' मेडिकलचं शिक्षण सोडून जळगावचा हा तरुण, शेती करून लाखो रुपये कसे कमावतो?

मेडिकलचं शिक्षण सोडून जळगावचा हा तरुण, शेती करून लाखो रुपये कसे कमावतो?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

===

सर्वांची इच्छा असते की, त्यांनी खूप शिकावं, शिकून खूप मोठं व्हावं, मोठ्या पदावर रुजू व्हावं, चांगल्या पगाराची नोकरी मिळवावी. पण तिथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप मेहनत आणि तेवढाच पैसा देखील लागत असतो.

काही लोकांना हे सर्व मिळतं आणि ते त्या शिखरावर देखील पोहोचतात.

पण काही लोकं असे देखील असतात जे आपल्या कल्पकतेचा वापर करून असं काही करून दाखवतात जे इतरांच्या कल्पनेच्या देखील बाहेर असते. यापैकीच एक आहेत संदेश पाटील.

यांनी डॉक्टरकीचे शिक्षण सोडून केवळ थंडीच्या मोसमात घेण्यात येणाऱ्या केशरचे पिक जळगाव सारख्या उष्ण प्रदेशात घेऊन दाखवलं आहे आणि त्यापासून ते खूप कमवत देखील आहेत!

चला तर जाणून घेऊ या संदेश पाटील यांची कथा.

 

हे ही वाचा

===

 

२७ वर्षीय संदेश पाटील हे डॉक्टरकीचे शिक्षण घेत होते. पण त्यांनी ते सोडून त्यांच्या शेतीत केशरचे पिक घेण्याचं ठरवलं. केशरच्या पिक थंड वातावरण लागतं, पण संदेश यांनी महाष्ट्राच्या जळगाव या प्रदेशात हे पिक घेऊन सर्वांना आश्चर्यचकित करून सोडले आहे.

 

kesar-inmarathi03

 

जळगावच्या मोरगाव खुर्द येथे राहणाऱ्या २७ वर्षीय संदेश पाटील यांनी मेडिकल विभागाच्या बीएएमएसमध्ये अॅडमिशन घेतली होती. पण त्यात त्याचं मन लागत नव्हतं.

त्यांच्या परिसरात केळी आणि कापूस यांसारखी पारंपारिक पिके घेण्यात येतात. पण त्यापासून काही खास नफा तेथील शेतकऱ्यांना होत नसे.

यामुळे संदेश यांना पिकांच्य पारंपारिक पद्धतीत बदल करण्याचा निश्चय केला, त्यानंतर त्यांनी सोशल फर्टिलिटीचा अभ्यास केला.

त्यांनी मातीच्या फर्टिलिटी पावरला वाढवून शेती करण्याच्या पद्धतीत प्रयोग करण्याचा विचार केला. यासाठी त्यांनी राजस्थान मध्ये करण्यात येणाऱ्या केशरच्या शेतीबद्दल माहिती गोळा केली.

 

kesar-inmarathi01

 

त्याबद्दल सर्व माहिती त्यांनी त्यांच्या कुटुंबाला सांगितली. सुरवातील त्यांचे वडील आणि काका त्यांच्या या निर्णयाच्या विरोधात होते, पण संदेश त्यांच्या निश्चयावर अटळ होते.

शेवटी त्यांची जिद्द आणि मेहनत बघून त्यांच्या कुटुंबानेही त्याचा निर्णय मान्य केला.

त्यानंतर त्यांनी राजस्थानच्या पाली शहरातून ४० रुपयाच्या हिशोबानी ९.२० लाख रुपयांचे ३ हजार रोपं खरेदी केले आणि यांना त्याने आपल्या एक एकराच्या जमिनीत लावलं.

 

kesar-inmarathi

 

संदेश यांनी आपल्या कौशल्याच्या जोरावर अमेरिकेच्या काही भागात आणि काश्मीरच्या काही परिसरात घेतल्या जाणाऱ्या केशरची शेती जळगाव सारख्या भागात करण्याचा कारनामा केला आणि त्यात ते सफल देखील झाले.

 

हे ही वाचा –

===

 

kesar-inmarathi02

 

संदेश यांनी त्यांच्या शेतात जैविक खाद्याचा वापर केला. मे २०१६ मध्ये संदेशने १५.५ किलो केशराच पिक घेतलं. या पिकाचे त्यांना ४० हजार रुपये किलोच्या हिशोबाने पैसे मिळाले.

याचे त्यांना एकूण ६.२० लाख रुपयाची कमी केली.

याकरीता लागणारी रोपं, पेरणी, नांगरणी आणि खत यासर्वांवर एकूण १.६० लाख रुपयांचा खर्च आला, त्याला सोडून त्यांनी ५ महिन्यांत ५.४० लाख रुपयाचा नफा कमावला.

कठीण परिस्थितीत देखील संदेशने अशक्य वाटणाऱ्या या कामाला शक्य करून दाखवले.

 

sandesh patil inmarathi

 

आता तर केन्हाला, रावेल, निंभोरा, अमलनेर, अंतुर्की, एमपी येथील पलासूर या गावांतील शेतकऱ्यांनी देखील संदेशचा आदर्श घेत केशरची शेती करण्यास सुरवात केली आहे.

खरंच, जर महाराष्ट्रातील इतर शेतकऱ्यांनी देखील संदेश पाटील यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत चौकटीबाहेरचा विचार केला, तर आपला बळीराजाला आर्थिकदृष्ट्या स्थिर होण्यास फार काळ लागणार नाही आणि त्याच्यावर जीव देण्याची वेळ येणार नाही.

 

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?