' ह्या ७ गोष्टींची काळजी घेतली तर कोणत्याही व्यवसायातून पैश्यांचा पाऊस पाडू शकाल!

ह्या ७ गोष्टींची काळजी घेतली तर कोणत्याही व्यवसायातून पैश्यांचा पाऊस पाडू शकाल!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

कोणताही व्यवसाय करणे कधीही सोपे नसते. एखादा व्यवसाय सुरू करायचा झाल्यास त्यासाठी दहा वेळा विचार करणे गरजेचे असते, कारण तुम्ही सुरू केलेल्या व्यवसायामधील तुमचे निर्णय चुकल्यास त्याचा परिणाम तुमच्या संपूर्ण जीवनावर होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. व्यवसायातील प्रत्येक बाजू पडताळून पाहणे नेहमी गरजेचे असते आणि त्याचबरोबर गरजेचे असते  – ते म्हणजे –

आपल्या व्यवसायाचे एक नेटवर्क तयार करणे.

 

successfull man06-marathipizza

 

जेवढी तुमच्या व्यवसायाची माहिती लोकांपर्यंत पोहोचेल, तेवढाच तुमचा नफा वाढण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे व्यवसायासाठी बिजनेस नेट्वर्किंग महत्त्वाची असते. तुमचा व्यवसाय एकाच ठिकाणावरून कधीही यशस्वी होणार नाही.

आपल्याला त्यासाठी  मार्गदर्शन आणि समर्थनाची आवश्यकता असते. या व्यतिरिक्त इतरांबरोबर नेटवर्क वाढवल्यास आपल्या ब्रँडचे प्रमोशन होण्यास मदत होते. आज आम्ही तुम्हाला व्यवसाय यशस्वी करण्यासाठी लागणाऱ्या नेट्वर्किंगबद्दल काही रहस्य सांगणार आहोत, ज्याच्या आधारे तुम्ही तुमचा व्यवसाय लोकांपर्यंत पोहोचू शकता आणि त्यांची गरज समजून घेऊ शकता.

एका वाक्यात सांगायचे झाले तर –

जर तुम्ही तुमच्या व्यवसायास अनुकूल नि आवश्यक असणाऱ्या लोकांचं जाळं, नेटवर्क तयार केलंत तर तुमचा व्यवसाय कोणत्या का प्रकारचा असेना – यश झक मारत तुमच्या पाठीशी येणारच…!

पण मग हे नेटवर्किंग कसं करावं? कोणत्या चुका टाळाव्यात?

चला तर मग जाणून घेऊया, या नेट्वर्किंग साध्य करण्याच्या पद्धतीबद्दल.

१. सोशल मिडियाचा आधार घेऊन व्यवसाय वाढवा

 

Social-Media-discussions-marathipizza

 

आपला व्यवसायाची माहिती लोकांपर्यंत पोहचवण्याचा सोशल मिडिया हा सर्वात सोपा प्लॅटफॉर्म आहे. आठवड्यातील काही तास जरी आपण सोशल मिडीयावर आपल्या व्यवसायासाठी घालवले, तरी देखील आपण त्यांचामध्ये आपल्या व्यवसायाबद्दल विश्वास निर्माण करू शकतो. तसेच, सोशल मिडियामुळे तुम्हाला तुम्ही टार्गेट करू पाहणाऱ्या लोकांना एका टॅपमध्ये माहिती पुरवते.

 

२. योग्य “शब्द” वापरा.

काहीवेळा लोकांपर्यंत पोहोचणे हे तुम्ही काय बोलत आहात आणि कसे बोलत आहात यावर अवलंबून असते. तुम्ही फक्त बोलून चालत नाही, तुम्ही कशाप्रकारे ते लोकांसमोर मांडता हे महत्त्वाचे असते.

successfull man08-marathipizza

 

उगाच नको असलेले भाष्य करणे टाळा आणि जी गोष्ट सांगायची आहे, ती हृदयापासून सांगा आणि त्यांचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न करा. आपल्या शब्दांना अश्याप्रकारे तयार करा की, लोकांपर्यंत तुमचा हेतू आणि संदेश अचूक पोहचवता येईल.

हे ही वाचा – श्रीमंत लोक अधिकाधिक श्रीमंत होण्यासाठी ‘या’ गोष्टींचं हमखास पालन करतात

३. योग्य विचारांच्या आणि यशस्वी लोकांच्या संपर्कात राहा

तुम्ही तुम्हाला प्रेरणा देणाऱ्या आणि त्याचवेळी तुमच्यापाठीशी खंबीरपणे उभी रहाणारी माणसे शोधा.

 

 

नकारात्मक लोकांबरोबर वेळ खर्च करू नका. तसेच, ज्या लोकांकडे अधिक अनुभव आणि कौशल्य आहे, अश्या लोकांच्या संपर्कात रहा. त्यांना आपल्याशी जोडण्याचा प्रयत्न करा. तुमच्या क्षेत्रातील त्यासारख्याच व्यवसायाच्या माध्यमातून यशस्वी झालेल्या लोकांकडून शिका, योग्य त्या गोष्टींचं अनुसरण करा.

 

४. ज्यांना तुमचे मार्गदर्शन हवे आहे, अश्या लोकांसाठी उपलब्ध रहा.

आपण जसे इतरांकडून शिकतो, त्याचप्रमाणे आपल्यानंतर या व्यवसाय क्षेत्रामध्ये येऊ इच्छित असणाऱ्यांना तुम्ही शिकवू शकता.

 

interview-marathipizza01

 

 

यामुळे तुमच्या यशापर्यंतच्या प्रवासाची समृद्ध भावना वाढण्यास मदत होईल. इतरांसाठी काही केल्यास, तुम्हाला नवीन संधी शोधण्यास मदत होते.

 

५. सर्वांशी चांगले संबंध निर्माण करा.

सर्वांशी चांगले संबंध प्रस्थापित केल्याने आपल्या व्यवसायाला एक विशिष्ट चालना मिळते. विविध स्तरातील, वर्गातील अनुभवी लोकांशी संबंध ठेवणे, आपल्या व्यवसायासाठी चांगले असते.

 

office inmarathi

 

जर तुम्ही एक किंवा त्याच्यापेक्षा जास्त लोकांना तुम्ही भेटलात आणि त्यांना जर समजले की, तुम्हाला काय आवश्यक आहे – तर ते अजून जास्त वेळ त्याबद्दल जाणून घेण्यास तयार होतील आणि इतरांना देखील तुमच्या  व्यवसायाबद्दल सांगतील.

 

६. चिवटपणे लोकांचा पाठपुरावा करणे

संभाव्य ग्राहक किंवा चांगला कर्मचारी नजरेत असल्यास, त्याच्या संपर्कात रहा.

 

rocket singh with boss marathipizza

 

आपण एखादा प्रकल्प व्यवस्थापित करत असल्यास, त्या प्रकल्पाच्या संघातील प्रत्येक सदस्याच्या संपर्कात रहा. योग्य लोकांशी आवश्यक असताना नियमितपणे संपर्कात राहणे, हे महत्त्वाची कार्य पूर्ण करण्यासाठी आपला पुढाकार दर्शवतो. तसेच अश्याने कंपनीच्या महसूलाला चालना मिळण्याची शक्यता वाढते.

 

७. निर्हेतुकपणे लोकांच्या संपार्कात येत रहा

तुम्ही जर इतरांपर्यंत पोहोचलात, तर नवीन ग्राहक तुम्हाला भेटण्याची शक्यता आहे. फक्त संभाव्य ग्राहकांनाच भेटायचं असं ठरवू नका. नवीन ग्राहकांना तुमचे एकमेव लक्ष्य बनवू नका.

सर्वांनाच तुमच्याकडे व्यवसायाकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न जरूर करा. पण प्रत्येकाने तुमचा ग्राहक बनावेत अशी अपेक्षा करू नका.

 

ranbir-kapoor-hindi-film-rocket-singh-inmarathi

हे ही वाचा – उद्योजक बनायचंय? हे १० गुण आत्मसात केले तर यशाचं शिखर नक्की गाठू शकाल!!

सर्वप्रकारच्या लोकांशी नेहमी चांगले संबंध बनवून ठेवा. यामधून एक व्यवहारिक समाधान प्राप्त होते.

हे सातही पैलू तुम्हाला तुमच्या व्यवसायाचे नेटवर्क वाढवण्यासाठी खूप मदत करू शकतात आणि त्यामुळे तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये यश प्राप्त होण्याच्या संधी वाढतील.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?