' भक्त गणांनी ह्या ८ प्रकारे “नोटबंदी” चा धर्मच करून टाकलाय! – InMarathi

भक्त गणांनी ह्या ८ प्रकारे “नोटबंदी” चा धर्मच करून टाकलाय!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

फेसबुकवर अनेक विचारप्रवाह आणि त्या विचार प्रवाहांचे मावळे बागडत असतात. ह्या विचारप्रवाहात, अर्थातच, पक्ष भक्त सर्वाधिक संख्येने आहेत. त्यात प्रत्येक पक्ष मोठ्या प्रमाणावर आपापलं बळ वाढवण्याचा प्रयत्न करतोय. दुसरा प्रकार आहे सामाजिक-राजकीय विचारसरणींचा. मग ह्यात डावे-उजवे-समाजवादी-सर्वोदयी असे बरेच आहेत. त्यात आंबेडकरवाद, हिंदुत्ववाद ह्या प्रकारांचाही अंतर्भाव होतो. शेवटचा मोठा प्रकार आहे – आस्तिक-नास्तिकांचा! जगभरात जो ट्रेण्ड दिसतोय…तोच फेसबुकवरही आहे – नास्तिकांचा आवाज बुलंद होतोय!

समाजातील अनिष्ट रूढी, धर्माच्या नावाने चालणारी फसवणूक, लबाडी ह्या सर्वांवर उपाय म्हणजे धर्म-उच्छेद, सर्व धर्माचं विसर्जन…असा विद्रोही झेंडा घेऊन वावरणारे अनेक सैनिक फेसबुकवर आहेत. त्यांतील एक म्हणजे कौस्तुभ इटकूरकर. त्यांनी धर्म-धार्मिक भक्त आणि नोटबंदी-नोटबंदी भक्त ह्यांची सांगड घालून – नोटबंदी कशी “धर्म” बनू पाहातीये ह्याची खुमासदार पोस्ट फेसबुकवर लिहिली आहे. मूळ पोस्ट इंग्लिश आहे –

पोस्टचा स्क्रिनशॉट :

 

demonetisation is becoming a religion

 

तुम्हाला नोटबंदी आवडत असो वा नसो – कौस्तुभच्या ह्या पोस्टला दाद नक्की द्याल! पोस्टचे मुद्दे सोप्या मराठीत असे –

नोटबंदी ही धर्म बनू पहातीये – ही पहा ८ लक्षणं –

१ – Followers think it works when there’s just no evidence that it does.

कुठलाही पुरावा नसताना भक्तांना असं वाटतं की, त्याचा फायदा होतोय !

“देव” ही संकल्पना धर्माच्या व्यवस्थेचा आधार असते. धार्मिक लोक देवाच्या अस्तित्वाचा कोणताही शास्त्रीय पुरावा नसताना देव आहे किंवा आमचाच देव खरा आहे असं मानून चालणारे असतात.

नोटबंदी समर्थकसुद्धा, ह्या निर्णयाचा कोणताही लाभ झालेला दिसत नसताना – ती कशी फायदेशीर आहे हे सांगत असतात!

 

२ – It’s that ‘long term promise’ which keeps ’em going.

भविष्यात फळ मिळेल, ह्या आशेने हे लोक धावत रहातात!

धर्माचे प्रिन्सिपल्स हे सांगतात की, लगेच फळ मिळत नाही. साधना करत रहावी लागते. तप करावा लागतो. मग ईश्वराची कृपादृष्टी होते.

अगदी हेच नोटबंदी समर्थक म्हणतात – थांबा! वेळ लागेल…! फळ भविष्यात मिळेल…!

दाखवा बाबा पुरावे…आम्ही वाट बघतोय…!

३ – Remember idea is always pure? It’s only the implementation that’s corrupt.

मूळ संकल्पना उत्कृष्ट आहे हो! – “फक्त अंमलबजावणी हुकली!”

प्रत्येक धर्म प्रिय व्यक्ती हे बोलतच…! “सर्व धर्म चांगलेच असतात! लोक, बाबा-मौलवी-पाद्री त्याची अंमलबजावणी धड करत नाहीत…हा प्रॉब्लम आहे बघा…!”

नोट बंदी समर्थक गेले ९ महिने हेच म्हणताहेत…!

 

 

४ – Everybody thinks ‘they’ haven’t understood it well enough.

“प्रत्येक “विरोधकाला” खरा अर्थ समजलाच नाहीये!”

 

जसं प्रत्येक धर्मप्रिय माणूस इतर धर्माच्या लोकांना आणि नास्तिकांना असं म्हणत असतो की, “तुम्हाला खरा अर्थ समजलाच नाही” अगदी तसंच नोट बंदी समर्थक, टीकाकारांना म्हणत आहेत…!

५ – Skeptics talk more about it’s nuances than followers themselves.

धार्मिकांपेक्षा विरोधकच त्याच्या धोक्याबद्दल अधिक चर्चा करतात…!

धार्मिक प्रथा-अंधश्रद्धा पाळणारे, हेच खरे पीडित असतात. नुकसान त्यांचच होत असतं. पण तरीही ते ह्या विषयावर कमी बोलतात…! जे लोक विरोधक आहेत, ज्यांना त्या अंधश्रद्धांचा प्रत्यक्ष त्रास होत नाही…तेच हिरीरीने विरोध करतात…! नोट बंदीच्या बाबतीत विरोधकांचाच जोर अधिक आहे…! खरं तर, समर्थकांना हा निर्णय खरंच यशस्वी व्हायला हवा असेल तर त्यांनी संभाव्य धोक्यांवर चर्चा करून ते टाळता कसे येतील ह्याकडे लक्ष द्यायला हवं. पण तसं घडत नाहीये…!

असं का होतं हा मोठ्या चिंतनाचा विषय ठरू शकेल…!

पुढचे दोन मुद्दे self explanatory आहेत…

६ – Moderates try to pick and choose arguably ‘good parts’ from it.

मध्यममार्गी (ज्यांना फेसबुकवर तटस्थ म्हटलं जातं 😉 ) लोक बरोब्बर “चांगले मुद्दे”च निवडतात…! आणि सोयीस्करपणे टीका टाळतात!

 

 

७ – Followers get so creative that it’s come to mean to be a different thing altogether than originally conceived.

समर्थक इतके नवनवे कल्पक मुद्दे समोर आणतात की ज्या मुद्यावर, मरणासाठी मूळ गोष्ट – धर्म असो वा नोटबंदी – सुरू झाली होती – तो मुद्दा, ती कारणंच बदलून टाकली जातात…!

 

 

 

आणि शेवटचा…

This is The Best…

८ – And there’s a prophet of course!

…आणि कुणीतरी प्रेषित, मसीहा, सुपर हिरो असतो…!

प्रत्येक धर्माचे देव, प्रेषित, सर्व शक्तिमान असे श्रद्धास्थानं असतात.

नोटबंदी समर्थकांचे ही आहेत…

दि वन अँड ओन्ली…

 

modi-marathipizza01
indianexpress.com

 

ह्या पोस्टमध्ये कौस्तुभने सांगितलेली “धार्मिक” मंडळींची लक्षणं अगदी तंतोतंत बरोबर आहेत आणि – नोटबंदी विषयावर जेवढं लिहिलं आणि बोललं गेलंय, त्या सर्वांवर नजर टाकता वरील आठही लक्षणं नोटबंदी आणि नोटबंदी समर्थकांवर चपखल लागू पडतात…!

तुम्ही नोटबंदी समर्थक असा अथवा नसा, धार्मिक असा वा नसा – ही पोस्ट पटल्याशिवाय रहात नाही…!

खरंय ना? 😀

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Omkar Dabhadkar

Founder@ इनमराठी.कॉम

omkar has 167 posts and counting.See all posts by omkar

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?