''संस्कृत' ते 'सोलर इंजिनीअर्स' : भारतातील ही ८ गावं अख्ख्या जगाला तोंडात बोटं घालायला लावणारी आहेत...!

‘संस्कृत’ ते ‘सोलर इंजिनीअर्स’ : भारतातील ही ८ गावं अख्ख्या जगाला तोंडात बोटं घालायला लावणारी आहेत…!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

आपल्या देशाला अतुल्य भारत म्हणून संबोधल्या जातं, कारण आपल्या देशात अनेक अद्वितीय ठिकाण, आश्चर्यकारक परंपरा आणि चाली रिती आहेत, ज्या आपण पिढ्यानपिढ्या बघत आलो आहोत. तसेच आपल्या देशात काही आगळीवेगळी गावं देखील आहेत. ज्यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

आज आपण अश्याच काही गावांबद्दल जाणून घेणारं आहोत…

काठेवाडी

 

Kathewadi-inmarathi
rediff.com

या गावाला आर्ट ऑफ लिविंगचे संस्थापक श्री श्री रविशंकर यांनी दत्तक घेतले आहे. हे गाव महाराष्ट्राच्या नांदेड जिल्ह्यात आहे. या गावाचे संस्थेने ‘मॉडेल विलेज’मध्ये रुपांतर केले आहे. या गावातील जास्तीत जास्त लोकांना दारूचे व्यसन जडलेले होते पण आज या गावात कोणीही दारू पीत नाही.

मत्तुर

 

mattur-inmarathi
voxspace.in

या गावाने आपल्या प्राचीन संस्कृती आणि सभ्यतेला आजही जपून ठेवले आहे. या गावातील प्रत्येक व्यक्ती संस्कृत भाषी आहे. या गावात लहान मुलं असतील किंवा अशिक्षित असतील, येथे सर्वजन संस्कृत भाषेतच बोलतात. येथे लोक वैदिक जीवन जगणे पसंत करतात.

या गावाला संस्कृत गावं देखील म्हटल्या जातं. येथील शाळेत लहान मुलं ५ वर्ष भाषेचा अभ्यास करतात. हे गावं बंगळूरूहून ३०० किलोमीटर दूर आहे.

तिलोनिया

 

tilonia-inmarathi
voicesatthewindow.wordpress.com

या गावातील प्रत्येक व्यक्ती ही सोलर इंजिनिअर आहे. या गावातील प्रत्येक घरावर तुम्हला सोलर पॅनल दिसतील. येथील गावकऱ्यांना शिकविण्याचं कामं संजीत रॉय यांनी केलं. येथील प्रत्येक व्यक्तीला सोलर पॅनल इंस्टॉल आणि रिपेअर करता येतं. हे गावं अजमेर येथे आहे.

रघुराजपुर

 

dailybyte.in

वर्ष २००० साली या गावाला ओडीसा राज्यातील पाहिलं हेरीटेज गावं म्हणून उपाधी मिळाली आहे. हे गावं पट्टचित्र कलेसाठी खूप प्रसिद्ध आहे.

येथील लोक ट्रायबल पेंटिंग, पेपर मेच टॉय, वुडन टॉय बनवून आपली उपजीविका भागवतात. या गावातील प्रत्येक व्यक्ती ही कलाकार आहे.

राळेगण सिद्धी

 

ralegan siddhi-inmarathi
sillyconfusion.com

हे गावं भ्रष्टाचारा विरोधात अहिंसेच्या मार्गाने लढाई लढणाऱ्या अण्णा हजारे याचं. त्यांच्याचं मेहनतीमुळे आज या गावाचे चित्रपालटले आहे. या गावात असणारी पाण्याची समस्या देखील आता नाहीशी झाली आहे.

पनामिक

 

Hot-springs-of-panamik-inmarathi
makemytrip.com

पनामिक गावं हे सियाचीन ग्लेशिअर जवळ वसत. या गावाजवळ एक गरम पाण्याचा झरा वाहतो. त्यामुळे दुरून-दुरून लोकं येथील गरम पाण्यात डुबकी मारण्यासाठी या गावाला भेट देतात.

हे गाव समुद्र तळापासून हजार फुटाच्या उंचीवर आहे. तर लेहच्या नुब्रा वॅलीपासून हे केवळ १५० मीटरच्या अंतरावर आहे.

वेळास

velas-inmarathi
maayboli.com

मुंबईपासून २३० किलोमीटर अंतरावर रत्नागिरी जिल्ह्यात वसलेलं वेळास गावं. हे गावं समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेलं आहे.

फेब्रुवारी ते एप्रिल महिन्यांदरम्यान या गावात कासवांना बघण्यासाठी दुरून-दुरून लोकं येतात. कारण या काळात समुद्रातून मोठ्या प्रमाणात मादा कासव येथे अंडी घालण्यासाठी येतात.

या जातीची एक विशिष्ट प्रवृत्ती आहे की, प्रत्येक कासव जेथे जन्म घेतो तेथेच तो अंडी देण्यासाठी एकाच वेळी एकत्र येतो.

येथील सह्याद्री निसर्ग मित्र संस्था आणि कासव मित्र मंडळ या कासवांची देखभाल करतात. यादरम्यान येथे कासव महोत्सव देखील साजरा करण्यात येतो.

तर अशी आहेत ही भारतातील आगळीवेगळी गावं, जर कधी भटकंती करण्याचं मन झालं तर गावांना नक्की भेट द्या…

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?