पद्मश्री सितारा देवी : ज्यांचा जन्मताच त्यांच्या कुटुंबाने केला होता तिरस्कार…

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

गुगल नेहमी आपल्या होमपेजवर रोज दिनविशेषचे डूडल टाकत असतो. यात ख्यातनाम व्यक्ती, शोध इत्यादी बद्दलचे डूडल असतात. ८ नोव्हेंबरला देखील गुगल ने असेच एक डूडल टाकले आहे. हे डूडल एका अश्या स्त्रीचे आहे जिने आपल्या बळावर यशाचे शिखर गाठले. ह्या स्त्री म्हणजे सितारा देवी, आज त्यांचा जन्मदिवस आहे.

 

sitara devi-inmarathi
Google

सितारा देवी या भारताच्या प्रसिद्ध कत्थक नृत्यांगना होत्या. त्यांचा जन्म १९२० साली ८ नोव्हेंबरला धनतेरसच्या दिवशी झाला होता. त्यामुळे त्याचं नाव धनलक्ष्मी ठेवण्यात आले होते. त्या वाराणसीच्या एका ब्राह्मण कुटुंबात जन्माला आल्या होत्या.

 

sitara devi-inmarathi02
magnamags.com

त्यांना नेहेमी त्यांच्या आई-वडिलांच्या प्रेमापासून वंचित राहावे लागले होते कारण त्यांचा चेहरा हा सामान्य लोकांच्या चेहऱ्यापेक्षा जरा वेगळा होता. हेच कारण होत की त्यांच्या पालकांनी त्यांना स्वतःपासून दूर केल. त्याचं तोंड वाकड असल्याकारणाने त्यांच्या आई-वडिलांनी घाबरून त्यांना एका आयाला सोपवले. या आयानेच त्याचं पालनपोषण केल. त्या वेळेच्या परंपरेनुसार त्या ८ वर्षांच्या असतानाच त्यांचा विवाह करण्यात आला. त्यांना शाळेत जायचे होते, शिक्षण पूर्ण करायचे होते पण त्यांच्या सासरच्यांना हे मंजूर नव्हते म्हणून त्यांचे लग्न तुटले. त्यानंतर कामछगढ येथील शाळेत त्यांना दाखल करण्यात आलं.

 

sitara devi-inmarathi06
ibtimes.co.in

तिथे त्यांनी आपल्या नृत्याचे उत्कृष्ट प्रदर्शन करत सत्यवान आणि सावित्री या पौराणिक कथेवर आधारित एका नृत्य नाटकात भूमिका मिळविली तसेच शाळेतील इतर सहविद्यार्थ्यांना नृत्य शिकविण्याच उत्तरदायित्व देखील स्वीकारलं.

 

sitara devi-inmarathi07
indianetzone.com

तस तर त्याचं नाव धनलक्ष्मी उर्फ धन्नो ठेवण्यात आल होत पण, एकदा त्यांच्या नृत्य प्रदर्शनाची बातमी पेपरमध्ये छापून आली ज्याची हेडलाईन होती की,

‘एक बालिका धन्नो ने आपल्या नृत्याने सर्व दर्शकांना आश्चर्यचकित केलं’.

या बातमीला त्यांच्या कुटुंबाने देखील वाचले त्यानंतर त्यांच्या कुटुंबाने त्यांना स्वीकारले. त्यानंतर त्याचं नाव सितारा देवी ठेवण्यात आलं.

 

sitara devi-inmarathi03
filmibeat.com

सितारा देवी यांनी शंभू महाराज आणि पंडित बिरजू महाराज यांचे पिता अच्छन महाराज यांच्याकडून नृत्याचे प्रशिक्षण घेतले. दहा वर्षांच्या होत पर्यंत त्या एकल नृत्य प्रदर्शन करायच्या. त्या त्यांच्या वडिलांच्या चित्रपटगृहात चित्रपटाच्या इंटरवलमध्ये आपला कार्यक्रम प्रस्तुत करायच्या.

नृत्यामुळे त्यांनी त्यांची शाळा देखील सोडली आणि त्या ११ वर्षांच्या असताना त्यांच्या कुटुंबासोबत त्या मुंबईला आल्या. मुंबईत जहांगीर हॉल मध्ये त्यांनी पहिल्यांदा त्यांच्या नृत्याचे प्रदर्शन केले. इथनचं कत्थकला जगभरात प्रसिद्ध करण्याच्या आपल्या ध्येयाकडे त्यांनी पाउल टाकले.

 

sitara devi-inmarathi04
bargad.org

 

सितारा देवी यांनी अनेक बॉलीवूड अभिनेत्रींना नृत्याचे प्रशिक्षण दिले. तसेच त्यांनीं काही चित्रपटांत देखील काम केल पण नृत्याच्या प्रेमापायी त्यांनी चित्रपट करण्यास नकार दिला. त्यांनी शहर का जादू (1934), जजमेंट ऑफ अल्लाह (1935), नगीना, बागबान, वतन (1938), मेरी आंखें (1939) होली, पागल, स्वामी (1941), रोटी (1942), चांद (1944), लेख (1949), हलचल (1950) और मदर इंडिया (1957) इत्यादी चित्रपटांत काम केल.

 

sitara devi-inmarathi05

 

सितारा देवी यांना संगीत नाटक अकादमी सन्मान १९६९ साली देण्यात आला. त्यानंतर त्यांना १९७५ साली पद्मश्री सन्मानाने देखील पुरस्कृत करण्यात आले. १९९४मध्ये त्यांना कालिदास सन्मान देण्यात आला. त्यांना पद्म भूषण पुरस्कार देण्यात येणार असल्याचही घोषणा सरकारने केली, मात्र सितारा देवींनी तो घेण्यास नकार दिला. त्यांनी तीनदा हा पुरस्कार घेण्यास नकार दिला. त्यांचे म्हणणे होते की,

सरकारला माझ्या योगदानाबद्दल कदाचित माहित नाही, हा माझ्यासाठी सन्मान नाही तर अपमान आहे. मी कुठला पुरस्कार घेईल तर तो ‘भारत रत्न’.

तर १६ वर्षाच्या वयात यांच्या नृत्याचे प्रदर्शन बघून चकित झालेल्या गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी त्यांना नृत्य सम्राज्ञी ही उपाधी दिली होती.

अश्या या प्रेरणादायी सितारा देवी यांचा मृत्यू २५ नोव्हेंबर २०१४ ला मुंबई येथे झाला.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

One thought on “पद्मश्री सितारा देवी : ज्यांचा जन्मताच त्यांच्या कुटुंबाने केला होता तिरस्कार…

  • June 14, 2019 at 2:15 pm
    Permalink

    सितारा देवीला पद्मभूषण पुरस्कार मिळाला होता का?

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?