'कुठे दारू तर कुठे नूडल्स : मंदिरांचे विचित्र नैवेद्य अन प्रसाद...

कुठे दारू तर कुठे नूडल्स : मंदिरांचे विचित्र नैवेद्य अन प्रसाद…

कुठे दारू तर कुठे नूडल्स : मंदिरांचे विचित्र नैवेद्य अन प्रसादआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

प्राचीन काळापासून आपल्या देशात धर्माला खूप महत्व देण्यात आले आहे. त्या धर्मांची प्रचीती देणारी धर्मस्थळं म्हणजेच मंदिर याचं देखील विशेष महत्व आहे. मंदिर हे आपल्या धर्माचं, संकृतीच प्रतीक. पण मंदिर म्हंटल की, आणखी एक गोष्ट आठवते आणि ती म्हणजे मंदिरात मिळणारा प्रसाद. आजपर्यंत आपण वेगवेगळ्या मंदिरात वेगवेगळे प्रसाद खाल्ले असतील, पण आज आम्ही तुम्हाला काही अशा विचित्र प्रसादाबद्दल सांगणार आहोत जे तुम्हला आश्चर्यचकित करून सोडतील.

येथे दिला जातो उंदरांचा उष्टा प्रसाद :

 

Unique Prasad-inmarathi01

 

राजस्थानच्या बिकानेर येथील देशनोक येथे करणी माता मंदिर आहे. हे मंदिर येथील परिसरातील २० हजार उंदरांसाठी देखील ओळखलं जातं. धार्मिक आस्थेनुसार या उंदरांना देवीच्या मुलांच्या रुपात बघितल्या जातं. त्यामुळे या मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात ही उंदरं दिसून येतात. येथे येणाऱ्या भाविकांना या उंदरांनी उष्टा केलेला प्रसाद दिल्या जातो.

या मंदिरात मिळतो सीडी, डीवीडीज चा प्रसाद :

 

Unique Prasad-inmarathi
bp.blogspot.com

केरळ येथील थ्रिसुर महादेव मंदिरात भाविकांना प्रसादच्या रुपात धार्मिक गोष्टी असलेल्या सीडी, डीवीडी आणि पुस्तके दिल्या जातात. याचं कारण मंदिराला हाय-टेक करणे नाहीये, तर या मंदिराच्या ट्रस्टच्या मते, धर्म आणि ज्ञानाच्या प्रचार आणि प्रसारापेक्षा चांगला प्रसाद नाही. म्हणून ते येथे सीडी आणि दिविदीचा प्रसाद देतात.

येथे मिळतो चॉकलेटचा प्रसाद :

 

Unique Prasad-inmarathi02
newstrend.news

तसे तर देवीदेवतांचे आपले-आपले आवडते नैवेद्य असते, जसे गणपतीला मोदक आवडतात, शंकरजींना भांग-धतुरा, तसेच केरळ मधील एका देवाला चॉकलेट प्रिय असल्याचं तेथील पुजारी सांगतात. केरळ येथील बालसुब्रमण्यम मंदिर येथे प्रसाद म्हणून बालामुरुगण देवाला चॉकलेट चढविल्या जाते. तसेच तेथे भाविकांनाही चॉकलेटचाच प्रसाद देण्यात येतो.

या देवीला चढवतात नुडल्सचे नैवेद्य :

 

Unique Prasad-inmarathi03

कोलकाता येथे एक चायनीज काली मंदिर आहे. कोलकाता येथील टैंगरा परिसरात एक काली मातेचं मंदिर आहे, या देवीला चायनीज लोकं जास्त पूजतात, कारण त्या मंदिरात येणाऱ्या भाविकांमध्ये चायनीज लोकांची संख्या जास्त आहे त्यामुळे या मंदिरात मिळणारा प्रसादही चायनीज असतो. म्हणून या मंदिरात नुडल्स, भात आणि भाज्यांचेच नैवेद्य चढविल्या जाते आणि भाविकांनाही हेच प्रसाद म्हणून दिल्या जाते.

या मंदिरात मिळतो डोसा प्रसाद :

 

Unique Prasad-inmarathi04
cdn.tripadvisor.com

दक्षिण भारताच्या तामिळनाडू राज्यात मदुराई येथील भगवान विष्णू यांच्या अलागार मंदिरात प्रसादच्या रुपात डोसा दिल्या जातो.

येथे मिळतो दारू प्रसाद :

 

Unique Prasad-inmarathi05
oneindia.com

उत्तर प्रदेशच्या सीतापुर जिल्ह्यात एक असं मंदिर आहे जेथील शिवलिंगावर चक्क दारू चढविल्या जाते. त्यांनतर ती चढवलेली दारू येथील मंदिर परिसरातील बंदरांना पाजली जाते. हे मंदिर खबीस बाबा या नावाने ओळखले जाते. मान्यतेनुसार खबीस बाबा यांना भैरव बाबाचे रूप मानल्या जाते.

तर अशी ही भारतातील युनिक मंदिर आणि तिथले हे युनिक प्रसाद…

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?