' यंदाच्या विश्वचषकात हे ३ संघ असतील विजेतेपदाचे प्रबळ दावेदार! – InMarathi

यंदाच्या विश्वचषकात हे ३ संघ असतील विजेतेपदाचे प्रबळ दावेदार!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

क्रिकेटच्या महाकुंभाला नुकतीच सुरुवात झाली आहे. यंदाचा विश्वचषक हा क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंग्लंड मध्ये सुरु झाला आहे. सहा आठवड्याच्या या स्पर्धेत टॉप १० वनडे संघ सहभागी झाले आहेत.

४८ सामने आणि एक अंतिम सामना लॉर्ड्स वरती १४ जुलै रोजी खेळाला जाईल.

हा विश्वचषक राऊंड रॉबिन फॉरमॅट नुसार खेळाला जाणार आहे, म्हणजेच प्रत्येक संघाला एकमेकाविरुद्ध मॅच खेळण्याची संधी मिळणार आहे. प्रत्येक संघ हा ९ सामने खेळणार आहे.

 

all captains inmarathi
thenews.com.pk

जे टॉप ४ संघ असतील ते उपांत्यपुर्व सामन्यांनसाठी पात्र ठरतील. राऊंड रॉबिन फॉरमॅटचा वापर १९९२ च्या विश्वचषकामध्ये करण्यात आला होता.

गुणवत्ता, अनुभव, उत्कृष्ठ खेळ करण्याची क्षमता पाहता हे तीन संघ विजेतेपदाची प्रबळ दावेदार असल्याचे मानले जात आहे.

१) इंग्लंड

इंग्लंडचा संघ हा विश्वचषकाच सर्वात प्रबळ दावेदार आहे. यंदाच्या विश्वचषक हा इंग्लंड मध्ये होत असून घराच्या मैदानावर याचा फायदा इंग्लंडला नक्कीच होईल.

२०१५ च्या नैराश्यजनक कामगिरीनंतर इंग्लंडने आपल्या खेळण्याची पध्दत बदली असून ते अधिक आक्रमक अश्या स्वरूपाचं क्रिकेट खेळू लागले आहेत.

ते यामध्ये यशस्वी झाले असून, आयसीसीच्या वनडे क्रमवारीत अव्वल स्थानावर आहेत.

 

england inmarathi
MSN.com

इंग्लंडच्या संघाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची फलंदाजी. संघात एकापेक्षा एक वरचढ फलंदाज आहेत. आणि त्यांच्या फलंदाजीमध्ये डेप्थ आहे, जेणेकरून शेवटचे फलंदाज देखील चांगली खेळी करू शकतात.

या संघात खूपच विस्फोटक असे फलंदाज आहेत. या संघाने मागील ३-४ वर्षात खूप वेळा ३५० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. इंग्लड मधील खेळपट्टीही फलंदाजीला अनुकूल असेल. याचा फायदा फलंदाज नक्कीच घेतले.

गोलंदाजी सुद्धा या संघात खूपच पर्याय उपलब्ध आहेत. स्पिन गोलंदाज संघात चांगले असल्यामुळे ते नक्कीच उपयोगी ठरतील. इंग्लडची आणखी एक जमेची बाजू म्हणजे त्याच्या संघात असलेले अष्टपैलू खेळाडू ते संघाला समतोल देतात.

इंग्लंडच्या संघाला हरवणे हे सर्व संघाना कठीण जाईल हे मात्र नक्की. इंग्लंडच्या संघाने आत्तापर्यंत एकदाही विश्वचषक जिंकला नाहीये, पण यावर्षी ते विश्वचषक जिंकून इतिहास रचतील का हे पाहणं उत्सुक्याच ठरणार आहे.

इंग्लंडचा संघ पुढीलप्रमाणे :-

इऑन मॉर्गन (कर्णधार ), जेसन रॉय, जॉनी बेअरस्टो, जेम्स विन्स, जोस बटलर (यष्टीरक्षक ), बेन स्टोक्स, मोईन अली, ख्रिस वोक्स, लिआम डॉसन, टॉम कुरान, लिआम प्लंकेट, मार्क वुड, आदिल रशीद, जोफ्रा आर्चर, जो रूट

२) भारत

भारतीय संघ हा आयसीसी वनडे क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर आहे. भारतीय संघ हा त्यांच्या टॉप ३ फलंदाजा वरती जास्त अवलंबून आहे. २०१५ विश्वचषकानंतरच्या सामन्यात भारतीय टॉप ३ म्हणजेच रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली.

संघाच्या एकूण धावांच्या ६५ % धावा या तिघांनी काढल्या आहेत. त्यामुळे भारतीय संघ हा या तिघांवरती जास्त अवलंवून असेल.

 

world cup team inmarathi
ndtv.com

जेव्हा टॉप ऑर्डर ढासळेल तेव्हा महेंद्र सिंह धोनीचा अनुभव संघासाठी फायदेशीर ठरेल. टीम मध्ये असलेले अष्टपैलू खेळाडू संघाला समतोल देण्याचं काम करतात. हार्दिक पंड्या, केदार जाधव, विजय शंकर, रवींद्र जडेजा हे खेळाडू विश्वचषक जिंकण्याच्या दृष्टीने महत्वाचे ठरतील.

भारताची फिरकी गोलंदाजी सुद्धा उत्तम आहे. यजुवेंद्र चहल आणि कुलदीप यादव या जोडीची फिरकी गोलंदाजीही इंग्लंडच्या खेळपट्टीवर प्रभावी ठरू शकते.

भारतीय संघाकडे सर्वात्तम गोलंदाजी आहे. फिरकी तर आहेच पण भारताचे जलदगती गोलंदाजही या बाबतीत मागे नाहीत. जसप्रीत बुमराह भारताचाच नव्हे संपूर्ण जगातील सर्वात्तम गोलंदाज आहे. त्याच्या सोबतच भूवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी आहेत.

विराट कोहली पहिल्यांदाच विश्वचषकामध्ये संघाचे नेतृत्व करत आहे. भारतीय संघाचा इंग्लंडमध्ये ईतिहास चांगला राहिलेला आहे. २०१३ ला भारतीय संघाने इंग्लंडमध्येच चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती, तर २०१७ मध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारतीय संघ हा उपविजेता राहिला होता.

भारतीय संघाने यापूर्वी १९८३ आणि २०११ ला विश्वचषकावरती आपले नाव कोरले आहे. यावेळी भारतीय संघ विश्वचषक जिंकेल अशी सर्व भारतीय चाहत्यांना अपेक्षा आहे.

भारतीय संघ पुढीलप्रमाणे :-

विराट कोहली (कर्णधार ), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, विजय शंकर, एमएस धोनी( यष्टीरक्षक ), केदार जाधव, दिनेश कार्तिक, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी .

३) ऑस्ट्रेलिया

ऑस्ट्रेलिया हा विश्वचषकातील सर्वात यशस्वी संघ आहे. ऑस्ट्रेलियाने आत्तापर्यंत पाच विश्वचषक जिंकले आहेत. २०१५ चे विश्वचषक हा ऑस्ट्रेलिया ने जिंकला आहे.

मागील २-३ वर्ष मध्ये संघाला चांगली कामगिरो करता आलेली नाही पण तरीही ऑस्ट्रेलिया कमी लेखण्याची कोणतीही टीम हिम्मत करणार नाही.

बॉल टेम्परिंगमुळे संघातून १ वर्षासाठी बाहेर असलेल्या डेविड व्हॉर्नर आणि स्टीवन स्मीथची संघात वापसी झाली आहे. या संघात स्मीथ आणि व्हॉर्नर परत आल्यामुळे संघाची फलंदाजीची ताकत वाढलेली आहे.

एरॉन फिंच या ऑस्ट्रेलियन संघाचं नेतृत्व करत आहे. फलंदाजी ही ऑस्ट्रेलिया संघाची ताकद आहे. संघातील अष्टपैलू खेळाडू हे संघाला समतोल देतात.

 

austrailia inmarathi
EyeSole

गोलंदाजी मध्ये सुद्धा ऑस्ट्रेलियाकडे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. ऑस्ट्रेलिया संघ हा सर्वच संघासाठी खुप मोठं आव्हान असेल.

ऑस्ट्रेलियन संघामध्ये विश्वचषक खेळलेले अनेक खेळाडू आहेत. त्यांचा अनुभव हा नक्कीच फायदेशीर ठरेल. ऑस्ट्रेलियाही मोठ्या स्पर्धा जिंकण्यासाठी प्रसिद्ध आहे. ते यावेळी काय करिष्मा करतात हे येणारी वेळच सांगेल.

ऑस्ट्रेलियन संघ पुढीलप्रमाणे :-

अॅरॉन फिंच (कर्णधार ), डेव्हिड वॉर्नर, उस्मान खवाजा, स्टीव्हन स्मिथ, शॉन मार्श, मार्कस स्टॉन्नीस, अॅलेक्स केरी (यष्टीरक्षक), नॅथन कॉल्टर-नाईल, जेसन बेहरेंडरफ, केन रिचर्डसन, नॅथन ल्योन, अॅडम झॅम्पा, ग्लेन मॅक्सवेल, मिशेल स्टार्क, पॅट कमिन्स.

विश्वचषकामध्ये वरील संघ हे प्रमुख दावेदार असतील यात काही वादच नाही पण दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, पाकिस्तान हे संघ ही कोणत्याही टीमला पराभूत करण्याची क्षमता ठेवतात.

क्रिकेटच्या पंढरीमध्ये विश्वचषकावर कोणता संघ आपले नाव कोरतो हे आपल्याला १४ जुलैलाच कळेल.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?