'चाळीशी ओलांडली म्हणून काय झालं? जाणून घ्या चाळीशीनंतर यशस्वी झालेल्या माणसांबद्दल!

चाळीशी ओलांडली म्हणून काय झालं? जाणून घ्या चाळीशीनंतर यशस्वी झालेल्या माणसांबद्दल!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

एका ठराविक वयात यश मिळालं की माणसाच्या डोक्यात हवा जाते. अनेक माणसं अशी आहेत जी यशासाठी एका विशिष्ट वयोमर्यादेपर्यंतच प्रयत्न करतात. त्यांनी ठरवलेल्या वयानंतर ते प्रयत्न करणं सोडून देतात. त्यांचा मार्गच बदलतात किंवा नशिबाला दोष देत बसतात.

पण काही लोक याला अपवाद आहेत. ज्यांनी वयाच्या चाळीशीनंतर भरघोस यश मिळवलंय. ज्यांचं जगभर नाव झालंय.

त्यांची कलाकृती, किर्ती तिन्ही लोकांत पसरली आहे. बघूया असे काही लोक ज्यांनी चाळीशीनंतर नंतर यश मिळवले आहे.

 

१. बोमन इराणी 

 

boman-irani-inmarathi

 

मुन्नाभाई एमबीबीएस या चित्रपटात मुन्ना म्हणजेच संजुबाबाच्या अभिनयाला तोडीसतोड अभिनय करत बोमान इराणी प्रसिद्धी  झोतात आले. त्याआधी त्यांनी पेज थ्री चित्रपटातही काम केले होते.

मुन्नाभाई नंतर त्यांनी थ्री इडियट्स या चित्रपटात प्रो. सहस्त्रबुद्धेची भूमिका केली. ही भूमिक सुद्धा तुफान गाजली. बोमान इराणी यांना हे यश वयाच्या चाळीशीनंतर मिळाले.

 

२. स्टॅन ली

 

stan-lee-inmarathi

 

स्पायडर मॅन, एक्स मॅन या काल्पनिक हिरोंचे अनेक चाहते आहेत. त्या काल्पनिक हिरोजना जन्म देणारे स्टॅन ली यांनाही वयाच्या 40 नंतरच यश मिळाले. त्यांनी रेखाटलेल्या एक्स-मॅन आणि स्पायडरमॅनचे चित्रपट सर्व पिढ्या हौसेने बघतात.

 

३. अॅलन रिकमॅन

 

alan-rickman-professor-snape-inmarathi

 

हॅरी पॉटर या चित्रपटाच्या सिरीज मधील प्रोफेसर स्नेप तुम्हाला आठवत असेल. ही भूमिका साकारणारे, अॅलन रिकमॅन यांनी वयाच्या ४६ व्या वर्षी आपल्या करिअरला सुरवात केली. अल्प काळातच  ते प्रसिद्धीच्या झोतात आले.

आपलं यश साजरं करण्यासाठी ते आज आपल्यात नाहीत. पण त्यांनी केलेल्या भुमिकेने ते सदैव आपल्यासोबत असणार आहेत.

 

४. परेश रावल

 

paresh-rawal-baburao-apte-inmarathi

 

परेश रावल यांनी आजवर अनेक भूमिका साकारल्या आहेत. पण, बाबुराव गणपतराव आपटे या भुमिकेसाठी ते ओळखले जाऊ लागले. त्यांनी केलेला बाबूराव हा अजरामर झाला आहे.

त्यांच्या करिअरमध्ये खऱ्या अर्थाने हेराफेरी झाली आणि परेश रावल यशस्वी झाले.

 

५. मॉर्गन फ्रिमॅन

 

morgan-freeman-inmarathi

 

असं म्हणतात कलेला भाषा नसते. ती भावनेच्या भाषेतून व्यक्त होते. ज्यांना हॉलिवूड सिनेमातलं काही माहित नसेल त्यांनी जरी फ्री मॅन यांचा चित्रपट पाहिला की त्यांना सकस अभिनय काय असतो ते लक्षात येईल. फ्रीमॅनवयाच्या 52 व्या वर्षी प्रसिध्दीस आले.

 

६. नसिरुद्दीन शहा

 

naseeruddin-inmarathi

 

“आणि मग एक दिवस” नावाने नसिरुद्दीन शहा यांनी आपले चरित्र प्रकाशित केलं आहे. त्यांच्या अभिनयाची किर्ती बॉलिवुडच नाही तर हॉलिवुडमध्येही पोहोचली आहे.

सरफरोश, इक्बाल आणि तीन दिवारे या चित्रपटांसाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. वयाच्या ४० व्या वर्षी शहा यांना हम पांच या चित्रपटाद्वारे यश लाभलं.

 

७. पंकज त्रिपाठी 

२००४ साली रन आणि ओमकारा अशा चित्रपटांमधून त्याने आपल्या अभिनयाला सुरुवात केली होती. मात्र दखलपात्र काम करण्याची संधी त्याला मिळाली नव्हती.

गँग्स ऑफ वासेपूर १ आणि २ या चित्रपटांमधून त्याने त्याची ओळख निर्माण केली असं म्हणता येईल.

 

pankaj-tripathi-inmarathi

 

मात्र हा गुणी आणि दमदार कलाकार खऱ्या अर्थाने आज यशाच्या शिखरावर पोचला आहे. मिर्झापूर या वेब सिरीजच्या पहिल्या दोन्ही भागात त्याने मध्यवर्ती भूमिका साकारली आहे.

वयाची चाळीशी उलटून गेल्यानंतर, त्याला मोठी प्रसिद्धी मिळाली आहे. ‘कालीन भैया’ या त्याच्या वेब सिरीजमधील नावाची वेगळीच हवा आहे. पंकज त्रिपाठी या नावासह आज चाहत्यांमध्ये तो ‘कालीन भैया’ म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे.

 

८. हेन्री फोर्ड

 

henry-ford-inmarathi

 

फोर्ड कंपनीचं नाव, गाड्यांची माहिती असलेल्या आणि नसलेल्या सर्वांनीच ऐकलं असेल. त्या कंपनीचे जनक हेन्री फोर्ड हे वयाच्या 45 व्या वर्षी यशस्वी झाले. एक बिझनेसमॅन म्हणून त्यांनी स्वतःचा जगभरात त्यांचा ठसा उमटवला आहे.

 

९. पियुष मिश्रा

 

piyush-mishra-inmarathi

 

इक बगल में चाँद होगा इक बगल में रोटींयाँ हे गाणं तुम्ही गँग्स ऑफ वासेपूरमध्ये ऐकलं असेलच. त्याच गँग्स ऑफ वासेपूरमध्ये सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्याचं काम पियुष मिश्रा यांनी केलं आहे.

त्याआधी त्यांनी मक्बूल सिनेमात अभिनय केला आहे. त्यांनाही प्रसिद्धीच्या झोतात यायला बराच वेळ लागला. ४१ व्या वर्षी ते प्रसिद्ध झाले.

 

१०. किरण खेर

 

kiran-kher-inmarathi

 

किरण खेर या नावाजलेल्या अभिनेत्री असल्या तरी त्यांना नाव कमवण्यासाठी ४१ वर्ष वाट पहावी लागली.

रंग दे बसंती मध्ये त्यांनी आमीरच्या आईची भूमिका केली आहे. त्यांनी केलेल्या सर्व भुमिका आज प्रेक्षकांना आवडतात. तसंच त्या भारतीय जनता पक्षाकडून लोकसभेवर खासदार म्हणून निवडून सुद्धा गेल्या आहेत.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?