'सिनेस्टार्स खाजगी उदघाटने करायला का येतात या मागचं 'गणित' समजून घ्या!

सिनेस्टार्स खाजगी उदघाटने करायला का येतात या मागचं ‘गणित’ समजून घ्या!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

सेलिब्रिटी म्हटंल की पैसा आलाचं आणि त्यातही बॉलीवूड सेलिब्रिटींची तर गोष्टच न्यारी आहे. हे बॉलीवूड स्टार्स त्यांच्या एका सिनेमातून करोडोंची कमाई करतात आणि जर तो सिनेमा सुपरहिट गेला तर मग बघायलाच नको.

पण फक्त सिनेमात अभिनय करणे हाच यांच्या कमाईचा स्त्रोत नाही, तर हे स्टार्स सिनेमा व्यतिरिक्त दर्शन देण्याचे देखील पैसे घेतात. जसे की जाहिराती, इवेन्ट्स, पार्टी इत्यादी आणि बरं का ते कुठल्या फंक्शनचे किती चार्ज करतील हे मिनिटा-मिनिटांच्या हिशोबावर ठरत असतं.

हे स्टार्स केवळ जाहिराती, इवेन्ट्सच नाही तर मोठ-मोठ्या अलिशान लग्नात देखील जातात. कधीकधी त्यांना तिथे परफॉर्मन्स देण्याकरिता देखील बोलावले जाते.

 

being human event inmarathi

 

तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण हे स्टार्स त्यांच्या सोबत फोटो काढण्यासाठी देखील चार्ज करतात. यासर्वांचे ते आपल्या स्टारडम नुसार चार्जेस घेतात. हे सर्व त्यांच्या कॉन्ट्रॅक्टनुसार असतं.

प्रायव्हेट इवेन्ट मध्ये कुठल्याही सेलिब्रिटीला बोलावणे हे तुमचं स्टेटस दाखवतं. म्हणूनचं मोठमोठे उद्योगपती त्यांच्या प्रायवेट पार्टीजमध्ये या सेलिब्रिटींना बोलवतात.

तुम्हीही या सेलिब्रिटीजना तुमच्या लग्नात किंवा पार्टीमध्ये आमंत्रित करू शकता, पण त्याआधी त्यासाठी ते किती फीज घेतात यावर एकदा नजर टाकून घ्या…

१. सलमान खान :

 

salman khan inaugration inmarathi

 

सलमान खान हा पहिला असा सुपरस्टार आहे ज्याचे सलग ३ सिनेमे एकापाठोपाठ एक १०० करोड क्लब मध्ये पोचले, पण हाच सलमान प्रायव्हेट पार्टी किंवा इवेंट मध्ये जायचे किती पैसे घेतो हे तुम्हाला ठाऊक नसेल!

दबंग सलमान खान हे या लिस्टमध्ये टॉपवर बसतात, सलमान खान एका पार्टीकरिता १.५ कोटी रुपये, लग्नासाठी २ कोटी रुपये तर कुठल्याही उद्घाटनासाठी १ कोटी रुपये घेतो

२. शाहरुख खान :

 

shahrukh khan at party inmarathu

 

किंग खान शाहरुख यांची देखील इवेन्ट्ससाठी खूप मागणी असते, शाहरुख त्याच्या सिनेमांतून जेवढी कमाई करतो तेवढीच तो या इवेन्ट्स मधूनही करतो. शाहरुख एका पार्टीत जायचे २ कोटी रुपये घेतो, तर लग्न समारंभाचे तो ३ कोटी रुपयांपर्यंत आकारतो. तर इत्यादी कार्यक्रमांकरिता १.५ कोटी रुपये घेतो.

३. प्रियांका चोप्रा :

 

priyanka chopra inmarathi

 

प्रियांका चोप्रा ही तर आता इंटरनॅशनल स्टार आहे. ती कुठल्याही इवेन्टमध्ये जायचे २५ लाख रुपये घेते, लग्नासाठी १ कोटी रुपये तर इत्यादी लहान-मोठ्या कार्यक्रमांसाठी २५ लाख रुपयांपर्यंत घेते.

४. अक्षय कुमार :

 

akshay kumar inmarathi

 

अक्षय कुमार हे पार्टीकरिता १.५ कोटी रुपये, लग्नसमारंभासाठी २.५ कोटी रुपये तर उद्घाटनासाठी १.३० कोटी रुपये घेतात. तसेच जर तुम्हाला त्यांचा परफॉर्मन्स बघायचा असेल तर त्यासाठी ते २.५ कोटी रुपये घेतात.

५. कॅटरीना कैफ :

 

katrina kaif inmarathi

 

कॅटरीनाची देखील अश्या इवेन्ट्ससाठी खूप मागणी असते. त्यामुळे ती देखील यातून भरपूर कमावते, ती पार्टीमध्ये जायचे ६० लाख रुपये, लग्नसमारंभाचे १.५ कोटी रुपये, तर इतर कार्यक्रमांचे ३० लाख रुपये घेते.

६. दीपिका पादुकोण :

 

deepika inmarathi

 

दीपिका देखील तिच्या अपियरंसचे बऱ्यापैकी पैसे घेते. लग्न समारंभात स्पेशल अपियरंस सोबतच डान्स परफॉर्मन्सचे ती १ कोटी रुपये घेते तर इतर कार्यक्रमात जायचे ती २० रुपये लाख पर्यंत घेते.

७. ह्रितिक रोषन :

 

hrithik roshan inmarathi

 

यामध्ये आपला ह्रितिकही कुठे मागे नाही. ह्रितिक कुठल्याही प्रायव्हेट फंक्शन मध्ये जायचे २.५ कोटी रुपये घेतो. तर लहान-मोठ्या पार्टीजसाठी तो १.५ कोटी रुपयांपर्यंत चार्ज करतो.

८. करीना कपूर :

 

kareena kapoor inmarathi

 

करीना कपूर प्रायव्हेट पार्टीमध्ये जायचे ६० लाख रुपये तर लग्न समारंभाकरिता १.५ कोटी रुपये घेते, तसेच ती उद्घाटन कार्यक्रमांचे ३० लाख रुपये घेते.

९. सोनाक्षी सिन्हा :

 

sonakshi sinha inmarathi

 

सोनाक्षी सिन्हाचे तर वेगळेच थाट आहेत, ती कुठल्याही इवेन्ट मध्ये जायचे २५ लाख रुपये घेते पण त्यासोबतच तिला हेअरस्टाईल आणि मेकअपचे वेगळे चार्जेस द्यावे लागतात.

१०. सिद्धार्थ मल्होत्रा :

 

siddharth malhotra inmarathi 2

 

बॉलीवूड इंडस्ट्रीमधील नवीन चेहरा सिद्धार्थ मल्होत्रा, याची देखील अश्या प्रायव्हेट इवेन्ट्स करिता खूप मागणी असते. कुठल्याही इवेन्टमध्ये सामील होण्याचे तो १ तासाचे २०-२५ लाख रुपये घेतो.

११. सुष्मिता सेन :

 

sushmita sen inmarathi

 

सुष्मिता सेन भलेही आता सिनेमांत दिसत नसली तरी तिचा स्टारडम कुठेही कमी झालेला नाही. ती कुठल्याही प्रायव्हेट पार्टीत तिच्या अपियरंस करिता ३५ लाख रुपये घेते.

जर तुम्हालाही तुमच्या लग्नात किंवा पार्टीमध्ये या सेलेब्सला आमंत्रित करायचे असेल तर तुम्ही नक्की करू शकता बस त्यासाठी तुम्हाला तुमचे खिसे रिकामे करावे लागतील एवढचं…

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?