' मनमोहन सिंगांच्या काळात दारिद्र्य कमी होण्यामागचं खरं कारण होते – अटल बिहारी वाजपेयी! – InMarathi

मनमोहन सिंगांच्या काळात दारिद्र्य कमी होण्यामागचं खरं कारण होते – अटल बिहारी वाजपेयी!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

आपल्या भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे जगभरात “मानले जाणारे” अर्थतज्ञ आहेत. त्यांच्या पंतप्रधानपदाच्या कालखंडाचे २ भाग पडतात – UPA १ आणि २. UPA १ च्या काळात गरिबीचा दर खूप कमी झाला होता हे विविध आकड्यांद्वारे नेहेमीच स्पष्ट झालेलं आहे.

मनमोहन यांच्या पहिल्या सत्रामध्ये गरिबी निर्मूलनाचा कल वाढत गेला होता.

मनमोहन सिंगांनी हे कसं घडवून आणलं?

क्वोरा वर प्रसिद्ध लेखक बालाजी विश्वनाथ ह्यांनी “How did Manmohan Singh’s government achieve the highest poverty reduction in India?” ह्या प्रश्नावर दिलेल्या उत्तराचं स्वैर भाषांतर. मूळ इंग्रजी उत्तर इथे क्लिक करून वाचू शकता.

===

१९९० च्या उदारीकारानंतर भारतातील गरिबीचे प्रमाण कमी झाले होते. १९९० मध्ये आपल्या एकूण लोकसंख्येच्या अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या ही गरीब होती. २००४ मध्ये ही संख्या ३७ टक्क्यांवर आली आणि २०११ पर्यंत ती २१ टक्क्यांवर आली.

 

Reduce Poverty Rate.Inmarathi
newstrack.com

खरंतरं, याच कारणामुळे मनमोहन सिंग यांचं सरकार UPA २ च्या रूपात पुन्हा सत्तेत आलं. कारण त्यांनी पहिल्या सत्रात खूप चांगली कामगिरी करून दाखवली होती. आंतरराष्ट्रीय विश्लेषकांकडून देखील त्यांची प्रशंसा करण्यात आली होती. प

हिल्या सत्रापेक्षा दुसऱ्या सत्रात अजून गती वाढवतील या विश्वासाने जनतेने त्यांना दुसरे सत्र दिले होते.

भारत त्यावेळी कोणत्याही जागतिक आर्थिक संकटांचा देखील सामना करत नव्हता, त्यामुळे तसे कामगिरी ढेपाळण्यास कोणतेच कारण नव्हते.

पण मनमोहन सिंग यांच्या या दुसऱ्या सत्रामध्ये कामगिरी अधिकच उंचावण्याच्या ऐवजी विविध भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर येत गेली. विशेषतः २०११ मध्ये गरिबी निर्मूलनाचा विकास वगळता, इतर कोणतीही प्रगती दिसून येत नव्हती. २०१४ पर्यंत काँग्रेसने विकासाची व्याख्याच संकुचित करून टाकली. अगदी असेच काहीसे १९९६ मध्ये झाले होते.

लोकांच्या अपेक्षांवर दुसऱ्या सत्रामध्ये मनमोहन सिंग खरे उतरू शकले नाहीत.

 

Reduce Poverty Rate.Inmarathi1
livemint.com

भारताच्या आर्थिक उदारीकरणाची अजून एक मनोरंजक कथा आहे. आपल्यापैकी बहुतेक जण असे गृहीत धरतात की, राजकारणातील पक्षांमधील युती या देशाला “नाजूक सरकार” देतात आणि जेव्हा सरकारला बहुमत प्राप्त होते, त्यावेळी ते आपल्या अधिकारांचा वापर करून काहीतरी धाडसी निर्णय घेतात.

परंतु इतिहास हे सांगतो की जेव्हा जेव्हा absolute majority ची सरकारं आलीयेत तेव्हा त्यांनी मिळालेल्या संधी गमावल्या आहेत आणि विविध आघाड्यांच्या, युती सरकारांनी चांगली कामगिरी बजावली आहे.

भारताच्या सर्वोत्तम बजेट्स पैकी असलेले १९९१ आणि १९९७ मध्ये आलेले बजेट्स ह्या ९० च्या दशकातील “आघाडी” सरकारांच्या काळातच आले होते.

वाजपेयी यांनी आपल्या नेतृत्वात पहिल्या वर्षामध्येच काही धाडसी पाऊले उचलली होती. जसे की पोखरणची दुसरी अणु चाचणी आणि अमेरिकेबरोबर असलेले संबंध. मनमोहन सिंग यांनी पहिल्या सत्रात विकास घडवून आणण्याची चांगली कामगिरी केली होती.

पण त्यांच्या दुसऱ्या सत्रामध्ये ते असे करू शकले नाही, जेव्हा त्यांना पहिल्या सत्रापेक्षा अधिक स्थिर आणि मजबूत सरकार चालवण्याची संधी मिळाली होती.

 

manmohan-inmarathi
scoopwhoop.com

असो. आपण आता प्रश्नाकडे वळू या.

मनमोहन सिंग एवढ्या मोठ्या प्रमाणात गरिबी दूर का अन कशी करू शकले?

मनमोहन सिंग यांना उच्च विकास करण्यास मदत करणारे घटक

१. चांगले आणि वचनबद्ध शासन :

मनमोहन सिंग हे २००४ ते २००९ च्या पहिल्या सत्रामध्ये देशाच्या विकासासाठी जेवढे वचनबद्ध होते, तेवढे स्वतंत्र भारतातील काँग्रेस सरकारच्या ५५ वर्षामध्ये कुणीही नव्हते.

याच कारणामुळे असं म्हणता येईल की, मनमोहन सिंग यांनी स्वतंत्र भारताच्या इतिहासातील सर्वात जलद गतीने विकासाचा दर वाढवला होता. काँग्रेसच्याच पूर्वीच्या कामगिरीपेक्षा ही कामगिरी फारच चांगली होती.

 

Reduce Poverty Rate.Inmarathi2
TradingEconomics.com

 

२. मजबूत जागतिक अर्थव्यवस्था :

१९९७ – ९८ मध्ये जेव्हा आशिया सर्वात मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत होता, त्यावेळी वाजपेयी यांचं सरकार होतं. त्यानंतरच्या  ६ वर्षामध्ये युरोप, चीन आणि जगातील इतर देशांची अर्थव्यवस्था मंदावली होती. भारताचा पारंपरिक मित्र रशिया अडचणीत होता.

पण, २००२ – २००८ या काळामध्ये जागतिक अर्थव्यवस्था उत्तम स्थितीत होती.

मनमोहनसिंगांना एका चांगल्या कालखंडात पंतप्रधान होण्याची संधी मिळाली आणि तिचं सोनं करत त्यांनी उत्तम कामगिरी बजावली.

३. पूर्वीच्या शासनकाळात उभारणी :

वाजपेयी यांनी सरकारला योग्य स्थितीमध्ये आणले होते. वाजपेयी यांनी भारताला अणु करारातील अनिश्चिततेतून बाहेर काढले होते. तसेच, वाजपेयी यांनी अमेरिकेशी देखील चांगले संबंध प्रस्थापित केले होते.

अमेरिकेबरोबर संबंध सुधारणे आणि वाजपेयी यांनी केलेल्या सुधारणांची सुरुवात हे मनमोहन सिंग यांच्यासाठी खूपच सोयीचे ठरले.

त्यामुळेच मनमोहनसिंगांना पश्चिमेबरोबर अणु करार आणि तांत्रिक क्षेत्रात विविध करार करणं सोपं गेलं.

यापेक्षा अधिक महत्त्वाचे म्हणजे वाजपेयी यांनी देशाची आर्थिक स्थिती चांगली ठेवली होती. कमी खर्चासह मजबूत शेअर बाजार आणि कमी चलनवाढ हे मनमोहन सिंग यांच्यासाठी उपयुक्त ठरले.

 

Reduce Poverty Rate.Inmarathi3
ndtvimg.com

४. खर्चामध्ये अमाप अन जलद वाढ :

जागतिक आर्थिक घटक आणि सुधारणांसह २००४ – ०९ मध्ये गरिबीचा दर कमी झाला, याचे  प्रमुख कारण म्हणजे विविध कल्याणकारी योजनांसाठी सरकारी खर्चात झालेली वाढ.

सुरुवातीच्या सरकारने केलेला खर्च कमी असल्याने आणि अर्थव्यवस्था सुव्यवस्थेत असल्याने सरकारची आर्थिक स्थिती मजबूत होती.

त्यामुळे सरकारने  कर्ज घेतले आणि कल्याणकारी कार्यक्रमांत ते पैसे वापरले. हे सर्व क्षणात यशस्वी झाले…आणि त्याचे गरिबीवर तात्काळ लाभ दिसले.

पण हे जास्त काळ टिकून राहू शकले नाही. सरकारी खर्च, चलनवाढ यामुळे त्यांना पुढे खूप संकटाना सामोरे जावे लागले. शिवाय भ्रष्टाचाराच्या प्रकारणांमुळे संकट वाढत गेलं.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?