' तुम्ही सुद्धा सेल्फी अॅडिक्ट असाल तर हे "चुकलेले" २० सेल्फी लक्षात ठेवा आणि फजिती टाळा!

तुम्ही सुद्धा सेल्फी अॅडिक्ट असाल तर हे “चुकलेले” २० सेल्फी लक्षात ठेवा आणि फजिती टाळा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

आजकाल सेल्फी काढण्याचे वेड सगळीकडेच दिसून येते. तरुण पिढीतर प्रत्येक गोष्ट आज आजकाल बोलून नाही तर सेल्फी काढून लोकांना दाखवते.

तुम्ही काय करत आहात, असे जरी एखाद्याने विचारले तरीपण हे लोक त्याबद्दल सेल्फी काढून त्याला पाठवतात. फेसबुक, व्हाट्सअॅप यांसारख्या सोशल मिडियामुळे तर सहज हे सेल्फी कोणालाही पाठवता येतात.

त्यामुळे सेल्फींचे महत्त्व अजूनच वाढत चालले आहेत.

 

selfie inmarathi
indianexpress.com

 

या सेल्फींमुळे काही लोकांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे. त्यामुळे आपल्याला सेल्फी घेताना सावधपणा बाळगणे गरजेचे आहे.

पण हे देखील तेवढेच खरे आहे की, आपण आपला फोटो जेवढा चांगला काढू शकतो, तेवढा कोणीच काढू शकत नाही.

पण आपण सेल्फी काढताना तो कसा दिसतोय आणि आपल्या पाठीमागे म्हणजेच background मध्ये काही अनावश्यक गोष्टी तर येत नाही आहेत ना ? हे तपासणे देखील तेवढेच गरजेचे आहे. का विचारताय…?

तर आज आम्ही तुम्हाला काही असे सेल्फी दाखवणार आहोत, जे पाहून तुमचे हसू थांबणार नाही आणि त्यासोबतच तुम्ही तुमचे सेल्फी देखील एकदातरी नक्कीच तपासून पाहाल. चला तर मग पाहूयात हे काही विचित्र सेल्फी…

 

Funny Selfie's.Inmarathi1

 

सेल्फी काढताना जरा मागे पहायचे तरी, तुमचा पाळलेला कुत्रा काय उद्योग करतोय ते..

 

Funny Selfie's.Inmarathi

 

फोटो काढताना त्या मागे झोपलेल्याचा तरी विचार करायचा, त्याला कसे वाटेल हा फोटो पाहिल्यावर. पण कदाचित या खोडकर मुलांनी जाणूनबुजून हा फोटो काढलाय असचं वाटत… नाही का?

 

Funny Selfie's.Inmarathi2

 

तुम्ही फक्त फोटो काढताय, मग त्या बिचाऱ्याला पण घ्या की फोटोमध्ये…

 

Funny Selfie's.Inmarathi7

 

बाथरूममध्ये सेल्फी काढण्यात काय पॉईंट असेलं. बरं, जर अशा ठिकाणी सेल्फी काढताय किमान आपल्या आजूबाजूला काय चाललय हे तरी पाहायचे..

 

Funny Selfie's.Inmarathi3

 

मागे उभ्या असलेल्या त्या मुलीला यांचे असे वागणे जराही पटलेले दिसत नाही आहे…

 

 

सर्वात भारी पोज, यांची नाही तर मागे असलेल्या कुत्र्याची…

 

Funny Selfie's.Inmarathi5

 

सेल्फी काढण्याआधी त्याला नीट तोंड तरी धुवू दे...

 

Funny Selfie's.Inmarathi9

 

अरे ती जखम नंतर दाखव आधी मागे आरशात काय दिसत आहे ते बघ जरा…

 

Funny Selfie's.Inmarathi10

 

ह्या फोटो काढण्यात आणि आईस्क्रीम खाण्यात एवढ्या मग्न झाल्या आहेत की, घरातील एवढा पसारा देखील त्यांना दिसत नाही आहे.

 

Funny Selfie's.Inmarathi11

 

पाठीमागे असलेल्या आरशाने सर्व सत्य उघड केले आहे.

 

Funny Selfie's.Inmarathi12

 

फोटो काढायच्या आधी तिला सांगायचे तरी, म्हणजे तिला नाक तरी साफ करता आले असते.

 

Funny Selfie's.Inmarathi34jpeg

 

जरा जपून सेल्फी काढा नाहीतर, असे काही करताना आईने पकडले तर तुमचे काही खरे नाही…

 

Funny Selfie's.Inmarathi8

 

अरे तुमच्या मागील माणूस काय करतोय…

 

Funny Selfie's.Inmarathi13

 

“Bae caught me sleeping”… अग बाई जरा डोळे उघडून बघ तरी.. तुझ्या मागे असणाऱ्या आरशाने सर्व काही सांगून टाकलंय आता खोट बोलून काही अर्थ नाही…

 

Funny Selfie's.Inmarathi14

 

फोटो काढण्याच्या नादात पँट घालायचा विसरला वाटत हा..

 

Funny Selfie's.Inmarathi15

 

आपल्या नावाचा उलट कसं दिसत आणि त्याचा काय अर्थ होतो,  हे फोटो काढण्याआधीचं समजून घ्या, नाहीतर हिच्यासारखं व्हायचे..

 

Funny Selfie's.Inmarathi18

 

परत एकदा “Girlfriend caught me sleeping”… आपल्या घरातले आरसे देखील आपल्याला माहित नसतात का ? आणि एफर्ट्स तर बघा यांचे, खरंच मानले पाहिजे…

 

Funny Selfie's.Inmarathi19

 

त्याला भिंतीला धरून उभं राहण्याची शिक्षा दिली आहे वाटत, पण आधी पॅण्ट तर नीट घालू द्यायची होती..

 

Funny Selfie's.Inmarathi20

 

बघा स्वतः एवढे टापटीप राहतात आणि घरात घाण करून ठेवतात आणि बिंधास फोटो देखील काढतात. याला म्हणतात हाय- क्लास…

अश्या या सेल्फी खूपच मजेशीर आणि हसून लोटपोट करणाऱ्या आहेत. त्यामुळे सेल्फी काढताना नक्की दोनदा आजूबाजूला लक्ष द्या, नाहीतर तुमचे देखील असेच हसे होईल..

छायाचित्रांचा स्त्रोत : wittyfeed.me

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?