दक्षिण भारतातील ३ प्राचीन शिव मंदिरे एकाच रांगेत…हा चमत्कार म्हणावा का?
आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page
===
आपल्या भारतात कोठेही जा, तुम्हाला मंदिर दिसणार नाही असे होणार नाही. प्रत्येक ठिकाणी छोटे का होईना मंदिर आढळतेच! अशी ही मंदिरे काही आधुनिक आहेत तर काही अतिप्राचीन! इतकी प्राचीन की त्यांच्याशी संबंधित धागे आपल्याला थेट राजा-महाराजांच्या काळात घेऊन जातात. तसं तर आपल्याकडे सर्वच देवांची मंदिरे आढळतात, पण कधीतरी विचार करा मग तुमच्याही लक्षात येईल की भारतात भगवान शंकरांची मंदिरे जास्त प्रमाणात आढळतात. नेमकी किती आहेत वगैरे एवढ्या खोलात जाण्याची गरज नाही. पण वेगवेगळ्या नावाने का होईना शिवशंभोची मंदिरे जास्तीत जास्त पाहायला मिळतात.

हिंदू धर्मात भगवान शंकराचं स्थान अति उच्च आणि महत्त्वाचं आहे. विश्वाचा रचयिता ब्रह्मा, विश्वाचा रक्षणकर्ता विष्णू यांच्यानंतर पंचभूताधारी भगवान शंकर पूजनीय आहेत. पृथ्वी, पाणी, आग, हवा आणि आकाश या सृष्टीच्या पाच मुलभूत तत्वांना पंच महाभूते म्हणतात, त्यांचे नियंत्रण हे भगवान शंकरांकडे असते असे मानले जाते.
दक्षिण भारतात पाच मंदिरे आहेत ज्यांच्याकडे याच पंचमहाभूतांची प्रतीके म्हणून पहिले जाते. यांना पंचमहाभूत स्थळे या नावाने देखील ओळखले जाते. ही पाचही मंदिरे भगवान शंकरांना अर्पित आहेत म्हणजेच येथे भगवान शंकरांची पूजा केली जाते. या पाच मंदिरांपैकी चार मंदिरे तामिळनाडू राज्यामध्ये असून एक मंदिर हे आंध्र प्रदेशामध्ये आहे. दक्षिण भारतातील भाविकांमध्ये या पाच मंदिरांबद्दल पराकोटीची आस्था आहे.
थिरूवनाईकावल मंदिराच्या आतल्या गाभाऱ्यामध्ये पाणी पाझरते जे पाण्याचे अस्तित्व दर्शवते म्हणून हे मंदिर पाणी या तत्वाचे प्रतिक आहे.

थिरूवन्नामलाई मंदिरामध्ये दरवर्षी कार्तीकाई दिपम नावाचा सोहळा साजरा केला जातो. या सोहळ्यात अन्नामलाई पर्वताच्या माथ्यावर एक भलामोठा दीप प्रज्वलित केला जातो. हा दीप आगीचे अस्तित्व दर्शवतो म्हणून हे मंदिर आग या तत्वाचे प्रतिक आहे.

श्रीकालहस्ती मंदिरामध्ये ‘फडफडणारा दिवा’ आहे, जो हवेचे अस्तित्व दर्शवतो म्हणून हे मंदिर हवा या तत्वाचे प्रतिक आहे.

कांचीपुरम एकंबरेश्वर मंदिरामधील मातीचे स्वयंभू लिंग पृथ्वीशी साधार्म्य दर्शवते म्हणून हे मंदिर पृथ्वी या तत्वाचे प्रतिक आहे.

आणि चिदंबरम नटराजना मंदिरचे प्राचीन ग्रंथांमध्ये अनादी अनंत असे वर्णन केले आहे, हे वर्णन आकाशाचे अस्तित्व दर्शवते म्हणून हे मंदिर आकाश या तत्वाचे प्रतिक मानले जाते.

या पाच मंदिरांबद्दल विशेष गोष्ट म्हणजे या पाचही मंदिरांचे बांधकाम यौगिक विज्ञानानुसार करण्यात आले आहे. त्यामुळे या मंदिरांची भौगोलिक स्थिती पाहता ही मंदिरे एकमेकांशी भौगोलिकदृष्ट्या जोडलेली आढळून येतात.
पाच पैकी तीन मंदिरे अगदी बरोबर ७९ अंश ४१ मि पूर्व रेखांशावर एका रांगेत स्थित आहेत. चिदंबरम नटराजना मंदिर, कांचीपुरम एकंबरेश्वर मंदिर आणि श्रीकालहस्ती मंदिर ही तिन्ही मंदिरे बरोब्बर एकाच रांगेत आहेत.

थिरूवनाईकावल मंदिर आणि थिरूवन्नामलाई मंदिर ही उर्वरित दोन मंदिरे मात्र या रेषेपासून दूर आहेत. असे का हा देखील एक सतावणारा प्रश्न आहे.
अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकाच रेषेत असणारी ही तिन्ही मंदिरे तब्बल १००० वर्षांपूर्वी बांधण्यात आली आहेत. त्याकाळी कोणत्याही प्रकारची सॅटेलाईट टेक्नोलॉजी नव्हती तरीही बांधकाम करणाऱ्यांनी ही मंदिरे एकाच रांगेत कशी उभारली हे न उलगडणारं कोडं आहे.
हा एखादा अभियांत्रिकी, ज्योतिषी आणि भौगोलिक करिष्माच म्हणावा लागेल.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.
Rameshwaram and Kedarnath temples are also in situated in single line.
थिरू वगैरे नसतं हो ते , तिरुपती प्रमाणे तिरु, तिरु म्हणजे तमिळ भाषेत श्री, त्या अर्थाने प्रत्येक ठिकाणी तिरु असतं, तमिळ भाषेत थ हे अक्षरच नसल्याने th हे त साठी वापरतात,
निव्वळ दुसऱ्या भाषेतील अनुवाद करण्यापेक्षा एखाद्या स्थानिक व्यक्तीकडून मदत घेतल्यास उपयोगी पडेल.
इतरही अनेक चुका ह्या गावांची नावं लिहिताना झालेल्या आहेत,
तिरूवनैक्कावल् असं नाव आहे ते. सर्व श्री रक्षण असा त्याचा अर्थ आहे.