' सुनील दत्तचा आवडता ‘हॉकी प्लेयर’ आज जगतोय हलाखीचं जीवन – InMarathi

सुनील दत्तचा आवडता ‘हॉकी प्लेयर’ आज जगतोय हलाखीचं जीवन

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

पूर्वी त्यांना लोक “सर्वोत्तम हॉकी प्लेयर” म्हणून ओळखायचे. पण आज एक गरीब, हताश शेतकरी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाते.

१९७८ मध्ये झालेल्या हॉकी वर्ल्डकप वेळी भारतीय चाहत्यांचे ते सर्वात आवडते खेळाडू होते. एक असा काळ होता जेव्हा सुप्रसिद्ध अभिनेते सुनील दत्त त्यांचे मोठे फॅन झाले होते.

त्यांचे नाव विन्सेंट लाकरा.

hocky-player-life-marathipizza01

स्रोत

सध्या विन्सेट छत्तीसगड राज्यातील एक आदिवासी पाड्यात आपल्या कुटुंबासोबत राहत आहेत.

स्वत:वर ओढवलेल्या या परिस्थितीवर बोलताना विन्सेंट लाकरा म्हणतात,

जेव्हा मी हॉकी संघात होतो तेव्हा सुनील दत्त माझे चाहते आणि चांगले मित्र देखील होते. एकदा त्यांनी मला मुंबईला शिफ्ट होण्यास सांगितले, पण मी माझ्या कुटुंबाला सोडू शकत नव्हतो. पूर्वी परिस्थिती चांगली होती, नंतर मात्र हॉकीची जादू ओसरली आणि मला नाईलाजाने शेती करावी लागली. माझ्याकडे एक पक्के घर देखील नाही. सरकारकडून महिन्याला ५ हजार रुपये मिळतात. परंतु त्यातही घरातील ११ जणांचे पोट भरणे अशक्य आहे. त्यामुळे या हलाखीच्या परिस्थितीला मला तोंड द्यावे लागत आहे.

 

hocky-player-life-marathipizza02

स्रोत

विन्सेंट लाकरा हा माणूस तसा लहान लहान गोष्टीत आनंद मानणारा! पूर्वीचे चांगले जीवन लयाला गेले असतानाही गरिबीमध्ये समाधान मानणारा!

फक्त त्यांच्या मनात एक खंत आहे – ती म्हणजे, भारतात हॉकीला नसलेलं प्रोत्साहन.

ते म्हणतात –

आपल्याच देशात राष्ट्रीय खेळांना प्रोत्साहन दिले जात नाही आणि हीच सर्वात दुर्दैवाची गोष्ट आहे.

पूर्वी ऐश्वर्य बघितलेले असताना आजचे वाईट दिवस “sportingly” जगणाऱ्या विन्सेंटचं आजही हॉकीवर किती प्रेम आहे हे ह्या काळजीतून दिसतं!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Vishal Dalvi

Anything, Everything, Whatever I like, I don't wait..I Just write......

vishal has 36 posts and counting.See all posts by vishal

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?