' तमिळ, तेलुगु नंतर आता ‘3 Idiots’ चा मेक्सिकन टच असलेला ‘spanish’ रिमेक धुमाकूळ घालतोय! – InMarathi

तमिळ, तेलुगु नंतर आता ‘3 Idiots’ चा मेक्सिकन टच असलेला ‘spanish’ रिमेक धुमाकूळ घालतोय!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

चेतन भगतच्या ‘five point someone’ कादंबरीवर आधारित असलेला चित्रपट 3 Idiots हा चित्रपट भारतात अतिशय लोकप्रिय झाला. राजू , फरहान आणि रँचो ह्या तीन मित्रांची गोष्ट लोकांना फार आवडली. टेन्शन घेणारा राजू, कन्फ्युज्ड फरहान आणि हुशार, बिनधास्त स्मार्ट रँचो एका इंजिनियरिंग कॉलेज मध्ये ऍडमिशन घेतात आणि काही न काही कुरापती करून तिथल्या कडक शिस्तीचे प्रिन्सिपल विरू सहस्त्रबुद्धे ह्यांची नाराजी ओढवून घेतात. सतत काही ना काही खोड्या काढून ते व्हायरसचा म्हणजेच त्यांच्या प्रिन्सिपलचा स्वतःवर राग ओढवून घेतात आणि प्रिन्सिपल सुद्धा ते पास होणार नाहीत अशी व्यवस्था करतात. अखेर आपल्या चांगुलपणाने ते प्रिन्सिपलचे मन जिंकून घेऊन शिक्षण पूर्ण करतात व आयुष्यात यशस्वी होतात.

परंतु राजू व फरहान ह्यांना सोडून रँचो अज्ञातवासात निघून जातो. राजू आणि फरहान त्याचा पत्ता शोधून काढतात व त्यांना कळते की रँचो हा खरा रणछोडदास चांचड नसून त्याचे नाव फुन्सुक वांगडू असे आहे व तो लेहला राहून त्याच्या शिक्षणाचा उपयोग वेगवेगळे शोध लावण्यासाठी करतो आहे व अनेक लहान मुलांना असे व्यावहारिक शिक्षण देतो आहे. असे ह्या चित्रपटाचे कथानक आहे. “कामयाब होने के लिये नही बल के काबील होने के लिये पढो,कामयाबी झक मार के तुम्हारे पीछे आयेगी” असा ह्या चित्रपटाने संदेश दिला. अनेक लोकांनी ह्या चित्रपटावरून प्रेरणा घेतली.

3-idiots-marathipizza
india.com

२५ डिसेम्बर २००९ साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट राजकुमार हिरानी ह्यांनी दिग्दर्शित केला होता आणि विधू विनोद चोप्रा हे ह्या चित्रपटाचे निर्माते होते. आमीर खान, आर. माधवन, शर्मन जोशी, बोमन इराणी, करीना कपूर ह्यांनी ह्या चित्रपटात अप्रतिम अभिनय करून प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. ह्या चित्रपटाचे यश बघून त्याचा तमिळ मध्ये Nanban ह्या नावाने रिमेक करण्यात आला. हा चित्रपट २०१२ साली प्रदर्शित झाला व रिमेकला सुद्धा घवघवीत यश मिळाले तसेच समीक्षकांनी सुद्धा ह्या रिमेकचे तोंड भरून कौतुक केले होते. ह्या चित्रपटाचे subtitled version हे China, Malaysia, Singapore , Japan आणि Philippines ह्या देशात लोकप्रिय झाले.

Nanban-Tamil-Movie-marathipizza

त्यानंतर ह्या चित्रपटाचा चायनीज रिमेक होणार व ह्या रिमेकची निर्मिती Stephen Chow करणार अशीही बातमी मध्यंतरी आली होती. तसेच हॉलीवूड मध्ये सुद्धा ह्याचा रिमेक होणार अशी आवई उठली होती. ह्या चित्रपटाचा तेलुगु रिमेक प्लान करण्यात आला होता. हाच चित्रपट तेलुगु मध्ये ‘Snehitadu’ ह्या नावाने प्रदर्शित झाला होता.

snehithudu-marathipizza
vijayfannandha.blogspot.in

आणि आता ‘3 Idiots’ चा Spanish रिमेक आलाय. ३१ मार्च रोजी हा चित्रपट मेक्सिकोमध्ये रिलीज झालाय आणि आता तेथे धुमाकूळ घालून येत्या जून मध्ये हा चित्रपट अमेरिकेमध्ये रिलीज होणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर तुम्ही येथे पाहू शकता.

‘3 Idiots’ ह्या चित्रपटाने २००९ साली बॉलीवूडचे सर्व रेकॉर्ड मोडले. ह्या चित्रपटाचा विषय म्हणजे आजची शिक्षणपद्धती होय. अव्यावहारिक शिक्षणपद्धती हि समस्या फक्त भारताचीच नाही तर अनेक देशांत ही समस्या आहे. ह्या समस्येवर चित्रपट बनवायचा म्हणून  ‘3 Idiots’ चा Spanish रिमेक बनवला गेलाय. चित्रपटाचे नाव- ‘3 Idiotas’ असे आहे. म्हणजे नावापासूननच रिमेक केण्यास सुरुवात केली म्हणायची.

असो, ह्या चित्रपटाचा ट्रेलर सगळीकडे व्हायरल झाला असून भारतीय रसिक त्याला भरभरून दाद देत आहेत. जरी तुम्हाला spanish भाषा येत नसली तरीही तुम्हाला हा चित्रपट नक्कीच कळेल. 3 Idiots मधील सर्व महत्वाच्या आणि अप्रतिम दृश्यांची झलक तुम्हाला 3 Idiotas’ मध्ये बघायला मिळेल.

3-idiotas-marathipizza
dondeir.com

ह्या रिमेक मध्ये आमीर खान, आर. माधवन, शर्मन जोशी आणि करीना कपूर ह्यांच्या भूमिका अनुक्रमे Alfonso Dosal, Christian Vazquez, German Valdez आणि Martha Higareda हे अभिनेते करतील.

हा चित्रपट जर भारतात प्रदर्शित झाला तर त्याला कसा प्रतिसाद मिळेल हे बघणे इंटरेस्टिंग ठरेल. कारण लोकांना आधीच ओरिजिनल चित्रपट खूप आवडला होता. आता हा रिमेक ओरिजिनलच्या कितपत जवळ जातो किंवा Spanish रिमेकला ओरिजिनलची सर येणार का हे मात्र येणारा काळच ठरवू शकेल.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?