'दारू, सिगारेट नव्हे तर `या' ७ व्यसनांबाबत गाफील असाल तर भविष्यात मोठ्या नुकसानाला समोरं जावं लागेल

दारू, सिगारेट नव्हे तर `या’ ७ व्यसनांबाबत गाफील असाल तर भविष्यात मोठ्या नुकसानाला समोरं जावं लागेल

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

दारू किंवा सिगारेटचे जसे लोकांना व्यसन लागते, तसेच इतर वेगवेगळ्या गोष्टींचे व्यसन देखील लोकांना लागते. एखादी वस्तू किंवा गोष्टीचा प्रमाणाबाहेर वापर करणे आणि त्या गोष्टीशिवाय न राहू शकणे, हा देखील एक व्यसनाचाच  भाग आहे.

आज आपण तरुण मुलांना मोबाईलचे वेड लागलेले सगळीकडे पाहतो. मोबाईलचा खूप जास्त प्रमाणात वापर करणे, हा देखील एक अॅडिक्शनचा प्रकार आहे.

हे अॅडिक्शन काही काळाने तुमच्या मनावर परिणाम करू शकते आणि तुम्ही त्यामधून कधीही बाहेर पडू शकणार नाहीत.

फक्त तंबाखू, दारू, सिगारेट यांसारखे व्यसनच तुमचे आयुष्य खराब करू शकत नाहीत, तर अजूनही अनेक गोष्टी आहेत, जे तुमचे जीवन अंधारात ढकलू शकतात. चला तर मग जाणून घेऊया, या अॅडिक्शन लावणाऱ्या गोष्टींबद्दल.

१. लेट लतीफ

 

आजच्या युगात आपण अशी कितीतरी माणसे पाहतो, जी आजच काम उद्यावर ढकलतात. ते आज व्यस्त आहेत, म्हणून काम उद्यावर ढकलतात, असे काही नसते.

ते काही काम करत नसले, तरीदेखील फक्त कंटाळा येतो, म्हणून ते काम उद्यावर टाकले जाते.

 

lazy people inmarathi
india today

 

जेव्हा त्यांना हे समजते की, ते खूप आळशी झाले आहेत आणि आळसपणामुळे ते हे सर्व करत आहेत. त्यावेळी वेळ निघून गेलेली असते. असे जर तुम्ही देखील करत असाल, तर आताच सावधान व्हा.

तुमचे नुकसान होण्याआधी ही सवय बदला.

२. फालतूचा खर्च

 

जर तुम्ही जास्त कमवत असाल आणि खूप खर्च करत असाल, तर तुम्हाला कोणतीच समस्या नाही आहे. पण जर तुमची कमाई कमी असून देखील तुम्ही फालतूचा खर्च करत असाल, तर तुम्हाला कठीण प्रसंगाना सामोरे जावे लागले.

 

online shopping inmarathi'
cool shop

 

जर तुम्ही सेलमध्ये भेटतय म्हणून गरज नसेल तरी खरेदी करत असला, तर तुम्हाला याबद्दल नक्कीच विचार करायला लागेल, कारण तुमची ही सवय तुम्हाला कर्जबाजारी बनवू शकते.

३. बॅकग्राउंड म्युझिक

 

काही लोकांना कोणतेही काम करताना बॅकग्राउंडला म्युझिक ऐकण्याची सवय असते. त्यामुळे ते मोबाईलवर, लॅपटॉपवर म्युझिक लावून काम करतात.

 

DIgital trends

 

बॅकग्राउंड म्युझिकशिवाय ते कोणत्याही गोष्टीवर आपले लक्ष केंद्रित करू शकत नाहीत आणि मोठे झाल्यावर ही त्यांची सवय बनते.

जर ते लॅपटॉपवर काम करत असतील, तर त्यांच्या कानाला म्युझिक ऐकायची सवय आहे, म्हणून टीव्ही लावून ठेवतात, भलेही तो टीव्ही ते पाहत नसतील.

या प्रकारची सवय चांगली नाही, यामुळे तुमच्या प्रोफेशनल जीवनामध्ये समस्या येऊ शकतात.

४. खूप गोड खाणे

 

संशोधनांमध्ये हे सिद्ध झाले आहे की, साखरेचे जास्त सेवन आपल्या मेंदूला तेवढेच नुकसान करते, जेवढे कोकीन आणि हिरोइन यांसारखे ड्रग्स करतात.

हे माहित असून देखील काही लोक आपल्या गोड खाण्याच्या सवयीला कमी करत नाहीत आणि लपूनछपून खूप गोड खातात.

 

eating sweets inmarathi

 

यामुळे पुढे शरीराच्या गंभीर समस्यांना सामोरे जावे लागेल.

५. सगळीकडे गाडीने जाणे

 

काही लोकांना गाडीचे एवढे व्यसन असते की, पायी चालत जाण्याचा ते लोक विचार देखील करू शकत नाहीत.

जवळपास जायचे असेल, तरीदेखील गाडी काढतात. जर कुठे गाडीने जाऊ शकले नाही, तर ऑटो किंवा टॅक्सीने जातात.

 

scooty inmarathi

 

असे लोक काही पाऊले देखील पायी जात नाहीत आणि हे त्यांच्या आरोग्यासाठी चांगले नसते.

निरोगी जीवन जगण्यासाठी चालणे खूप गरजेचे आहे. पण आपण हे गाडीमुळे विसरून जातो.

६. पॉर्न पाहणे

आजकाल इंटरनेटवर पॉर्न सामग्री सहज मिळते. बऱ्याच तरुणांना हे पॉर्न पाहण्याचे व्यसन जडले आहे. सुरुवातीला आपली जिज्ञासा शांत करण्यासाठी पॉर्न साईट्स पाहतात. पण त्यांना हे लक्षात येत नाही की, कधी त्यांना त्याची सवय जडते.

 

porn-watching-inmarathi

 

 

लवकरच ते पॉर्न अॅडिक्टेड होतात आणि हे त्यांच्यासाठी नुकसानदायक असते.

 

७. स्मार्टफोन आणि इंटरनेटचे व्यसन

 

स्मार्टफोन आल्यानंतर आपले जीवन पूर्णपणे बदलले आहे. आजकाल परिस्थिती एवढी खराब झाली आहे की, लोक १ तास देखील आपल्या स्मार्टफोनशिवाय राहू शकत नाही.

काही लोक म्हणतात कि, याची त्यांना गरज आहे आणि त्याशिवाय त्यांचे काम होणार नाही.

 

indian girls having phone inmarathi
BGR india

 

पण काही लोकांना फक्त याचे व्यासन असते. सोशल मिडिया चेक करणे, फोटोला किती लाइकस आले हे पाहणे, कुणी काय अपलोड केले आहे, हे पाहणे.

हे सर्व करण्यासाठी ते दिवसभर फोनमध्ये मग्न असतात. त्यामुळे मनावर वाईट परिणाम होतो आणि आपण एकाकी होतो.

 

child-using-smartphones-2 InMarathi

 

अशा प्रकारच्या सवयी जर तुम्हाला असतील, तर लवकरात लवकर सोडणे गरजेचे आहे, कारण या सवयींमुळे तुम्हाला कितीतरी समस्यांना सामोरे जावे लागेल.

जर तुमच्या मित्रमंडळीतही कुणाला वरील व्यसनांपैकी कुठले व्यसन असेल तर त्यांच्या सोबत ही माहिती शेअर करायला विसरू नका… 

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?