' विराट कोहलीचा साईड बिझनेस!

विराट कोहलीचा साईड बिझनेस!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन विराट कोहली.. आज क्रिकेट जगतात याने एक वेगळच शिखर गाठलं आहे. खूप कमी वेळात तो इंडिअन क्रिकेट टीममधील सर्वात प्रसिद्ध खेळाडू बनला आहे. त्याचे चर्चे हे केवळ क्रिकेट पुरतेच सीमित नाहीत तर इतर कुठल्या ना कुठल्या कारणाने तो नेहमी चर्चेत असतो. कधी त्याच्या फिटनेसमुळे तर कधी अनुष्का सोबतच्या त्याच्या मैत्रीमुळे. पण आपला हा ‘चिकू’ आजच्या तरुण पिढीचा आयडॉल बनलाय आणि हे सर्व त्याने स्वतःच्या शैलीने कमवल आहे. त्याने क्रिकेट जगतातील अनेक रेकॉर्ड्स आपल्या नावे केले आहे. आज जगातील मोठ मोठे खेळाडू त्याची प्रशंसा करतात.

 

virat-kohali-inmarathi01
mensxp.com

तस तर विराट क्रिकेट खेळण्याव्यतिरिक्त जाहिराती, प्रमोशन्स, इवेन्ट्स देखील करतो. पण त्यासोबतच तो सोशल मिडीयावर देखील तेवढाच अॅक्टीव्ह असतो. तो नियमितपणे त्याचे फिटनेस विडीओज, त्याचे फोटोज सोशल मिडीयाच्या माध्यमातून आपल्या फॅन्सपर्यंत पोहोचवत असतो. क्रिकेटच्या पीच वर राज करणारा विराट सोशल मिडीयावर देखील राज करतो असे म्हटल्यास वावग वाटायला नको.

 

Good win and good knock by Shikhi D. 😎👌 @shikhardofficial

A post shared by Virat Kohli (@virat.kohli) on


‘फोर्ब्स’च्या रिपोर्टनुसार कॅप्टन विराट कोहली हा भारतातील सर्वात जास्त कमाई करणारा क्रिकेटर बनलाय. म्हणजे विराटने क्रिकेटमध्येच नाही तर कमाईच्या बाबतीतही सर्वांना मागे टाकले आहे. सध्या अशी चर्चा आहे की, विराट हा केवळ ऑफलाईन नाही तर ऑनलाईन देखील कमावतो आहे. सोशल मिडियाद्वारे तो खूप पैसा बनवतो आहे. तसेच सोशल मिडीयावर विराटने आपल्या ब्रान्डला प्रमोट करावे म्हणून अनेक कंपन्या देखील त्याच्यावर पैसे लुटवत आहेत.

 


विराट हा इन्स्टाग्रामवर खूप अॅक्टीव्ह असतो. यामुळेच तो खूप पैसा कमवत असल्याच सांगितल्या जात आहे. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, इन्स्टाग्राम वर विराटचे १.६५ कोटी फॉलोअर्स आहेत.

 

Back to the grind again. 🏋️🏏

A post shared by Virat Kohli (@virat.kohli) on


मिडीयाच्या रिपोर्ट्सनुसार इन्स्टाग्रामवर एका पोस्टसाठी विराटला ३.२० कोटी देण्यात येतात. पण आता ही रिपोर्ट किती खरी आहे हे अजून कळालेले नाही. पण आपल्या विराटची फॅन फॉलोइंगच एवढी आहे, की ही बातमी खरी देखील असू शकते.

तरी त्याने आजवर केलेली मेहनत आणि मिळविलेल यश यामुळे तो हे डिझर्व नक्कीच करतो. तुम्हाला काय वाटत?  

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?