशाच लागेल.

६. लहानसहान गोष्टींवरून रागावू नका 

 

How to Impress Woman InMarathi 7
Midday.com

लहान सहान गोष्टींवरून रागावणे हे कोणत्याही नात्याला हानीकारक असतं. तुमच्या रोमॅंटीक जिवनालातर नक्कीच. विशेषतः सर्वांसमोर रागावणं हे खूप अपमानास्पदच असतं.

तेव्हा जे मुद्दे स्पष्ट करायचे आहेत ते खाजगीतच आणि हळुवारपणे करा.

७. मत विचारा

 

How to Impress Woman InMarathi 8
Bollypics.com

“तुला काय वाटतं ह्याबद्दल?” ह्या एका प्रश्नात खूप मोठी जादू आहे.

त्यातून तुम्हाला तिचं मत, तिचे विचार महत्वाचे वाटतात हे दिसतं. त्यातून तिची तुमच्या जीवनातील व्हॅल्यू स्पष्ट होते. फक्त महत्वाच्याच नाही तर लहानमोठ्या निर्णयांमध्ये तिचे मत विचारा. त्याने तुमच्यातील संबंध अधिकदृढ होतील.

८. संशय कल्लोळ…

 

How to Impress Woman InMarathi 9
tinybuddha.com

तिचे जर काही पुरूष मित्र असतील तर उगाच तिच्यावर संशय घेऊ नका. तुमच्या संशय घेण्याने तुमच्या नात्यात कडवटपणा येईल. निखळ मैत्री असते. तेव्हा संशयासाठी मनात जागा ठेवू नका. आणि हे केवळ मित्राबद्दलच नाही.

प्रत्येक बाबतीत तिला हवा असलेला वैयक्तिक स्पेस तिला आवर्जून द्या.

९. सर्वांसमोर मस्करी करू नका…

 

How to Impress Woman InMarathi 10
youtube.com

सर्वांसमोर मुलींची मस्करी केल्याने त्यांना अपमानास्पद वाटणं स्वाभाविक आहे. त्यामुळे तुम्ही दोघांतल्या गोष्टी मित्रांना सांगता असा तिचा समज होऊ शकतो.

तसंच त्यामुळे तुम्ही फार गंभीरपणे घेत नाहीत हे तुमच्या वागण्यातून दिसून येते.

१०. तिचं म्हणणं ऐकून घ्या… 

 

How to Impress Woman InMarathi11
Scoopwhoop.com

पुरुषांसाठी ही सर्वात अवघड गोष्ट असावी. (स्वयंपाकापेक्षाही!) अनेक एक्स्पर्ट्सच्या मते पुरुष नेहेमी “तर काय?”, “मी काय मदत करू?” अश्याप्रकारे विचार करतात. पण बहुतेकवेळा स्त्रियांना तुमच्याकडून काहीही नको असतं…तुम्ही फक्त ऐकून घ्यावं, त्यांचं दुःख समजून घ्यावं इतकीच त्यांची अपेक्षा असते.

पण पुरुष, नकळत त्यांचं म्हणणं मध्येच तोडून सोल्युशन सांगू पहातात किंवा आपले विचार मांडतात. अर्थात,ते ही चूक नाही – पण पूर्ण म्हणणं ऐकून झाल्यावर…! 😀

११. तिला तिची स्पेस द्या…

 

cocktail-inmarathi
filmibeat.com

कुठलही नातं टिकण्यासाठी दोघांत अंडरस्टँडिंग असणे खूप आवश्यक आहे, जर तुम्ही तुमचा पुरुषी इगो नात्याच्या मध्ये न आणता तिला समजून घेतले, तिला तिच्या पद्धतीने जीवन जगण्याची मुभा दिलीत जी तुम्हालाही हवी असते तर तुमच नातं हे अधिक मजबूत होईल.

१२. ती “खास” आहे हे तिला कळू द्या…

 

Imran-Khan-inmarathi
highwallpaper.com

कुठल्याही मुलीला जर कोणी स्पेशल ट्रीटमेंट दिली तर सहाजिकच ते तिला आवडेल. तुमची प्रेयसी तुमच्यासाठी किती खास आहे हे तिला कळू द्या. त्यासाठी कधी तिला डिनर डेटला घेऊन जा, तिला लहान लहान सरप्राईज द्या.

जगात कितीही सुंदर मुली असल्या तरी तुमच्यासाठी तीच सर्वात सुंदर असल्याचं तिला जाणवू द्या.

१३. तिची बाजू सांभाळा…

 

movie-inmarathi03
youtube.com

प्रेम म्हणजे प्रत्येक परिस्थितीत एकमेकांना सांभाळून घेणे, समजून घेणे. जर तुम्हाला कोणी तिच्याबद्दल काही वाईट अथवा तिचे दुर्गुण सांगत असेल तर तुम्ही त्यांना तिचे चांगले गुण सांगा. इतरांसमोर तिचा कधीही अपमान होऊ देऊ नका.

तिला हे दिसू द्या की, ती एकटी नाही. तुम्ही आहात तिच्यासोबत – तिच्या बाजूने…!

१४. तिचा आत्मविश्वास वाढवा… 

 

Aashiqui-2-inmarathi
ebuzztoday.com

असं अनेक वेळा होत जेव्हा एखादी महिला काही कारणांमुळे हताश होऊन जाते, तिचा आत्मविश्वास ढासळतो. अश्या वेळी तिला सर्वात जास्त कोणाची गरज असते तर ती तुमची.

तिच्या वाईट काळात तिच्या सोबत राहा, तिचा आत्मविश्वास वाढविण्याचा प्रयत्न करा.

१५.  तिचे ‘Partner In Crime’ व्हा…

 

ok-jaanu-collage-inmarathi
dnaindia.com

काही मुली खूप खोडकर स्वभावाच्या असतात, त्यांना मज्जा करायला फार आवडते. ज्या गोष्टी इतरांना बालिश वाटतील त्या त्यांना मजेशीर वाटतात. काही त्यांच्या या बालिशपणावर रागावतात, त्यांनी तसं करू नये अशी ताकीद देतात आणि मग हळू हळू ते नातं तुटत जातं. तिच्यावर बंधन न लावता तुम्हीही तिच्या बालीशपणात सामील व्हा. यामुळे तुमचे जीवन जरा इंटरेस्टिंग आणि सोपे होऊन जाईल तसेच तुमचं नातही नेहमी रिफ्रेश होतं राहील.

तर – या आहेत काही खास ट्रिक्स तुमचं नातं अधिक घनिष्ठ करण्यासाठी. जरा कठीण वाटतील खऱ्या – पण मग – आपल्या आवडत्या लेडी लव्ह चं मन जिंकणं इतकं सोपं असतं तर त्यात मजा काय? 🙂

गुड लक! 😉

====

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?