'डच लुटारु, त्सुनामीवर मात करत अनेक शतकांपासून उभे असलेले कार्तिकेय मंदिर!

डच लुटारु, त्सुनामीवर मात करत अनेक शतकांपासून उभे असलेले कार्तिकेय मंदिर!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

भारत हा देश पर्यटनाच्या बाबतीत अतुलनीय आहे. भारतात अशी अनेक ठिकाणं आहेत ज्यांच्या इतिहासाचा अजूनही उलगडा झालेला नाही.

प्राचीन भारतीय मंदिरं हा त्यातलाच एक विषय. अजूनही अनेक मंदिरांच्या स्थापनेविषयी आपल्याला पक्की माहिती मिळत नाही. अनेक अशी मंदिरं आहेत ज्यांचं स्थापत्य पाहून आपण अवाक होतो.

तामिळनाडूमध्ये एक अद्वितीय मंदिर आहे. हे मंदिर भगवान कार्तिकेय यांना समर्पित करण्यात आले आहे, तसेच त्यांना मुरुगन किंवा सुभ्रमन्य देखील म्हटले जाते.

तुतीकोरिन जिल्ह्यातील तिरुचंद्र मुरुगन मंदिर हे कन्याकुमारीच्या ७५ किमी उत्तरपूर्वेस आहे. या मंदिराच्या बांधकामाची नेमकी तारीख कोणालाही माहित नाही.

पण या मंदिराची मूळ रचना सुमारे १००० वर्ष अगोदर करण्यात आली आहे. शतकानुशतके, गौरवशाली चेरा, पांड्या आणि चोला राजवंशंसह विविध शासकांनी या मंदिराच्या बांधणीमध्ये योगदान दिले आहे.

आज भव्य मंदिर मोठ्या थाटात समुद्रकिनाऱ्यावर उभे आहे.

 

Tiruchendur Murugan Temple.Inmarathi
Maps.Google.com

 

पण तुम्हाला माहित आहे का?  २६ डिसेंबर २००४ मध्ये या परिसरात आलेल्या हिंद महासागरातील त्सुनामीमध्ये फक्त हे एकमेव मोठे बांधकाम असे आहे ज्याला काहीही झाले नाही.

त्या त्सुनामीच्या लाटांनी या मंदिराच्या आजूबाजूचा सर्व परिसर नष्ट केला, पण त्या त्यांनी मंदिराला स्पर्श देखील केला नाही. तिथे त्यावेळी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी याबद्दल कबुली दिली आहे.

 

Tiruchendur Murugan Temple.Inmarathi1
WikimediaCommons

 

पण लाटांनी मंदिराला स्पर्श देखील न करता फक्त आजूबाजूचा परिसर उद्ध्वस्त का केला ? हा प्रश्न नक्कीच निर्माण होतो. याच्यामागे देखील भाविकांकडून एक मनोरंजक गोष्ट सांगितली जात आहे. चला तर मग जाणून घेऊया, या गोष्टीबद्दल…

१. १७ व्या शतकामध्ये डच लोकांनी भारतामध्ये आपल्या वसाहती बनवण्यास सुरुवात केली होती. बहुतेक सिलोन (आताचा श्रीलंका) आणि तामिळनाडूच्या दक्षिणेकडील किनारपट्टीवर होते.

 

Tiruchendur Murugan Temple.Inmarathi2.
Wikimedia Commons

 

२. प्रत्येक वसाहतवादी शासकांप्रमाणेच त्यांनी हिंदू मंदिरांच्या संपत्तीची लूट केली आणि सर्व मौल्यवान ऐवज मायदेशी पाठवला.

 

Tiruchendur Murugan Temple.Inmarathi3

 

३. तुतीकोरीन त्यावेळी डचांच्या नियंत्रणाखाली होता, त्यांनी तेथून पैसे लुबाडले आणि तिरुचेंदुर मुरुगन मंदिरामधून मुरुगनची मूर्ती मायदेशी पाठवण्यासाठी उचलली.

 

tiruchendur-murugan-temple Inmarathi
Sri Lanka Travelers

 

४. हे सर्व जहाजामधून मायदेशी पाठवत असताना, मधेच एक प्रचंड चक्रीवादळ त्यांना भेटले.

 

paimg Inmarathi
cruelcity.ru

 

५. जहाजावरील कोणीतरी त्यांना सांगितले की, हे चक्रीवादळ म्हणजे मुरुगनचा क्रोध आहे. त्यामुळे त्यांनी स्वतःला वाचवण्यासाठी मूर्ती समुद्रात टाकली पाहिजे.

 

Batu-Caves-Murugan-Temple-Malaysia Inmarathi
Tourism Kerala

 

६. भगवान मुरुगन यांचे भक्त वडमलाईइप्पा पिल्लई यांना स्वप्नात येऊन देवाने त्यांच्या समुद्रातील स्थानाबाद्ल सांगितले होते, असे सांगितले जाते.

 

God in dreams Inmarathi
app mithi stories

७. पिल्लई या भक्ताने इतर भक्तगणांच्या मदतीने मुरुगन देव असलेली जागा शोधून काढली आणि देवांची मूर्ती पुन्हा किनाऱ्यावर आणली.

 

Murugan Murti Inmarathi
Tiruchendur.org

८. पंचधातू देवांच्या मूर्तीची परत एकदा मंदिरामध्ये स्थापना करण्यात आली.

 

Tiruchendur Murugan Temple.Inmarathi4

 

९. या मंदिराच्या एका दगडावरील जुन्या शिलालेखानुसार, या घटनेनंतर वरूण देवांनी भगवान कार्तिकेय यांना समुद्राच्या संतापामुळे तुमच्या मंदिराला कधीही काहीही होणार नाही, असे वचन दिले होते.

 

Tiruchendur Murugan Temple.Inmarathi5

 

१०. भाविकांचा दृढ विश्वास आहे की ह्या वचनामुळेच, जेव्हा भारताच्या दक्षिणेकडील किनारपट्टीवर त्सुनामी आली, तेव्हा त्या पाण्याने सर्वकाही वाहून गेले, परंतु मंदिराला त्या पाण्याने स्पर्श देखील केला नाही.

त्यामुळे तेथील लोक मानतात की, भगवान वरुणाने आपले वचन पाळले आणि त्यामुळे मंदिराला पाण्याने स्पर्श देखील केला नाही. अर्थात, या मागील एक वैज्ञानिक कारण देखील शास्त्रज्ञांनी दिले आहे.

शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार –

या ठिकाणाचे भौगोलिक स्थान हे लाटांपासून मंदिराचे संरक्षण करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते.

त्यांनी म्हटले आहे की, हे स्थान असे आहे, जिथे शहराच्या इतर भागांवर जोर देणारी भरतीची लाट देखील येथे स्पर्श करत नाही आणि खडकाळ नैसर्गिक उंचीमुळे लाटांची चैन तुटते.

अर्थातच, शास्त्रज्ञांनी अशा लोकांना श्रेय दिले – ज्यांनी योग्यप्रकारे अभ्यास करून हे मंदिर या जागेवर बांधले.

 

Tiruchendur Murugan Temple.Inmarathi6

 

२००५ साली एएसआय अधिकाऱ्यांनी मुरुगन देवाला समर्पित असलेलं आणखीन एक मंदिर कांचीपुरम जिल्ह्यातील सलुवनकुप्पम येथे उत्खनन करून शोधून काढलं.

ह्या मंदिराबद्दल तेव्हा उलगडा झाला, जेव्हा त्सुनामीच्या लाटा प्राचीन अवशेषांवर येऊन धडकल्या, ज्यावर ह्या मंदिराचं स्थान कोठे आहे त्याचा उल्लेख होता.

काही पुराण नोंदीत असे आढळून येते की तब्बल दोन वेळा त्सुनामीमुळे हे मंदिर उध्वस्त झाले होते – एकदा तिसऱ्या शतकात आणि पुन्हा एकदा ८ व्या शतकात.

अशी मंदिरं त्याकाळी भारतात स्थापत्यकला किती प्रगत होती याची प्रचिती देतात. अशा मंदिरांचं जतन करणं हेच आता आपल्या हातात आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?