ह्या गेंड्याचा चेहरा अनेकांना उदास वाटतोय, त्यामागे एक चिंताजनक कारण आहे!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

मनावाने तंत्रज्ञानाच्या जोरावर आज मंगळापर्यंत मजल मारली आहे. तसेच पृथ्वीचे आधीचे  आणि आताचे स्वरूप यातही आपल्याला तंत्रज्ञान आणि त्याचा वापर दिसून येतो. आधी पृथ्वीवर केवळ समुद्र, नद्या, जंगल, वाल्वंत इत्यादी सर्व होत. पण आज त्या जागी मोठमोठ्या इमारती, डोंगर पोखरून केलेले बोगदे, समुद्र बुजवून उभारलेल्या इमारती, जंगल उध्वस्त करून बनवलेली शहरं इत्यादी दिसत.

नक्कीच हे सर्व मानवाने आपल्या सुखसोयीसाठीचं केलं, जेणेकरून जीवन जगणे अधिक आरामदायी होईल. पण यात आपण त्या प्राण्यांना विसरलो ज्यांचे संवर्धन आपल्याला करायला हवे. त्यामुळेच की काय तर आज पृथ्वीवरील अनेक प्राण्यांच्या जाती लुप्त झाल्या आहेत तर अर्ध्याहून अधिक लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. सध्या याचीच जाणीव करवून देणारा एक फोटो सोशल मिडीयावर खूप वायरल होत आहे.

 

last-male-raino-sudan-inmarathi

 

वरील फोटो हा शेवटच्या नार्दन व्हाईट राईनो म्हणजेच गेंड्याचा आहे. या गेंड्याचं नाव आहे ‘सुडान’.

हा केनिया येथील एका वनक्षेत्रात दोन मादा गेंड्यासोबत राहतो आहे. त्याची ही फोटो ट्विटर वर पोस्ट करण्यात आली होती ज्यानंतर ती खूप वायरल झाली.

 

sudan-inmarathi01

 

‘सुडान’ याआधी देखील चर्चेत राहिलेला आहे जेव्हा लुप्त होणाऱ्या या प्रजातीसाठी फंड जमा करण्याच्या उद्धेशाने डेटिंग साईट टिंडरने एक जाहिरात काढली होती. याच्या काही महिन्यातच जीवविज्ञानी देनिल श्नाइडर यांनी सुडानचा एक मार्मिक फोटो ट्विटर वर पोस्ट केला.

 

sudan-inmarathi02

 

या फोटो ला पोस्ट करत जीवविज्ञानी डेनिल श्नाइडर यांनी लिहिले होते की,

“लुप्त होणे काय असत माहित करून घ्यायचं आहे? हा शेवटचा नर नार्दन व्हाईट राईनो आहे. शेवटचा.”

त्यांचा या ट्वीटवर ३६,००० वेळा रीट्वीट करण्यात आले आहे, तर १००० पेक्षा अधिक लोकांनी यावर शोक व्यक्त केला आहे.

 

sudan-inmarathi

 

आकड्यांचा विचार केला तर १९६० पर्यंत या जातीचे २००० हून जास्त गेंडे जिवंत होते. तर  १९८४ मध्ये केवळ १५ उरले होते आणि आज त्यापैकी केवळ ५ उरले आहेत, ज्यापैकी सुडान हा एकटा नर आहे. पण ४३ वर्षांचा सुडान आता वृद्ध झाला आहे, त्याची प्रजाती वाढविण्यात तो सक्षम नाही. म्हणजेच लवकरच आता ही प्रजाती देखील नामशेष होणार, असेच म्हणायला हवे.

रिपोर्टनुसार, एकट्या दक्षिण आफ्रिकेत शिकारींनी मागील काही वर्षांत १,२१५ गेंड्यांना मारले होते. गेंड्यांच्या शिंगाची बाजारात खूप मागणी आहे, एका वयस्क गेंड्याच्या शिंगाच वजन १-४ किलो असते आणि याची किंमत ७५ हजार प्रतीकिलोग्राम असते. तर व्हिएतनाम येथे असे मानल्या जाते की, गेंड्याच्या शिंगामुळे कॅन्सरचा आजार बरा होऊ शकतो. हेच कारण आहे, काळाबाजारात या शिंगांची खूप मागणी आहे. तर याची किंमत १००,१०० डॉलर पर्यंत पोहोचली आहे.

आपण विकासाच्या मार्गावर एवढ्या वेगात जातो की, अश्या प्रकारच्या कितीतरी गोष्टी मागे पडत आहे. कारण आपण हे विसरलो आहोत की पृथ्वीवरील जीवसृष्टी ही एकमेकांवर अवलंबून आहे. जर आपण हा समतोल राखू शकलो नाही, तर एकेदिवशी मानव जाती देखील लुप्त होईल आणि त्याला जबाबदार हा मनुष्यच असेल.

इमेज स्त्रोत : dailymail

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?