' हे एखाद्या आलिशान बंगल्याचे फोटो वाटतात ना? पण हा बंगला किंवा घर नाहीये!

हे एखाद्या आलिशान बंगल्याचे फोटो वाटतात ना? पण हा बंगला किंवा घर नाहीये!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

आपल्या सर्वांना फिरायला जायला खूप आवडते. ज्यांना प्रवास आवडत नाही, अशी खूप कमीच लोक असतात, कारण त्यांना गाडीचे ते वातावरण आवडत नाही. त्यामुळे ते घरीच राहणे पसंत करतात. मग अश्या लोकांसाठी खास आज आम्ही एका अश्या गाडीबद्दल सांगणार आहोत, ज्यामधून प्रवस करताना तुम्हाला वाटणार देखील नाही की, तुम्ही तुमच्या घरातून बाहेर आला आहात. घरामध्ये असलेल्या बेडसारखाच आरामदायी बेड तुम्हाला या गाडीमध्ये देखील मिळणार आहे. जर्मनीची कंपनी वोल्क्नेर मोबिल्स ही मोटरहोम्स बनवण्यासाठी ओळखली जाते. मोटरहोम्स म्हणजे एक अशी गाडी जीला तुम्ही चालते – फिरते लक्झरी घर म्हणू शकता. हिची खास गोष्ट ही आहे की, बॉलीवूड आणि हॉलीवूड स्टार्सद्वारे वापरण्यात येणाऱ्या व्हॅनिटी व्हॅनपेक्षा ही गाडी खूपच वेगळी आहे. वोल्क्नेर मोबिल्स या कंपनीने काही दिवसांपूर्वीच अजून एक मोटरहोम लाँच केली आहे.

या मोटरहोम गाडीचे नाव परफॉर्मन्स एस आहे. चला तर मग जाणून घेऊया, या मोटरहोमची वेगवेगळी वैशिष्टये छायाचित्रांच्या सहाय्याने…

 

Motorhome.Inmarathi

 

या गाडीच्या आतमध्ये पंचतारांकित हॉटेलसारखे वातावरण आहे आणि हे हॉटेल तुम्ही तुमच्या सोयीनुसार पार्क करू शकता.

 

Motorhome.Inmarathi1

 

या मोटरहोममध्ये आराम करण्यासाठी एक खास डबल बेड आहे. त्यामुळे प्रवास करतोय, असे जाणवणार नाही.

 

Motorhome.Inmarathi2

 

या ४० फूट लांब असलेल्या गाडीमध्ये एक किचन, एक मोठा लाउंज एरिया आणि एक सुंदर असे बाथरूम आहे.

 

Motorhome.Inmarathi3

 

Motorhome.Inmarathi4

 

या गाडीच्या चालकाला, ही गाडी चालवताना देखील खूप मज्जा येणार आहे, कारण यात सिस्टम खूप प्रगत आहे.

 

Motorhome.Inmarathi5

 

या प्रशस्त लाँजमध्ये बसल्यावर तुमचा सर्व थकवा निघून जाईल.

 

Motorhome.Inmarathi6

 

याव्यतिरिक्त या गाडीमध्ये एक इलेक्ट्रोहायड्रोलिक लिफ्ट देखील आहे आणि यामध्ये फेरारीपासून बीएमडब्ल्यूपर्यंत सर्व प्रकारच्या गाड्या बसू शकतात.

परफॉर्मन्स एस या गाडीला कुठेही घेऊन जाऊ शकता. तुम्हाला बेडवरून न उठताच तुमच्या आवडत्या ठिकाणी जायचे असेल, तर गाडी खास तुमच्यासाठी बनली आहे. फक्त त्यासाठी तुमच्याकडे २ मिलियन डॉलर्स म्हणजेच जवळपास १२ कोटी रुपये असणे गरजेचे आहेत.

Yes – या गाडीची किंमत १२ कोटी रुपये आहे…! 😀

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?