'या आहेत बॉलीवूड सेलिब्रिटींच्या "कर्तृत्ववान" बायका!

या आहेत बॉलीवूड सेलिब्रिटींच्या “कर्तृत्ववान” बायका!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

असं म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते. पण यशस्वी पुरुषांच्या पत्नी ही यशस्वी होतात. तसंच त्या स्वतःच्या पतीच्या नावाचा वापर करत नाहीत. स्वतः वेगळा व्यवसाय करतात आणि त्यात आपली छाप पाडतात.

त्या फक्त पैशासाठी या गोष्टी करतात असं नाही. तर त्यांना काहीतरी करण्याची हौस असते. त्यांनाही त्यांची स्वप्न असतात म्हणून त्या त्यांचे छंद जोपासतात त्यांना हवा तो व्यवसाय करतात.

यातल्या अनेक कर्तबगार महिलांना त्यांच्या पतीने त्यांचे कर्तुत्व बघून तर नाही ना निवडले इतक्या त्या त्यांच्या क्षेत्रात नावाजलेल्या आहेत. त्यांनी त्यांच्या क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण केली आहे.

ट्विंकल खन्ना : 

 

twinkle-khanna-inmarathi

 

अक्षय कुमारची पत्नी होण्याआधीही ट्विंकल खन्ना ही एक प्रसिद्ध अभिनेत्री तर होतीच, त्याशिवाय ती इंग्रजी वृत्तपत्रात स्तंभ लेखिका, लेखिका म्हणून कार्यरत आहे.

तसंच ट्विंकल अक्षयच्या दोन मुलांची आई देखील आहे. मागे एकदा अटक झालेल्या बाबा रामरहीमविरोधात तिने ट्विट केले होते. त्यावरून तिला राम रहीमच्या भक्तांनी धमकावले देखील होते.

त्यावेळी सुद्धा तिने या प्रसंगाला स्वतःच्या हिमतीने तोंड दिले होते.

 

मलायका अरोरा :

 

malaika arora in kaante

 

अरबाझ खान पासून विभक्त झाल्यानंतरही फिल्मइंडस्ट्रीमध्ये मलायकाचं नाव चर्चेत असतं. ती एक उत्कृष्ट डान्सर, अभिनेत्री आहे. याशिवाय तिने तिच्या करिअरची सुरवात व्हिजे म्हणून केली होती. आज मलायकाला आज १८ वर्षांचा मुलगा आहे. तिच्याकडे बघून विश्वास बसतो का ?

 

श्रीदेवी :

 

English vinglish shridevi sridevi inmarathi

 

चित्रपट निर्माते बोनी कपूर यांची पत्नी होण्याआधी ही श्रीदेवी या सिनेअभिनेत्री होत्या. एक उत्तम अभिनेत्री म्हणून त्यांनी मोठं नाव कमावलं. बोनी कपूरशी लग्नहोण्यापूर्वी त्या अभिनेता मिथून चक्रवर्ती यांच्या पत्नी होत्या.

काही वर्षांपूर्वी आलेल्या इंग्लीश विंग्लीश चित्रपटात त्यांनी उल्लेखनीय भुमिका केली होती. मात्र त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अर्थात, त्यांनी त्यांच्या अभिनयाच्या जोरावर त्यांची एक वेगळी छाप पाडली होती.

 

गौरी खान :

 

gauri-khan-inmarathi

 

गौरी खान ही किंग खान म्हणजेच शाहरूख खानच्या तीन मुलांची आई आहे. तसेच तिचा स्वतःचा इंटिरिअर डिझाईनचा बिझनेस असून ती शाहरूखच्या रेड चिली प्रोडक्शनची प्रोड्यूसर देखील आहे.

 

मेहेर जेसिया :

 

arjun-meher-inmarathi

 

अर्जून रामपाल याच्यासोबत विवाहबंधनात अडकण्यापूर्वी मेहेरची आपली स्वतःची ओळख आहे. ती एक यशस्वी सुपर मॉडेल तर आहेच, त्याशिवाय तिने १९८० साली फेमिना मिस इंडिया किताबही जिंकला होता. सध्या मेहर दोन मुलींची आई आहे.

 

किरण राव :

 

kiran-rao-inmarathi

 

मिस्टर परफेक्शनिस्ट ची पत्नी किरण राव ही स्वतः चित्रपट दिग्दर्शक आहे. धोबीघाट हा तिने दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट होय.

एका चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानच किरण आणि आमीरची ओळख झाली. पुढे दोघे विवाह बंधनात अडकले. त्यांना आझाद नावाचा एक मुलगा आहे.

 

सुझॅन खान :

 

susane-khan-inmarathi

 

कधी काळी अभिनेता हृतिक रोशनची पत्नी असलेली सुझॅन स्वतःचा इंटिरीअर डिझायनींगचा व्यवसाय करते. तिच्या कंपनीचे नाव आहे चारकोल प्रोजेक्ट… या कंपनीचे काम सध्या व्यवस्थित सुरू आहे. चित्रपट आणि फेम यांपासून ती जरा दूरच असते.

तर अश्या या सेलिब्रिटींच्या बायका केवळ “Celebrity Wives” म्हणूनच नाही ओळखल्या जात तर त्यांची स्वतःची स्वतंत्र अशी एक ओळख आहे. जी त्यांनी त्यांच्या कर्तुत्वाने कमावली आहे. 

स्वतःची वेगळी ओळख निर्माण करून त्यांनी त्यांचे उत्तम कर्तृत्व सिद्ध केले आहे. आज प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रगती करणाऱ्या स्त्रियांनी यांच्या कर्तृत्वाचा आदर्श घेण्यास काहीच हरकत नाही.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?